Post Office RD Scheme : बदलत्या काळानुसार आजकाल गुंतवणुकीचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत, परंतु सुरक्षित गुंतवणुकीसाठी पोस्ट ऑफिस योजना ही अनेकांची पहिली पसंती असते. आज आम्ही तुम्हाला अशाच एका योजनेबद्दल सांगणार आहोत. पोस्ट ऑफिस आवर्ती ठेव योजना (Post Office RD Scheme) ही एक उत्तम आणि मजबूत परतावा देणारी योजना आहे. या योजनेंतर्गत तुम्ही दरमहा थोडीशी गुंतवणूक करून मोठा परतावा मिळवू शकता. जर तुम्हीही या योजनेत गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर या योजनेचे फायदे जाणून घ्या
म्हणून व्याजदराचा लाभ मिळतो
सरकार पोस्ट ऑफिसच्या छोट्या बचत योजनांचे व्याजदर तिमाही आधारावर ठरवते. सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात सरकारने अल्पबचत योजनेचे व्याजदर निश्चित केले आहेत. त्यामुळे ऑक्टोबर ते डिसेंबर २०२३ दरम्यान सरकारने पोस्ट ऑफिसच्या ५ वर्षांच्या आरडी स्कीमचा व्याजदर ६.७० टक्के ठरवला आहे. पूर्वी तो ६.५० टक्के होता. त्यात एकूण २० बेसिस पॉइंट्सने वाढ करण्यात आली आहे. हे दर १ ऑक्टोबर ते ३१ डिसेंबर २०२३ दरम्यान लागू आहेत.
दर महिन्याला छोटी रक्कम गुंतवून मोठा फंड तयार होणार
पोस्ट ऑफिसच्या आरडी स्कीममध्ये दर महिन्याला छोटी रक्कम गुंतवून तुम्ही मोठा फंड तयार करू शकता. पोस्ट ऑफिसच्या आरडी कॅल्क्युलेटरनुसार, जर तुम्ही एकूण ५ वर्षांसाठी दरमहा ५ हजार रुपये गुंतवले तर या योजनेत एकूण ३ लाख रुपये जमा होतील. ६.७० टक्के दराने तुम्हाला या रकमेवर ५६,८३० रुपये व्याज मिळेल. तसेच मॅच्युरिटीनंतर तुम्हाला ५,५६,८३० लाख रुपये मिळतील.
हेही वाचाः केवळ २६ टक्के भारतीय कंपन्या AI चा लाभ घेण्यासाठी तयार; सिस्को अभ्यासातून उघड
आरडी रकमेवर कर्ज उपलब्ध
पोस्ट ऑफिसच्या आवर्ती ठेव योजने(Post Office RD Scheme)अंतर्गत ग्राहकांना जमा केलेल्या रकमेवर कर्जाची सुविधादेखील मिळते. तुम्ही एकूण ठेव रकमेच्या ५० टक्के रक्कम कर्ज म्हणून घेऊ शकता. कर्ज फक्त ३ वर्षांनी घेतले जाऊ शकते आणि त्याचा व्याजदर RD योजनेच्या व्याजदरापेक्षा २ टक्के जास्त आहे.