भारतीय आयुर्विमा महामंडळ अर्थात ‘एलआयसी’ काय आहे याबाबत जास्त लिहायची गरजच नाही. जगातील सर्वात मोठी आणि विश्वासू नाममुद्रा म्हणून ‘एलआयसी’ची ओळख आहे. दोन वर्षांपूर्वी ‘एलआयसी’ने बहुचर्चित महाकाय प्रारंभिक समभाग विक्री (आयपीओ) केली. प्रतिसमभाग ९३९ रुपये अधिमूल्याने कंपनीने २२.१४ कोटी समभाग विकून सुमारे २१,००० कोटी रुपयांची निधी उभारणी केली. भारतातील पहिली आणि सर्वात मोठी जीवन विमा कंपनी शेअर बाजारात सूचिबद्ध होणे हा एक ऐतिहासिक प्रसंग होता. मात्र गेल्या दोन वर्षांत कंपनीने गुंतवणूकदारांना फारसा परतावा दिला नाही आणि अजूनही हा शेअर आयपीओच्या माध्यमातून वितरित किमतीच्या आसपास उपलब्ध आहे.

सप्टेंबर २०२४ अखेर सरलेल्या तिमाहीसाठी कंपनीचे आर्थिक निकाल जाहीर झाले आहेत. गेल्या वर्षीच्या तिमाहीच्या तुलनेत कंपनीने उत्कृष्ट कामगिरी करून दाखवली आहे. या कलावधीत कंपनीने २,३१,९२६ कोटी रुपयांच्या उलाढालीवर ९,२२० कोटी रुपयांचा नक्त नफा कमावला आहे. गेल्या वर्षीच्या तिमाहीच्या तुलनेत तो जवळपास दुप्पट आहे. कंपनीचे अनुत्पादित कर्ज गुणोत्तर देखील २.४३ टक्क्यांवरून १.७२ टक्क्यांपर्यंत खाली आले आहे तर ‘प्रीमियम’ बाजार हिस्सा ७०.२६ टक्क्यांवरून वधारून ७४.७७ टक्क्यांवर पोहोचला आहे. गेल्या वर्षांत ‘एलआयसी’ने तब्बल २०४.३० लाख पॉलिसी विकल्या होत्या. देशभरात ३,६३६ शाखा विस्तारलेल्या ‘एलआयसी’चे १४.४० लाखांहून अधिक वितरण अधिकारी असून एलआयसीचे ९२ टक्के बाजारहिस्सा व्यापला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत याच कालावधीत नवीन ‘प्रीमियम’मध्ये १७.२९ टक्के वाढ झाली असून (२९,५३८ कोटी) तर समूह ‘प्रीमियम’मध्ये २५.३६ टक्क्यांची (८८,९७५ कोटी) भरीव वाढ झाली आहे. ‘एलआयसी’च्या व्यवस्थापनाखालील एकूण मालमत्ता अर्थात ‘एयूएम’ सुमारे ५५.४० लाख कोटी रुपये आहे.

Dr. Manmohan Singh passes away at 92
Manmohan Sing Death : मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया, “माझे आदर्श आणि मार्गदर्शक..”
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
school students ai education
नवे वर्ष ‘एआय’चे; शिक्षण संस्थांना काय करावे लागणार?
Protest for Parbhani incident slogans against Amit Shah
परभणी घटनेच्या निषेधार्थ मोर्चा, अमित शहा यांच्याविरुद्धही घोषणा
rahul gandhi devendra fadnavis
Devendra Fadnavis: “…हेच राहुल गांधींचं एकमेव ध्येय”, देवेंद्र फडणवीसांची बीड-परभणी दौऱ्यावरून थेट टीका!
Avimukteshwaranand Saraswati Criticized mohan bhagwat
Avimukteshwaranand Saraswati : मोहन भागवतांच्या वक्तव्यावर भडकले शंकराचार्य, “सत्ता हवी होती तेव्हा मंदिराचा जप सुरु होता, आता…”
Maharashtra Breaking News Live Updates
Maharashtra News : “छगन भुजबळांची समजूत कशामुळे काढायची?”, माणिकराव कोकाटे यांचा सवाल
राणीच्या बागेतील हत्तींचा अधिवास पोरका

हेही वाचा : आरोग्य विमा नाकारला का जातोय? अंशतः अथवा पूर्णतः दावे नाकारण्याचे प्रमाण ९५ टक्के का? 

संसदेच्या सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात केंद्र सरकार विमा दुरुस्ती विधेयक मांडण्याची शक्यता आहे. भारतातील विमा क्षेत्रातील सर्वात धाडसी सुधारणांपैकी एक म्हणून या विधेयकाचे स्वागत केले जात आहे. विमा दुरुस्ती विधेयकात पुढील महत्त्वाचे बदल प्रस्तावित आहेत
संमिश्र विमा परवाने

या विधेयकात संमिश्र विमा परवान्याची संकल्पना येऊ शकते. यामुळे आयुर्विमा कंपन्यांना वाहन आणि आरोग्य विम्यासारखी सामान्य विमा उत्पादने विकता येतील, तर सामान्य विमाधारक जीवन विमा क्षेत्रात प्रवेश करू शकतील. यामुळे ‘एलआयसी’सारख्या मोठ्या कंपन्या त्यांच्या योजनांमध्ये विविधता आणण्यास सक्षम असतील आणि ग्राहकांना उत्पादनांच्या विस्तृत श्रेणीचा फायदा होईल.

इतर आर्थिक उत्पादनांचे वितरण

विमाधारकांना म्युच्युअल फंड, कर्ज, क्रेडिट कार्ड आणि बँक ठेवी यासारख्या इतर आर्थिक उत्पादनांचे वितरण करण्याची परवानगी दिली जाईल. हे विमा कंपन्यांसाठी नवीन महसूल प्रवाह निर्माण करेल आणि त्यांना एकाच छत्राखाली अनेक आर्थिक गुंतवणुकीचे पर्याय खुले होतील.

हेही वाचा : निर्देशांकांच्या नवीन उच्चांकांच्या आणि परताव्याच्या अपेक्षाही माफक ठेवल्या जाव्यात!

‘कॅप्टिव्ह’ विमा परवाने

मोठ्या कंपन्या आणि समूहांना त्यांच्या स्वतःच्या जोखमीसाठी ‘कॅप्टिव्ह’ विमा संस्था स्थापन करण्याची परवानगी दिली जाईल. यामुळे व्यवसायांना त्यांच्या जोखीम व्यवस्थापनावर अधिक नियंत्रण मिळेल आणि पारंपरिक विमा प्रदात्यांवरील अवलंबित्व कमी होईल.

गुंतवणुकीच्या नियमांमध्ये शिथिलता

विमा नियामक संस्था ‘इन्शुरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी ऑफ इंडियाला (इर्डा) विमा कंपन्यांसाठी गुंतवणूक मर्यादा बदलण्याचे अधिकार प्राप्त होतील. यामध्ये इक्विटी गुंतवणुकीवरील मर्यादा समायोजित करणे आणि इतर मालमत्ता श्रेणी समाविष्ट आहेत. हा बदल ‘इर्डा’च्या गुंतवणूक नियमांना बाजारातील बदलांनुसार निश्चित करता येईल. पॉलिसीधारकांसाठी परतावा अनुकूल करेल. इतर विमा कंपन्यांच्या तुलनेत ‘एलआयसी’ सारख्या मोठ्या कंपनीला प्रस्तावित विधेयकाचा फायदा अपेक्षित आहे. जनतेकडे केवळ २.१८ टक्के हिस्सा आणि सध्या ९८५ रुपयांच्या आसपास असलेला हा शेअर एक दीर्घकालीन गुंतवणूक म्हणून लाभाचा ठरेल.

शेअरबाजारातील अनिश्चितता पाहता हा शेअर सध्याच्या किमतीपेक्षा कमी भावात मिळू शकतो, म्हणून प्रत्येक मंदीत तसेच टप्प्याटप्प्याने शेअर खरेदीचे धोरण ठेवावे.

हेही वाचा : बाजार रंग – अस्थिर बाजारात आपण कुठे?

लाइफ इन्शुरन्स कार्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड

(बीएसई कोड ५४३५२६)

वेबसाइट: http://www.licindia.in

प्रवर्तक: भारत सरकार

बाजारभाव: रु. ९८६/-

प्रमुख उत्पादन/ व्यवसाय: जीवन विमा

भरणा झालेले भाग भांडवल: रु. ६३२५ कोटी

प्रवर्तक ९६.५०

परदेशी गुंतवणूकदार ०.१६

बँक/म्युच्युअल फंड/ सरकार १.१६

इतर/ जनता २.१८

पुस्तकी मूल्य: रु. १५४

दर्शनी मूल्य: रु. १०/-

लाभांश: १००%

प्रति समभाग उत्पन्न: रु. ७४.६

किंमत उत्पन्न गुणोत्तर: १५

समग्र किंमत उत्पन्न गुणोत्तर: ५३.८

डेट इक्विटी गुणोत्तर: ००

रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लोइड (आरओसीई): ७२.९५
बीटा : १.४

बाजार भांडवल: रु. ६२,२६९८ कोटी (लार्ज कॅप)

वर्षभरातील उच्चांक/ नीचांक: १,२२२/६६६

गुंतवणूक कालावधी : ३६ महिने

Stocksandwealth@gmail.com

  • वरील लेख केवळ विश्लेषणात्मक संशोधन असून तो गुंतवणूक सल्ला नाही.
  • प्रस्तुत लेखामध्ये सुचवलेल्या कंपनीच्या शेअर्समध्ये लेखकाची वा त्याच्या जवळच्या नातेवाईकांची (उपलब्ध माहितीप्रमाणे) कुठलीही गुंतवणूक नाही किंवा असल्यास ती कंपनीच्या भरणा झालेल्या भागभांडवलाच्या ०.१% पेक्षा कमी आहे. तसेच सुचवलेल्या कंपनीशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून त्याने कंपनीकडून कुठलेही मानधन अथवा भेट वस्तू घेतलेली नाही.
  • लेखात सुचवलेल्या कंपनीचे संशोधन हे वाचकांच्या महितीसाठी असून, शेअरमधील गुंतवणूक वाचकांनी स्वत:च्या जोखमीवर अथवा सल्लागाराच्या सल्ल्याने करावी.

Story img Loader