कौस्तुभ जोशी
सुट्ट्यांचे दिवस सुरू होत आहेत. लहानपणी सगळ्यांनीच सुट्टीत जी धमाल केलेली असते, त्यात पत्ते हा मौजेचा विषय असतो. पत्ते खेळण्यामागे शास्त्रशुद्ध अभ्यास आहे, हे आपण विसरून चालणार नाही. पत्त्यांच्या खेळात सुयोग्य जोड्या म्हणजेच ‘कॉम्बिनेशन’ जुळवणे हा मुख्य भाग असतो. हातात आलेल्या पानांपैकी भविष्यात कोणते पान उपयोगी पडेल व कोणते नाही याचा नेमका अंदाज ज्याला लावता येतो, तो या पत्त्यांच्या खेळात जिंकतो. पत्ते खेळणाऱ्याच्या नशिबावर काहीसे यश अवलंबून असले तरी सर्वाधिक वाटा असतो तो व्यूहरचनेचा. आजच्या ‘बाजार रंग’ या लेखाचा उद्देश सुट्टी आणि पत्त्यांच्या आठवणी जागवणे हा नसून तुमच्या पोर्टफोलिओ बांधणीतील व्यूहरचना किती महत्त्वाची असते हे लक्षात आणून देणे हा आहे. पत्ते खेळताना जो नियम कायम लक्षात ठेवायचा असतो तोच नियम शेअर बाजारालाही लागू होतो. तो म्हणजे ‘भविष्य वर्तवू नका’ समोर दिसेल त्या परिस्थितीवरून निर्णय घ्या. ‘डोन्ट प्रेडिक्ट द मार्केट, फॉलो द मार्केट’ नवीन आर्थिक वर्षाला सुरुवात होते आहे. ज्यांना आपल्या गुंतवणुकीच्या नव्या आयुष्याची सुरुवात करायची असेल त्यांनी नेमका कोणता विचार कायमस्वरूपी लक्षात ठेवायला हवा ते आता पाहूया.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा