सुधाकर कुलकर्णी

पीटूपी गुंतवणूक म्हणजे नेमकं काय हे आपण पहिल्या भागात पाहिलं. आता समजून घेऊया त्याचे बारकावे.

स्वरूप व कार्यपद्धती

१) पीटूपी लेंडिंग प्लॅटफॉर्मने केवळ मध्यस्थ म्हणून काम करावयाचे आहे जेणेकरून ज्याच्याकडे शिल्लक आहे व ती त्याला गुंतवायची आहे आणि ज्याला कर्जाऊ रक्कम हवी आहे अशांना एकमेकांशी जोडले जाते.
२) पीटूपी लेंडिंग प्लॅटफॉर्म स्वत: ठेवी स्वीकारू शकत नाही.
३) पीटूपी लेंडिंग प्लॅटफॉर्म स्वत: कर्ज देऊ शकत नाही. तसेच आधीच्या कर्जाची रक्कम वाढवू शकत नाही किंवा कोणत्याही प्रकारची हमी देऊ शकत नाही.
४) कर्ज देणारा व घेणारा या दोघांनीही आवश्यक त्या कायदेशीर बाबींची पूर्तता केली असल्याची खातरजमा पीटूपी लेंडिंग प्लॅटफॉर्मने करून घेण्याची गरज आहे.
५) पीटूपी लेंडिंग प्लॅटफॉर्मने आपल्याकडील सर्व व्यवहारांचा डेटा तसेच कर्ज देणारे व घेणारे यांचा डेटा सुरक्षित व भारतातच ठेवणे बंधनकारक आहे.
६) दिले जाणारे कर्ज हे विनातारणी कर्ज असून यातील जोखमीची पूर्ण जाणीव कर्ज देणाऱ्याला करून देणे ही पीटूपी लेंडिंग प्लॅटफॉर्मची जबाबदारी असते.
७) तक्रार निवारण अधिकाऱ्याचे नाव, मेल व फोन नंबर हा तपशील वेबसाइटवर उपलब्ध करून देणे ही जबाबदारी पीटूपी लेंडिंग प्लॅटफॉर्मची असते.
८) कर्ज वितरण, परतफेड व वसुली यावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी पीटूपी लेंडिंग प्लॅटफॉर्मची असते.
९) कर्ज देणाऱ्याने रक्कम आणि कर्ज घेणाऱ्यास देण्याची रक्कम हे दोन्हीही व्यवहार एस्क्रो अकाऊंटमधूनच करावयाचे आहेत.

Bharatiya Janata Party continues to pursue the state government for waiver of penalty on property tax panvel municipal corporation
पनवेल: शास्तीमाफीसाठी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
jan dhan account marathi news
अकरा कोटी निष्क्रिय जनधन खात्यांमध्ये १४,७५० कोटी पडून
equity funds investment declined
इक्विटी फंडांतील ओघ ओसरला! नोव्हेंबरमध्ये १४ टक्क्यांनी घटून ३५,९४३ कोटींवर
rbi governor shaktikanta das
उच्च व्याजदर केवळ विकासदर मंदावण्याचे कारण नव्हे – दास
sunk deposits loksatta news
विश्लेषण : बुडालेल्या ठेवी परत मिळू शकतात? शासनाचे नवे परिपत्रक काय?
high expectations from third quarter
तिसऱ्या तिमाहीकडून अपेक्षांचे ओझे !
loksatta money motra article Growth and Value strategy
तुमची रणनीती काय? ‘ग्रोथ की व्हॅल्यू’

आणखी वाचा: Money Mantra: थोडी जोखीम पण जास्त परतावा; फिनटेक कंपन्यांचं काम कसं चालतं? (पूर्वार्ध)

पीटूपी लेंडिंगचे फायदे
१) गुंतवणुकीवर सरासरी १० ते १६ टक्के इतका परतावा मिळू शकतो.
२) दरमहा नियमित उत्पन्न मिळविता येऊ शकते.
३) कृत्रिम प्रज्ञेचा (एआय) वापर करून कर्जदार व त्याच्या पतइतिहासाची बरीच अचूक माहिती मिळत असल्याने कर्ज देण्याबाबतचा निर्णय घेणे काहीसे सोपे होते.
४) मिळणारे कर्ज अगदी कमीतकमी वेळात (काही तासांत ) मिळू शकते.
५) आपण गुंतविलेली रक्कम एकाच व्यक्तीस कर्ज म्हणून दिली जात नाही. साधारणपणे १ लाख रुपयांची गुंतवणूक ही कर्ज म्हणून सुमारे ३५ ते ४० लोकांमध्ये विभागली जात असल्याने जोखीम मोठ्या प्रमाणात कमी होते.
६) बहुतांश कर्जदार हे नोकरी करणारे व साधारणपणे दरमहा ३०,००० रुपये ते ७५,००० रुपये उत्पन्न असणारे असल्याने कर्ज थकीत/अनियमित होण्याची शक्यता कमी असते.

आणखी वाचा: Money Mantra: शेअर बाजारात उतरताय तर ‘हे’ लक्षात ठेवाच!

पीटूपी लेंडिंगचे तोटे

१) पीटूपी ही तशी नवी संकल्पना असून अजून स्थिरावयाची आहे. त्यामुळे कोणत्याही निष्कर्षाला जाण्यासाठी पुरेसा पूर्वेतिहास नाही.
२) कर्ज बिनतारणी असल्याने अनियमित झाल्यास वसुलीची जबाबदारी पीटूपी कंपनीवर नसते. त्यामुळे कर्ज बुडीत होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
३) मिळणाऱ्या व्याजाचे उत्पन्न करपात्र असते.

सध्याच्या तंत्रज्ञान युगात फिनटेक कंपन्यांचा सहभाग एकूणच आर्थिक सेवा व सुविधा पुरविण्यात दिवसेंदिवस वाढत चालला आहे व भविष्यात तो झपाट्याने वाढणार आहे हे ध्यानात घेता पी२पी किंवा तत्सम आर्थिक व्यवहार हा आपल्या अर्थव्यवस्थेचे एक प्रमुख अंग बनू शकते.
आर्थिक समावेशकता हे उद्दिष्ट पीटूपी लेंडिंगमुळे साध्य होऊ शकते. यातून मध्यम, लघू व सूक्ष्म उद्योगास अगदी कमी वेळात अर्थसाहाय्य मिळत असल्याचे दिसून येत आहे. रिटेल लोनची वाढती मागणी विचारात घेता पीटूपी लेंडिंगला नजीकच्या भविष्यात खूप वाव असल्याचे दिसून येते. आपल्याकडे २०१४ पासून पीटूपी लेंडिंग सुरू झाले असले तरी याबाबत लोकांना फारशी माहिती आजही नाही. २०१७ साली या व्यवसायासाठी रिझर्व्ह बँकेने काही मार्गदर्शक तत्त्वे ठरवून दिली असून त्यानुसार नोंदणीकृत कंपन्याच हा व्यवसाय करू शकतात.

बाजारपेठ आणि विकास

  • सध्या सुमारे २५ कंपन्यांना रिझर्व्ह बँकेने पीटूपी लेंडिंगसाठी रजिस्ट्रेशन दिले असून खालील काही कंपन्या सध्या प्रामुख्याने या व्यवसायात दिसून येत आहेत.
  • प्रमुख कंपन्या: १) फेअरसेंट २) ब्रिज फ्रेन्जी ३) लेंड बॉक्स ४) लेनदेन क्लब ५) पैसा दुकान ६) रुपी सर्कल ७) आय टू आय फंड्स ८) लेंडिंगकार्ट ९) मोनेक्सो १०) कॅशकुमार
  • या व्यवसायाची सुमारे २१ ते २२ टक्के दराने प्रति वर्षी वाढ होणे अपेक्षित असून २०२६ अखेर भारतातील हा व्यवसाय सुमारे ८०,००० ते ८५,००० कोटी रुपये इतका होईल असा अंदाज आहे.
  • या पर्यायाचा लाभ गुंतवणूकदार आणि छोटे-मध्यम व्यावसायिक या दोघांनाही घेता येऊ शकतो.

Story img Loader