अनेकजण पोस्ट ऑफिसच्या योजनांमध्ये गुंतवणूक करतात. या योजनांमध्ये गुंतवणूक करून नफा मिळवण्याच्या प्रयत्नात सर्वजण असतात. जर तुम्हाला टॅक्स सेविंग योजनेत गुंतवणूक करुन नफा कमवायचा असेल तर काही योजना तुमच्यासाठी फायदेशीर ठरतील, कोणत्या आहेत त्या योजना जाणून घ्या.
पब्लिक प्रोविडंट फंड:
पब्लिक प्रोविडंट फंड अंतर्गत वार्षिक ७.१ टक्के व्याज दिले जाते. ही करमुक्त योजना आहे. या योजनेतील ‘८० सी’ अंतर्गत दीड लाखांची सुट दिली जाते.
सुकन्या समृद्धी योजना:
या योजने अंतर्गत १० वर्षांच्या आतील मुलींचे खाते उघडता येते, त्यापेक्षा जास्त वय असणाऱ्या मुलींना या योजनेचा फायदा मिळत नाही. १८ वर्ष पुर्ण झाल्यानंतर मुली यातून काही रक्कम काढू शकतात. या योजनेमध्ये ७.६ टक्के व्याज दिले जाते.
सिनियर सीटीजन सेविंग स्कीम:
वरिष्ठ नागरिकांसाठी ‘सिनियर सीटीजन सेविंग स्कीम’ ही योजना सुरू करण्यात आली आहे. ज्याअंतर्गत ५५ ते ६० वर्षाची कोणतीही व्यक्ती या योजनेचा लाभ घेऊ शकतो. यात एकावेळी १५ लाख रुपये जमा करून पाच वर्षांच्या मॅच्युरिटी नंतर ८ टक्के व्याजाचा लाभ घेता येतो. या अंतर्गत देखील १.५ लाख रूपयांची टॅक्स सेविंग करता येते.
नॅशनल सेविंग सर्टीफीकेट:
या योजनेअंतर्गत १००० रुपयांची गुंतवणूक करता येते आणि या योजनेवर देखील सरकारकडुन ७ टक्के व्याज दिले जाते. या अंतर्गत १.५ लाख रूपयांची टॅक्स सेविंग करता येते.