Senior Citizen Savings Scheme: पोस्टातील योजना बऱ्याचदा लोकांच्या पसंतीस पडतात, कारण त्यात गुंतवणुकीबरोबरच सुरक्षिततेचीही हमी मिळते. पोस्टातील लहान बचत योजना तर अनेकांना आकर्षित करतात. देशात असे बरेच लोक आहेत, ज्यांना त्यांचे पैसे सुरक्षित योजनांमध्ये कोणत्याही जोखमीशिवाय गुंतवायचे आहेत, जेथे चांगले व्याज उपलब्ध आहे. पोस्ट ऑफिस योजना लोकांची विविध उद्दिष्टे लक्षात घेऊन अशा अनेक लहान बचत योजना चालवते. मात्र यामध्येही ज्येष्ठ नागरिक बचत योजना (SCSS) ही अशी योजना असून, ज्यावर व्याजदर सर्वाधिक असते. या योजनेचा मॅच्युरिटी कालावधी ५ वर्षांचा आहे, याचा अर्थ तुमचे पैसे फार मोठ्या कालावधीसाठी अडकून राहत नाहीत. विशेष म्हणजे तुम्ही ते तुमच्या पालकांच्या नावाने ट्रान्सफर करू शकता. बचत योजनेत गुंतवणूक करून ज्येष्ठ नागरिक प्राप्तिकर कायद्याच्या कलम ८० सी अंतर्गत १.५० लाख रुपयांपर्यंतच्या गुंतवणुकीवर कर सवलत मिळवू शकतात.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा