वर्ष १९४६ मध्ये स्थापन झालेली पीआय इंडस्ट्रीज लिमिटेड ही कृषी-रसायन क्षेत्रातील भारतातील एक आघाडीची कंपनी आहे. गेल्या ७८ वर्षांत कंपनीने देशांतर्गत आणि निर्यात करून भारतीय तसेच अंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये आपली स्थिती मजबूत केली आहे. कंपनीचे अत्याधुनिक उत्पादन प्रकल्प गुजरातमध्ये पानोली आणि जंबूसार येथे असून त्यात इन-हाऊस अभियांत्रिकी क्षमता असलेल्या एकात्मिक प्रक्रिया संलग्न आहेत. कंपनीचे अत्याधुनिक संशोधन केंद्र उदयपुर येथे असून तेथे ३५० हून अधिक वैज्ञानिक कार्यरत आहेत. तीन वर्षांपूर्वी कंपनीने फार्मा क्षेत्रातही प्रवेश केला आहे. कंपनी आपल्या उत्पादन केंद्रांवर ‘फॉर्म्युलेशन’ सुविधादेखील पुरवते. कंपनीच्या एकूण महसुलापैकी सुमारे ९६ टक्के महसूल कृषी रसायने तर ४ टक्के महसूल फार्मा उद्योगातून आहे.

कृषी रसायने :

• गकेम सीएसएम एक्सपोर्ट: कंपनी ‘कस्टम सिन्थिसिस’ आणि कंत्राट उत्पादन करते. यामध्ये प्रामुख्याने रासायनिक प्रक्रियांचे तांत्रिक-व्यावसायिक मूल्यमापन, प्रक्रिया विकास, प्रयोगशाळा आणि व्यावसायिक उत्पादन समाविष्ट आहे. कंपनीकडे सुमारे १३ हजार कोटी रुपयांची निर्यात कार्यादेश प्रलंबित आहे.

Prices will increase due to reduced arrival of chillies Nandurbar news
यंदा लाल तिखटाचा भडका उडणार; मिरचीची आवक घटल्याने दर वाढणार
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
got elected four times through evms supriya sule on evm tampering allegations by congress
चार वेळा निवडून आले ईव्हीएमवर संशय कसा घेऊ? खासदार सुप्रिया सुळे यांचे विधान
red sanders smuggling
Pushpa Box Office Collection : चंदन तस्करीवर बेतलेल्या ‘पुष्पा’नं कमवले १५०० कोटी; पण खऱ्याखुऱ्या रक्तचंदनाला मात्र ग्राहकच नाही
Manghar Transformation into India First Honey Village in crisis
महाबळेश्वरमधील ‘मांघर’च्या मधमाश्यांवर संकट
amit shah inaugurates 10000 newly formed multipurpose pacs
प्रत्येक गावात बहुउद्देशीय संस्थाच केंद्रीय सहकार मंत्र्यांची घोषणा, ३२ प्रकारच्या व्यवसायांची मुभा
50 percent vacancies in FDA, FDA, drug licensing,
‘एफडीए’मध्ये ५० टक्के पदे रिक्त, औषध परवाना व औषध तपासणीवर परिणाम
Demand to remove onion export duty from Piyush Goyal who is coming to Nashik news
नाशिकमध्ये येणाऱ्या पीयूष गोयल यांना कांदा निर्यात शुल्क हटविण्यासाठी साकडे

• देशांतर्गत कृषी नाममुद्रा: कंपनी मूल्यांकन आणि चाचण्या, नियामक सेवा आणि नोंदणी आणि विविध कीटकनाशके, बुरशीनाशके, तणनाशके आणि विशेष उत्पादनांचे विपणन आणि वितरण करते. प्रोफेनोफॉस, इथिओन आणि फोरेटसारख्या जेनेरिक रेणूंचा पीआय इंडस्ट्रीज भारतातील सर्वात मोठा उत्पादक आहे.

हेही वाचा >>> भेटी करपात्र आहेत का?

• कंपनी फलोत्पादन, मिरची, मका, सोयाबीन, तांदूळ, कापूस आणि गहू यासाठी उत्पादने देते.

यंदाच्या आर्थिक वर्षांत कंपनीने क्लारेट, एकेत्सु, कॅडेट, पिलीन, अमिनो ग्रो ॲक्टिव्ह, कंपना आणि नेमटीसाइड यासह सात नवीन नाममुद्रा सादर केल्या आहेत. नुकत्याच पदार्पण केलेल्या फार्मा विभागामध्ये ‘कॉन्ट्रॅक्ट रिसर्च आणि डेव्हलपमेंट’ , ‘कॉन्ट्रॅक्ट डेव्हलपमेंट आणि फार्मास्युटिकल’ उद्योगात वापरल्या जाणाऱ्या सक्रिय, मुख्य प्रारंभिक साहित्य आणि उत्पादन घटक समाविष्ट आहेत. कंपनीने गेल्या वर्षात ‘थेराकेम रिसर्च मेडी लॅब एलएलसी’ आणि ‘अर्चिमिका एसपीए’ विकत घेऊन या व्यवसायात प्रवेश केला. गेल्या वर्षात एकूण निर्यात महसूल वाढीमध्ये या विभागाचा वाटा ६ टक्के होता. तीन महिन्यांपूर्वी कंपनीने ‘प्लान्ट हेल्थ केअर पीएलसी’चे (पीएचसी) संपादन पूर्ण केले. पीएचसीकडे उद्योग-अग्रणी ज्ञान, उत्पादने, बौद्धिक संपदा आणि कृषी जैविक जागेत प्रथिने आणि ‘पेप्टाइड’ तंत्रज्ञानाचा अनुभव आहे.

कंपनी अमेरिका, ब्राझील, सौदी अरेबिया, म्यानमार, इंडोनेशिया, ब्रिटनसह तीसहून अधिक देशांमध्ये निर्यात करते. पीआय इंडस्ट्रीजची भारत, जपान, चीन आणि जर्मनी येथे जागतिक कार्यालये आहेत. कंपनीचे भारतात १०,००० हून अधिक भागीदार आहेत. कंपनीच्या उदयपूर, हैदराबाद, जयपूर आणि लोदी येथे संशोधन प्रयोगशाळा आहेत.

हेही वाचा >>> बाजारातली माणसं : हेज फंड बाजारातली एक रहस्यकथा – डेव्हीड शॉ

सप्टेंबर २०२४ अखेर सरलेल्या तिमाहीसाठी कंपनीने २,२२१ कोटी रुपयांच्या उलाढालीवर ५०८ कोटींचा नक्त नफा कामावला आहे. गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत तो केवळ ६ टक्के अधिक आहे. मात्र आगामी काळात कंपनीकडून भरीव कामगिरी अपेक्षित आहे. केवळ १५ कोटी भांडवल असलेल्या पीआय इंडस्ट्रीजने यंदाच्या पहिल्या तिमाहीपर्यंत ५५ प्रकल्पांसह विकासाच्या विविध टप्प्यांवर १७० हून अधिक बौद्धिक संपदेची (पेटंट) अर्ज दाखल केले आहे. पुढील वर्षांत कंपनीचे दोन उत्पादन प्रकल्प सुरू करण्याची सुमारे ९०० कोटी रुपयांची भांडवली योजना आहे. ज्यात एक प्रकल्प आणि एक बहुउत्पादक प्रकल्प आहे. आगामी कालावधीत देशांतर्गत बाजारात नऊ नवीन उत्पादने सादर करण्याची कंपनीची योजना आहे.

सध्याची शेअरबाजारातील अनिश्चितता पाहता सुचवलेले समभाग कमी बाजारभावात मिळू शकतात, यामुळे प्रत्येक मंदीत तसेच टप्प्याटप्प्याने शेअर खरेदीचे धोरण ठेवावे.

पीआय इंडस्ट्रीज लिमिटेड (बीएसई कोड: ५२३६४२)

संकेतस्थळ www.piindustries.com

प्रवर्तक: सलील सिंघल

बाजारभाव: ४,११७/-

प्रमुख उत्पादन/ व्यवसाय : कृषी-रसायने, कीटकनाशके

भरणा झालेले भागभांडवल: रु. १५.२० कोटी

प्रवर्तक ४६.० ९

परदेशी गुंतवणूकदार १९.० २

बँक/ म्युच्युअल फंड/ सरकार २६.३६

इतर/ जनता ८.५३

पुस्तकी मूल्य: रु. ६२९

दर्शनी मूल्य: रु. १/-

गतवर्षीचा लाभांश: १५०० %

प्रति समभाग उत्पन्न: रु. ११७/-

किंमत उत्पन्न गुणोत्तर: ३५.२

समग्र किंमत उत्पन्न गुणोत्तर: २८.८

डेट इक्विटी गुणोत्तर: ०.०२

इंटरेस्ट कव्हरेज गुणोत्तर: ६३.४

रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लाॅईड (आरओसीई): २४%

बीटा : ०.७

बाजार भांडवल: रु. ६२,४७४ कोटी (लार्ज कॅप)

वर्षभरातील उच्चांक/ नीचांक: ४८०४/३०६०

गुंतवणूक कालावधी : १८-२४ महिने

stocksandwealth@gmail.com

 • प्रस्तुत लेखामध्ये सुचवलेल्या कंपनीच्या शेअर्समध्ये लेखकाची वा त्याच्या जवळच्या नातेवाईकांची (उपलब्ध माहितीप्रमाणे) कुठलीही गुंतवणूक नाही किंवा असल्यास ती कंपनीच्या भरणा झालेल्या भागभांडवलाच्या १ % पेक्षा कमी आहे. तसेच सुचवलेल्या कंपनीशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून त्याने कंपनीकडून कुठलेही मानधन अथवा भेटवस्तू घेतलेली नाही.

• हा गुंतवणूक सल्ला नाही

Story img Loader