आजकाल मध्यमवर्गीय व उच्चमध्यमवर्गीय लोक क्रेडीट कार्ड मोठ्या प्रमाणावर वापरत आहेत , दिवसेंदिवस क्रेडिट कार्डाचा वापर वाढतच चालला आहे. क्रेडिट कार्ड वापरणे ही खरे तर एक खूप चांगली सुविधा आहे. यामुळे कार्डधारकास एक उचल मर्यादा मिळत असते याला क्रेडिट लाईन असे म्हणतात, आपली आर्थिक क्षमता विचारात घेऊन ही क्रेडिट लाईन दिली जाते व पुढे कार्डावरील व्यवहार समाधानकारक असल्यास ही मर्यादा वेळोवेळी वाढविली जाते. क्रेडिट कार्ड वापरून आपण किमान २० तर कमाल ५० दिवस इतक्या काळासाठी क्रेडिट लाईनपर्यंतची रक्कम बिनव्याजी वापरू शकतो. या शिवाय क्रेडिट कार्ड वरील खरेदीमुळे रिवार्ड पॉइंट, तसेच डिस्काऊंट, एअरपोर्ट वर लाउंज सुविधा मिळत असते. असं असलं तरी क्रेडिट कार्ड हे एक दुधारी शस्त्र आहे, त्याचा वापर जर योग्य पद्धतीने झाला नाही तर आर्थिक नुकसान तसंच सामाजिक प्रतिष्ठा सुद्धा खराब होऊ शकते. त्या दृष्टीने क्रेडीट कार्ड वापरताना काय खबरदारी घ्यावी हे आपण पाहू.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा