निफ्टी आणि सेन्सेक्समधील महत्त्वाचा शेअर म्हणजेच एचडीएफसी बँक. गेल्या आठवड्याभराच्या काळात या शेअरमध्ये सुरू झालेली घसरण गुंतवणूकदारांसाठी नव्हे तर म्युच्युअल फंडाच्या फंड मॅनेजरसाठीसुद्धा चिंतेचा विषय ठरणार आहे. निफ्टी-फिफ्टी म्हणजेच निफ्टी ५० शेअर्सच्या बास्केटमध्ये एचडीएफसी बँक या एका शेअरचा वाटा जवळपास १३ टक्क्यांचा आहे. याचा सोपा अर्थ जर एचडीएफसी बँकेचा शेअर कोसळला तर त्याचा थेट परिणाम निफ्टीवर होऊ शकतो. त्याचप्रमाणे बँक निफ्टी इंडेक्समध्ये एचडीएफसी बँकेचा वाटा जवळपास ३०% चा आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

१७ जानेवारी आणि १८ जानेवारी रोजी एचडीएफसी बँकेचा शेअर दहा टक्क्यांनी घसरून १४९० च्या आसपास स्थिरावला. गेल्या वर्षभराचा अंदाज घेतल्यास एचडीएफसी बँकेचा शेअर ५२ आठवड्याच्या कमी पातळीच्या जवळपास (५२ Weeks Low) जाताना दिसतो आहे. बाजारामध्ये सेक्टरल फंड विकत घेण्याची चढाओढ लागलेली असताना या एका दिवसाच्या पडझडीने बँकिंग आणि फायनान्शियल सर्व्हिसेस सेक्टर फंडांना धक्का दिला आहे. बरोडा बीएनपी पारिभास बँकिंग अँड फायनान्शियल सर्व्हिसेस, एलआयसी बँकिंग अँड फायनान्शिअल सर्विसेस, कोटक बँकिंग अँड फायनान्शिअल सर्विसेस या फंड योजनांना याचा फटका बसणार आहे. त्याचबरोबरीने बँकिंग ETF ना याचा फटका बसला आहे.

हेही वाचा : Money Mantra : फ्लोटिंग आणि फिक्स्ड रेटचे फायदे-तोटे काय असतात? 

एचडीएफसी बँक घसरणीचे कारण काय ?

एचडीएफसी बँकेच्या तिसऱ्या तिमाहीच्या निकालानंतर बाजाराने नकारात्मक पवित्रा घेताना शेअरमध्ये जोरदार विक्री सुरू केली. एचडीएफसी आणि एचडीएफसी बँक यांचे विलीनीकरण झाल्यावर कंपनीच्या नफ्याच्या प्रमाणामध्ये घट झाली आहे व याचा धसका घेऊनच की काय गुंतवणूकदारांनी विक्रीचा सपाटा लावला.

कोणत्या म्युच्युअल फंड योजनेत एचडीएफसी बँकेचे किती शेअर्स आहेत ?

या पडझडीनंतर गुंतवणूकदारांनी फंड विकावे का ?

या प्रश्नाचे उत्तर ‘नाही’ असे आहे. बऱ्याचदा शेअर बाजारातील अल्पकाळातील घटनांचा फटका म्युच्युअल फंड योजनांना बसत असतो. याचा तुमच्या पोर्टफोलिओवर परिणाम होणार असला तरीही तुम्ही तुमच्या गुंतवणुकीचे ध्येय लक्षात घेऊनच फंड योजना विकायची किंवा नाही हा विचार करायला हवा. तुमचे उद्दिष्ट दीर्घकालीन गुंतवणूक हेच असेल तर अशा छोट्या घटनेने त्यावर फारसा परिणाम होणार नाही.

हेही वाचा : Money Mantra: फंड विश्लेषण- जे एम लार्ज कॅप फंड

सेक्टरल फंड किती महत्त्वाचे ?

सेक्टरल फंड म्हणजेच एका क्षेत्रातून निवडक कंपन्या हुडकून पोर्टफोलिओ तयार केला जातो. उदाहरण बँकिंग फंड , आयटी फंड, फार्मा फंड. सेक्टरल फंड तुमच्या पोर्टफोलिओचा मोठा हिस्सा नाही ना ? याचा विचार करा. जर तुमच्या पोर्टफोलिओतील तीस ते चाळीस टक्के गुंतवणूक एकाच प्रकारच्या म्हणजेच एकाच क्षेत्रातल्या शेअर्समध्ये केली जात असेल तर हे धोकादायक आहे. बाजारातील तेजी-मंदीच्या लाटेवर स्वार होण्यासाठी सेक्टरल फंड फायदेशीर ठरत असले तरीही आदर्श पोर्टफोलिओच्या दृष्टीने त्यांचे प्रमाण १५ ते २० टक्क्यांपेक्षा जास्त असायला नको.

मराठीतील सर्व मनी-मंत्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Price of hdfc bank shares fall have you reviewed your funds mmdc css