नोकरी करणाऱ्या व्यक्तींना प्रोविडंट खात्यात गुंतवणूक करण्याची इच्छा असल्यास, त्यांच्यासाठी पीपीएफ पब्लिक प्रोव्हिडंट फंड हा गुंतवणूकीचा उत्तम पर्याय उपलब्ध आहे. या योजनेअंतर्गत बँक किंवा पोस्ट ऑफिस कुठेही खाते उघडता येते. यासह आयकर भरणा-या व्यक्तीने पीपीएफ खात्यात गुंतवणूक केल्यास, त्याला आयकर कायद्याच्या कलम ८० सी अंतर्गत टॅक्स डिडक्शनचा फायदा मिळतो.
पीपीएफ अकाउंटमध्ये दीड लाख रुपयांपेक्षा अधिक गुंतवणूक करता येते का?
१९६८ च्या पब्लिक प्रॉव्हिडंट फंड स्कीममध्ये गुंतवणुकीची मर्यादा दीड लाख रुपये होती. म्हणजेच पीपीएफ अकाउंटमध्ये गुंतवणूक करणारी व्यक्ती एका आर्थिक वर्षात दीड लाख रुपये गुंतवणूक करता येत होती. शेवटच २०१४ मध्ये या नियमात बदल करण्यात आला. यावेळी १ लाख गुंतवणूकीची मर्यादा दीड लाख रुपये करण्यात आली. त्यानंतर केंद्र सरकारने २०१९ मध्ये यासाठी नवा नियम लागू करण्याचे आदेश दिले. सध्या यासाठी ‘पब्लिक प्रॉविडंट फंड स्कीम २०१९’ या योजनेअंतर्गत ही सेवा सुरू आहे.
पीपीएफ अकाउंटमध्ये एका आर्थिक वर्षात दीड लाख रुपयांपेक्षा अधिक रक्कमेची गुंतवणूक करता येत नाही. पीपीएफ अकाउंटमध्ये कितीही वेळा निधी जमा करता येतो, त्यावर बंधन नाही. एका वर्षांत किमान ५०० रूपये खात्यात जमा करणे बंधनकारक आहे.