• अखिल भारद्वाज

Public Provident Fund vs Equity; How to invest for better long-term returns? बऱ्याचदा पब्लिक प्रॉव्हिडंट फंड अर्थात PPF मध्ये गुंतवणूक करून करमुक्त परतावा मिळेल, असे गुंतवणूकदारांना वाटते. कदाचित यामुळेच गुंतवणूकदार आपली सर्व बचत पीपीएफ खात्यात टाकण्याचा विचार करीत असतात. विशेष म्हणजे अशा काही गुंतवणूकदारांना दीर्घकालीन इक्विटी गुंतवणूक पर्यायांचीही बऱ्यापैकी माहिती असते. असे असूनही त्यांची नजर फक्त पीपीएफवर आहे. खरं तर दोन्ही गुंतवणूक पर्यायांची तुलना करणे योग्य नाही, कारण त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये भिन्न भूमिकांसह भिन्न मालमत्ता वर्गीकरण असते. एकमात्र समानता म्हणजे दोन्ही दीर्घकालीन गुंतवणूक पर्याय आहेत. आता दोन्ही योजनांमध्ये मिळालेल्या रिटर्न्सबद्दल आपण जाणून घेणार आहोत. यासंदर्भातील माहिती पार्टनर अल्फा कॅपिटलच्या अखिल भारद्वाज यांनी दिली आहे.

पीपीएफ खाते कोणत्याही बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये उघडता येते

PPF खाते कोणत्याही पोस्ट ऑफिस किंवा बँकेत उघडता येते. गुंतवणूकदार हे खाते फक्त १०० रुपयांमध्ये उघडू शकतात. यामध्ये वार्षिक किमान ५०० रुपये जमा करणे आवश्यक आहे. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे PPF ला E-E-E श्रेणीमध्ये ठेवण्यात आले आहे. म्हणजे गुंतवणूक, व्याज आणि परिपक्वता रक्कम या तिन्ही गुंतवणूकदारांसाठी पूर्णपणे करमुक्त आहेत. जर तुम्ही पीएफ खात्यात १५ वर्षांसाठी वार्षिक १.५ लाख रुपये गुंतवले तर तुम्ही सुमारे ४४ लाख रुपयांचा निधी तयार करू शकता. सध्या या खात्यात गुंतवलेल्या रकमेवर ७.१ टक्के दराने परतावा मिळत आहे. केंद्र सरकार दर तीन वर्षांनी या प्रकारच्या गुंतवणूक पर्यायाचे व्याजदर बदलत असते. दुसरीकडे इक्विटी अॅसेट क्लासमध्ये साधारणपणे १२ टक्के परतावा मिळू शकतो. मात्र, अशा स्थितीत गुंतवणूकदारांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होतात.इक्विटीमधील अतिरिक्त ४ टक्के परतावा बाजारातील अस्थिरतेची भरपाई करू शकतो का?, गुंतवणूकदार सरकारी-समर्थित रोख्यांची सुरक्षितता सोडून देतात का?, असे प्रश्नही तुम्हाला पडत असतील.

Indian rupee latest marathi news
रुपयाची प्रतिडॉलर ८५ च्या दिशेने वाटचाल
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
ipo allotment loksatta news
‘आयपीओ’ मिळण्याची शक्यता कशी वाढवावी? कटऑफ किंमत, एकापेक्षा अधिक डिमॅट खाती, कोटा याबाबत निर्णय कसा करावा?
public sector banks npa marathi news
सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे ‘एनपीए’ ३.१६ लाख कोटींवर
jan dhan account marathi news
अकरा कोटी निष्क्रिय जनधन खात्यांमध्ये १४,७५० कोटी पडून
more than 1700 retirees people in nashik benefit from DLC scheme of Postal Department
सेवानिवृत्तवेतन धारकांच्या मदतीला टपाल विभाग, जिल्ह्यात १७०० पेक्षा अधिक जणांना डीएलसी योजनेचा लाभ
sunk deposits loksatta news
विश्लेषण : बुडालेल्या ठेवी परत मिळू शकतात? शासनाचे नवे परिपत्रक काय?
high expectations from third quarter
तिसऱ्या तिमाहीकडून अपेक्षांचे ओझे !

हेही वाचाः आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये क्रेडिट कार्ड डिफॉल्ट्समध्ये झपाट्याने वाढ

पीपीएफच्या तुलनेत तुम्हाला इक्विटीमध्ये जास्त परताव्याचा लाभ मिळतो

अनिश्चितता आणि जोखीम लक्षात घेता ४ टक्के जास्त परतावा असतानाही नवीन गुंतवणूकदार पीपीएफसाठी इक्विटीला अधिक चांगला पर्याय मानू शकत नाहीत. गुंतवणूकदाराच्या दृष्टीने इक्विटी गुंतवणुकीचे पर्याय कसे चांगले असू शकतात, यावर एक नजर टाकू यात. पीपीएफच्या तुलनेत यावरील सुमारे ४ टक्के अतिरिक्त परतावा गुंतवणूकदारांना फारसा वाटत नाही, परंतु जेव्हा ते १०, २०, ३०, ४० किंवा ५० वर्षांसाठी पैसे साठवता, तेव्हा फरक पडू शकतो. खालील यादीत ते आपण पाहू शकता.

हेही वाचाः मे महिन्यात क्रेडिट कार्डांवर १.४ लाख कोटी रुपये खर्च; बनला नवा रेकॉर्ड

वरचा तक्ता दाखवतो की, पीपीएफ आणि इक्विटी व्हॅल्यूमधील फरक वर्षानुवर्षे कसा वाढतो. १० वर्षात हा फरक फक्त ९ लाख रुपये आहे, पण ५० वर्षांत तो २४ कोटी रुपये आहे. हा फरक एखाद्याची संपत्ती आणि जीवनशैली बदलू शकतो. हेच कारण आहे की, सामान्य उत्पन्न असलेले लोक खूप वेगळे जीवन जगतात. येथे तुम्हाला PPF आणि इक्विटीबद्दल समजले आहे की, कोणत्या पर्यायामध्ये तुम्हाला तुमचे पैसे गुंतवून अधिक फायदा मिळू शकतो. तुमची बचत गुंतवण्यापूर्वी तुम्हाला अशा बाबींची माहिती असलेल्या तज्ज्ञाचा सल्ला घेतल्यानंतरच गुंतवणुकीचा विचार करा.

(अखिल भारद्वाज, पार्टनर अल्फा कॅपिटल यांनी लिहिलेला लेख)

Story img Loader