सुधाकर कुलकर्णी

सध्याच्या तंत्रज्ञान युगात ‘फिनटेक’ कंपन्यांचा सहभाग एकूणच आर्थिक सेवा व सुविधा पुरविण्यात दिवसेंदिवस वाढत चालला आहे आणि भविष्यात तो झपाट्याने वाढणार आहे हे ध्यानात घेता ‘पी२पी लेंडिंग’ किंवा तत्सम आर्थिक व्यवहार हा आपल्या अर्थव्यवस्थेचे एक प्रमुख अंग बनू शकतो. जास्त परतावा व तुलनेने कमी जोखीम असलेल्या, तरी बहुतांशांना अपरिचित अशा या कायदेसंमत गुंतवणूक पर्यायाची दखल म्हणूनच अनिवार्य ठरते.

आणखी वाचा: Money Mantra: शेअर बाजारात उतरताय तर ‘हे’ लक्षात ठेवाच!

investment tips
Money Mantra: घसरलेल्या मार्केटमध्ये गुंतवणुकीस सुरुवात करताय? मग या टिप्स खास तुमच्यासाठी
What is the reason behind the Sensex fall that cost investors Rs 7 lakh crore
मार्केट वेध: सेन्सेक्सची १२०० अंशाहून मोठी आपटी; गुंतवणूकदारांच्या…
Mumbai Stock market share market Sensex nifty
शेअर बाजाराचा सप्ताहरंभ ‘सेन्सेक्स’च्या ४५० अंशांच्या तेजीने; पण ट्रम्प २.० धोरणे तेजीला टिकवू देतील?
stp benefits loksatta
धन जोडावे : अस्थिर बाजारात पुढे काय?
lic mf medium to long duration fund
संभाव्य व्याजदर कपातीचा लाभार्थी, ‘एलआयसी एमएफ मीडियम टू लाँग ड्युरेशन फंड’ कसा आहे?
gold import india
अर्थसंकल्प २०२५-२६ : अन्नधान्य, सोने आयातनिर्भरतेविरुद्ध युद्धपातळीवर उपाय गरजेचे
my portfolio latest news in marathi
माझा पोर्टफोलियो – पोर्टफोलिओचा भक्कम आधारस्तंभ : ओएनजीसी
5 major developments in stock market to watch out for in coming week Which stocks will give you big gains this week
मार्केट वेध : शेअर बाजारात येत्या आठवड्यात या ५ प्रमुख घडामोडींवर लक्ष हवे? आठवड्यातील धनलाभ देणारे शेअर्स कोणते?
market stability loksatta news
तिमाही निकाल बाजाराला सावरतील?

बँक, पोस्ट, पीपीएफ यासारख्या पारंपरिक सुरक्षित पर्यायात गुंतवणूक केल्यानंतर, ‘थोडी जोखीम घेऊन पाहू काय हरकत आहे’ म्हणत काही गुंतवणूकदार अन्य काही पर्याय शोधत असतात. अशा वेळी शेअर्स /म्युचुअल फंड हे बहुश्रुत पर्याय असतातच, तथापि ज्यांना नियमित उत्पन्न पाहिजे त्यांना आणखी वेगळ्या वाटा चोखाळाव्याशा वाटतात. जास्त परतावा देणारा व तुलनेने कमी जोखीम असलेला असाच एक पर्याय जो आजही सर्वसामान्य गुंतवणूकदारांना फारसा माहीत नाही. त्याचा या निमित्ताने वेध घेऊया. आजच्या तंत्रज्ञानाच्या जमान्यात विविध ‘फिनटेक’ कंपन्या उदयास आल्या असून पीअर टू पीअर (पीटूपी) लेंडिंग या नवीन गुंतवणूक पर्यायाचे दालन त्यायोगेच खुले झाले आहे. सर्वसामान्यांना हा पर्याय खुला करणाऱ्या सुमारे २५ फिनटेक कंपन्या गेल्या पाच-सात वर्षांपासून भारतात कार्यरत आहेत. यांची कार्यपद्धती कशी आहे व यात सामान्य गुंतवणूकदार कशी गुंतवणूक करू शकतो याची या लेखातून आपण माहिती घेऊ.

मुळात, पीटूपी लेंडिंग हा क्लाऊड फंडिंगचा प्रकार असून यात ज्याच्याकडे गुंतवणूक करण्यासाठी खर्च वजा वरकड (सरप्लस) रक्कम आहे व जास्त परतावा मिळविण्यासाठी थोडी जोखीम घ्यायची तयारी आहे असा गुंतवणूकदार वळतो. असे गुंतवणूकदार आणि ज्याला त्वरित व विनासायास कर्ज हवे असते अशी व्यक्ती यांचा मेळ साधणारे व्यासपीठ म्हणजे पीटूपी लेंडिंग सुविधा देऊ करणाऱ्या फिनटेक कंपन्या होय.

आणखी वाचा: Money Mantra : सुरक्षित क्रेडिट आणि डेबिट कार्ड पिन कसा तयार करायचा?

गुंतवणूकदार आपली रक्कम पीटूपी लेंडिंग सुविधा देऊ करणाऱ्या प्लॅटफॉर्मच्या एस्क्रो अकाऊंट (ठराविक उद्दिष्टासाठी सुरू केलेल्या बँक खात्यावर) जमा करतो व ज्याला कर्ज हवे असते अशी व्यक्ती आपली कर्ज मागणी या प्लॅटफॉर्मवर ऑनलाइन पद्धतीने करीत असते. या दोन्हीही व्यक्ती एकमेकांना ओळखत असतीलच असे नाही. किंबहुना बहुतांश एकमेकास ओळखत नसतात. जसे ओला/उबर मार्फत प्रवासासाठी गाडी बुक करताना आपण मोबाइलवरील संबंधित ॲपवर गाडीसाठी नोंदणी करतो तसाच हा प्रकार आहे. आपल्याला कोठे जायचे आहे याची नोंद केल्यानंतर ओला/उबर ॲप, आपल्याला कोणत्या प्रकारची गाडी हवी आहे त्यानुसार किती भाडे असेल हे सुचवत असते, आपण आपली गरज व परवडणारे भाडे यांचा विचार करून आपल्या सोयीनुसार गाडी निवडतो. आपण निवडलेल्या पर्यायानुसार जवळपास असणाऱ्या गाड्यांपैकी एक ड्रायव्हर आपल्याला ॲपवर होकार कळवितो व त्याच वेळी त्याला यायला किती वेळ लागेल याचा अंदाज दर्शविला जातो. त्या सोबतच ड्रायव्हरने आतापर्यंत किती ट्रिप केल्या आहेत व ग्राहकांनी त्याला कसे रेटिंग दिले आहे हेही त्या ॲपवर दर्शविले जाते. मिळालेली माहिती समाधानकारक वाटली तरच आपण आपले बुकिंग कन्फर्म करत असतो. या ठिकाणी ज्याची स्वत:ची गाडी आहे अशी व्यक्ती ओला/उबर सोबत आपली गाडी रजिस्टर करतात. तद्वतच कर्ज मागणी करणाऱ्या सर्व व्यक्तींची माहिती व क्रेडिट स्कोर यासारखी आवश्यक ती माहिती प्लॅटफॉर्ममार्फत मिळविली जाते व ज्या व्यक्तीने एस्क्रो अकाऊंटवर रक्कम जमा केली आहे अशा व्यक्तीस ई-मेल, एसएमएस मार्फत ती दिली जाते व सोबतच मिळू शकणारे व्याज व जोखीम याबाबत माहिती दिली जाते. या माहितीच्या आधारे निर्णय घेऊन कर्जदाराने मागणी केलेल्या कर्जात सहभागी व्हायचे किंवा नाही याबाबत आपला निर्णय गुंतवणूकदाराने पीटूपी प्लॅटफॉर्मवर कळवायचा असतो. अशा रीतीने ज्याच्याकडे सरप्लस रक्कम आहे असा गुंतवणूकदार थेट गरजूस कर्ज देतो व या दोघांना जोडण्याचे काम पीटूपी लेंडिंग प्लॅटफॉर्म करत असतो.

Money Mantra: सोळावं वरीस सोन्याचं! ‘हा’ फंड आपल्या पोर्टफोलिओत हवाच!

सुनियंत्रित प्रक्रिया

पीटीपी लेंडिंग ही तशी नवीन संकल्पना आहे आणि पूर्णपणे सुनियंत्रित आहे. याबाबत रिझर्व्ह बँकेने काही मार्गदर्शक सूचना दिल्या असून त्यानुसारच व्यवहार करणे बंधनकारक आहे.
१) पीटूपी व्यवसाय सुरू करण्यासाठी संबंधित कंपनीस ‘एनबीएफसी-पीटूपी’ अशी नोंदणी करणे आवश्यक आहे.
२) अशा कंपनीची नेट वर्थ किमान २ कोटी रुपये असणे आवश्यक आहे.
३) पीटीपी व्यवसायासाठी आवश्यक असणारे सर्व टेक्निकल (तांत्रिक ), प्रोफेशनल (व्यावसायिक) व मॅनेजरियल (व्यवस्थापकीय ) कौशल्य कंपनीकडे असणे आवश्यक आहे.
४) पीटूपी कंपनीने केवळ मध्यस्थ म्हणून काम करणे अपेक्षित आहे. कंपनी स्वत: कर्ज देणार नाही किंवा ठेव स्वीकारू शकणार नाही.
५) कर्ज देणारी व्यक्ती (गुंतवणूकदार) उपलब्ध सर्व प्लॅटफॉर्म मिळून जास्तीत जास्त १० लाख रुपये देऊ शकेल. जर ‘सीए’कडून नेट वर्थ बाबत प्रमाणपत्र मिळविले असेल तर उपलब्ध सर्व प्लॅटफॉर्म मिळून जास्तीत जास्त ५० लाख रुपये देऊ शकेल.
६) कर्ज घेणारी व्यक्ती सर्व प्लॅटफॉर्म मिळून जास्तीत जास्त १० लाख रुपये कर्ज घेऊ शकेल.
७) कर्ज देणारा एका व्यक्तीस त्याच्या कर्ज मागणीच्या २० टक्क्यांपर्यंत परंतु जास्तीत जास्त ५०,००० रुपये एवढेच कर्ज देऊ शकेल. मात्र १,००० रुपये इतके कमीत कमी कर्जसुद्धा देता येईल.
८) कर्ज परतफेडीची मुदत किमान सहा महिने व कमाल ३६ महिने (३ वर्षे) इतकी असेल.
९) कर्जावरील व्याजदर कर्ज मागणी करणाऱ्याच्या पतगुणवत्तेनुसार (क्रेडिट वर्दीनेस) सुमारे ९ टक्के ते १८ टक्क्यांच्या दरम्यान असेल. कर्ज देणाऱ्या व्यक्तीस तो ज्या प्रमाणात जोखीम घेईल त्या प्रमाणात परतावा मिळेल.

हे लक्षात घ्यावे?

पीटूपी लेंडिंग प्लॅटफॉर्मवर पैसे गुंतवताना खालील बाबी समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे
१) पीटूपी लेंडिंग हे एक विनातारण (अनसिक्युअर्ड लोन) असून यात जोखीम असल्यामुळेच जास्त रिटर्न मिळत असतो. कर्जदाराचे त्याच्या रिस्क प्रोफाइलनुसार वर्गीकरण केले जाते. त्यामुळे आपण आपल्याला योग्य वाटेल त्याच्या रिस्क प्रोफाइलच्या कर्ज मागणीचा विचार करू शकतो.
२) आपण एका अनोळखी व्यक्तीस कर्ज देणार असतो.
३) सुरुवातीस मोठी रक्कम न गुंतवता लहान रक्कम गुंतवून, अनुभव घेऊन पुढील गुंतवणूक करावी.
४) गुंतवणुकीतून मिळणारा रिटर्न हा निश्चित नाही, तो कर्जदाराच्या प्रोफाइलनुसार कमी-अधिक असू शकतो.
५) पीटूपी च्या अन्य उपलब्ध प्लॅटफॉर्मचा तुलनात्मक अभ्यास करून एकाच प्लॅटफॉर्मवर आपली रक्कम न गुंतविता किमान तीन-चार प्लॅटफॉर्मवर गुंतवावी यामुळे गुंतवणुकीतील जोखीम कमी होऊ शकते.
६) गुंतवणूक करण्यापूर्वी संबंधित प्लॅटफॉर्मचे कर्ज थकीत/अनियमित किती प्रमाणात आहे हे पाहावे.

(क्रमश:)

Story img Loader