अजय वाळिंबे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
स्वराज इंजिन्स लिमिटेड
(बीएसई कोड: ५००४०७)
संकेतस्थळ : www.swarajenterprise.com
प्रवर्तक: महिंद्र अँड महिंद्र
बाजारभाव: रु. २,८६१/-
प्रमुख उत्पादन/ व्यवसाय : इंजिन्स, ट्रॅक्टर
भरणा झालेले भाग भांडवल: रु. १२.१५ कोटी
शेअर होल्डिंग पॅटर्न (%)
प्रवर्तक ५२.१२
परदेशी गुंतवणूकदार ३.२३
बँक / म्युच्युअल फंड/ सरकार ८.८९
इतर/ जनता ३५.७६
पुस्तकी मूल्य: रु ३०३.३
दर्शनी मूल्य: रु.१०/-
गतवर्षीचा लाभांश: ९५०%
प्रति समभाग उत्पन्न: रु. १२१.७५
किंमत उत्पन्न गुणोत्तर: २३.५
समग्र किंमत उत्पन्न गुणोत्तर: ३१
डेट इक्विटी गुणोत्तर: ००
इंटरेस्ट कव्हरेज गुणोत्तर: ७०९
रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लाॅइड (आरओसीई): ५१.६
बीटा : ०.५
बाजार भांडवल: रु. ३,४८० कोटी (स्मॉल कॅप)
वर्षभरातील उच्चांक/ नीचांक: ३,४७०/१,९२७
गुंतवणूक कालावधी : ३६ महिने
स्वराज इंजिन्स लिमिटेडची स्थापना १९८५ मध्ये पंजाबमधील मोहाली येथे झाली. कंपनी प्रामुख्याने महिंद्र अँड महिंद्र लिमिटेडच्या स्वराज विभागाला इंजिन पुरवते. ‘स्वराज २२ एचपी’ ते ‘६५ एचपी’वरील श्रेणीतील डिझेल इंजिनांचे उत्पादन आणि पुरवठा करते. सुमारे चाळीस वर्षांचा अनुभव गाठीशी असलेली स्वराज इंजिन्स आज एक उत्पादनक्षम आणि अचूक गुणवत्तेचे विश्लेषण करणारी प्रगत कंपनी मानली जाते. कंपनी ‘हाय-टेक इंजिन’चे घटकदेखील तयार करत आहे. आतापर्यंत कंपनीने स्वराज ट्रॅक्टरमध्ये फिटमेंटसाठी सोळा लाखांहून अधिक इंजिनांचा पुरवठा केला आहे. वर्ष २००७ मध्ये महिंद्र समूहाने पंजाब ट्रॅक्टर्समधील बहुतांश भागभांडवल विकत घेतले आणि ‘स्वराज ब्रँड’चे फार्म डिव्हिजनमध्ये विलीनीकरण केले. कंपनीचा, पंजाबमधील रोपर येथे अद्ययावत उत्पादन प्रकल्प असून, स्वराज माझदा वाहनांसाठी हाय-टेक इंजिन घटक तयार करण्यासाठी ‘मॅचिंग शॉप’ सुविधादेखील आहे.
कायम उत्तम कामगिरी करून दाखवणाऱ्या स्वराज इंजिन्सने यंदाच्या दुसऱ्या तिमाहीत अपेक्षित कामगिरी करून दाखवली आहे. सप्टेंबर २०२४ अखेर सरलेल्या तिमाहीमध्ये कंपनीने उलाढालीत १४ टक्के वाढ नोंदवत ती ४६४ कोटींवर नेली आहे. तर नक्त नफा ४५ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. कंपनीच्या एकूण महसुलापैकी सुमारे ९७ टक्के महसूल इंजिन उत्पादनातून मिळतो. गेल्या वर्षापासून कंपनीने ४० एचपी आणि ४७ एचपी इंजिन मॉडेलचे व्यावसायिक उत्पादन सुरू केले आहे. कंपनी लवकरच ६५ एचपी इंजिन्सचे उत्पादन सुरू करेल. वाढत्या मागणीनुसार कंपनी आपल्या इंजिन उत्पादनाची क्षमता प्रतिवर्ष १,५०,००० वरून १,९५,००० पर्यंत वाढवणार आहे. या विस्ताराला संपूर्णपणे अंतर्गत निधीतून वित्तपुरवठा केला जात आहे. उत्तम आणि अनुभवी प्रवर्तक असलेल्या या कंपनीवर कुठलेही कर्ज नाही.
सध्याची शेअरबाजारातील अनिश्चितता पाहता सुचवलेले समभाग कमी बाजारभावात मिळू शकतात,यामुळे प्रत्येक मंदीत तसेच टप्प्याटप्प्याने शेअर खरेदीचे धोरण ठेवावे.
अजय वाळिंबे
stocksandwealth@gmail.com
• प्रस्तुत लेखामध्ये सुचवलेल्या कंपनीच्या शेअर्समध्ये लेखकाची वा त्याच्या जवळच्या नातेवाईकांची (उपलब्ध माहितीप्रमाणे) कुठलीही गुंतवणूक नाही किंवा असल्यास ती कंपनीच्या भरणा झालेल्या भाग भांडवलाच्या १% पेक्षा कमी आहे. तसेच सुचवलेल्या कंपनीशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून त्याने कंपनीकडून कुठलेही मानधन अथवा भेटवस्तू घेतलेली नाही.
• हा गुंतवणूक सल्ला नाही
• लेखात सुचवलेल्या कंपनीचे संशोधन हे वाचकांच्या महितीसाठी असून, शेअरमधील गुंतवणूक वाचकांनी स्वत:च्या जोखमीवर अथवा सल्लागाराच्या सल्ल्याने करावी.