गुंतवणूक, घराची खरेदी- विक्री, शेअर आदी सर्व व्यवहारांच्या संदर्भात आपल्याला नेहमी अनेक प्रश्न पडतात. कधी ते कर वाचविण्याच्या संदर्भात असतात तर कधी करपरताव्याच्या संदर्भात, कधी दीर्घकालीन नफ्यासंदर्भात या सर्व प्रश्नांची उत्तरे दर शनिवारी मनीमंत्र सदरातील तज्ज्ञ देतील!

प्रश्न (संजय सरदेसाई): ईएलएसएस (ELSS) फंड म्हणजे काय ?

What is LIC Bima Sakhi Yojana ?
LIC ची विमा सखी योजना काय आहे? महिन्याला ७ हजार रुपये देणाऱ्या खास स्कीमच्या अटी आणि नियम काय आहेत?
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
ipo allotment loksatta news
‘आयपीओ’ मिळण्याची शक्यता कशी वाढवावी? कटऑफ किंमत, एकापेक्षा अधिक डिमॅट खाती, कोटा याबाबत निर्णय कसा करावा?
equity funds investment declined
इक्विटी फंडांतील ओघ ओसरला! नोव्हेंबरमध्ये १४ टक्क्यांनी घटून ३५,९४३ कोटींवर
sunk deposits loksatta news
विश्लेषण : बुडालेल्या ठेवी परत मिळू शकतात? शासनाचे नवे परिपत्रक काय?
mishtann food limited
मिष्टान्न! (पूर्वार्ध)
high expectations from third quarter
तिसऱ्या तिमाहीकडून अपेक्षांचे ओझे !
loksatta money motra article Growth and Value strategy
तुमची रणनीती काय? ‘ग्रोथ की व्हॅल्यू’

ईएलएसएस हा एक ओपन एन्डेड डायव्हर्सीफाईड इक्विटी म्युचुअल फंड असून यातील गुंतवणूक प्राप्तीकर सेक्शन ८० सी अंतर्गत कर सवलतीस पात्र असते. मात्र यतील गुंतवणुकीस ३ वर्षाचा लॉक इन पिरीयड असतो , यामुळे गुंतवणूक केल्या तारखेपासून पुढे ३ वर्षे यातील गुंतवणूक अन्य ओपन एन्डेड फंड सरळ काढता येत नाही.

प्रश्न (राघवेंद्र जोशी): ईएलएसएस (ELSS) फंडाची एसआयपी करता येते का?

होय. ईएलएसएस फंडात एसआयपी पद्धतीने गुंतवणूक करता येते. मात्र इथे एक लक्षात घेतले पाहिजे की ३ वर्षे झाल्यावर साठलेली सगळी रक्कम काढता येत नाही, कारण एसआयपीचा प्रत्येक हप्ता एक स्वतंत्र गुंतवणूक असल्याने या प्रत्येक हप्त्यास ३ वर्षांचा लॉक इन पिरीयडचा नियम लागू होतो. उदा: आपण दरमहा रु.१०००० ची कोटक टॅक्स सेव्हर (ईएलएसएस फंड ) मध्ये ५ऑक्टोबर २०२० रोजी एसआयपी सुरु केली आहे व आत्तापर्यंत रु. ३६०००० गुंतवले आहेत व साठलेल्या युनिट्सची आजच्या एनएव्हीनुसार रु. ४४५००० इतकी किंमत आहे व आपल्याला ही रक्कम काढायची आहे तर ही सगळी रक्कम आपल्याला एकगठ्ठा काढता येणार नाही.

हेही वाचा… Money Mantra: एक आकर्षक पण दुर्लक्षित विमा योजना- Whole Life Insurance Policy

आपण फक्त ऑक्टोबर २०२० एसआयपीच्या पहिल्या रु. १०००० च्या गुंतवणुकीतून जेवढे युनिट्स या फंडाचे आपल्या खात्यावर जमा झाले असतील तेवढ्याच युनिटच्या आजच्या एनएव्हीनुसार रक्कम काढता येईल. जर ५ ऑक्टोबर २०२० ला या फंडाची एनएव्ही रु.२७.५० इतकी असेल तर आपल्या खात्यावर ३६३.६४ इतके युनिट्स त्यावेळी जमा झाले असतील व आजची एनएव्ही रु.४१.७६ असेल तर आपल्याला रु.१५१८५.६० इतकीच रक्कम काढता येईल जरी आपल्या खात्यात रु.४४५००० असले तरी.

प्रश्न (तुषार फळसाणकर): ईएलएसएस फंडात गुंतवणूक करण्याचे फायदे काय आहेत?

ईएलएसएस फंडातील गुंतवणूक प्रमुख्याने शेअर्स मध्ये होत असल्याने अन्य गुंतवणुकीच्या तुलनेने (उदा: पीपीएफ, एनएससी , एनपीएस , इन्शुरन्स पॉलिसी , युलिप यासारख्या) ८० सी अंतर्गत असणाऱ्या गुंतवणुकीपेक्षा जास्त परतावा मिळू शकतो. तसेच या पर्यायांच्या तुलनेने लॉक इन पिरीयड सुद्धा कमी आहे.

Story img Loader