आपण शक्यतो आपल्याच देशात गुंतवणूक करणं पसंत करतो. कारण ती सोपी असते, त्याबाबत चांगल्या प्रकारे माहिती मिळवता येते, त्यातून पैशांची काढ-घाल बऱ्यापैकी सुरक्षित असते. गैरप्रकारांविरोधात योग्य कायदे असतात. मात्र एक जागतिक गुंतवणूकदार म्हणून जेव्हा आपण आपल्या पोर्टफोलिओकडे बघतो, तेव्हा ‘ग्लोबल डायव्हर्सिफिकेशन’ अर्थात गुंतवणुकीमध्ये जागतिक विविधीकरण साधतो. उदाहरण घ्यायचं तर भारतातील गुंतवणूकदार अमेरिका, जपान, चीन इत्यादी देशांच्या शेअर बाजारात गुंतवणूक करतो, तेव्हा त्याला जागतिक गुंतवणूकदाराचा दर्जा मिळतो. असे गुंतवणूकदार जिथे कुठे वाजवी किंमत आणि झेपण्याजोगी जोखीम असेल तिथे गुंतवणूक करतात. कारण सगळ्याच ठिकाणी एकसारखी शेअरबाजाराची कामगिरी नसते. कधी एक बाजार वर तर कधी दुसरा खाली. काही उद्योग काही देशांमध्ये जास्त चांगली कामगिरी दाखवतात, तर काही गुंतवणुकीच्या पद्धती आपल्या देशात नसतात. मग अशा वेळी योग्य माहिती काढून आपल्या देशाच्या बाहेर जे चांगलं असेल त्यात गुंतवणूक करता येऊ शकते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा