सुधाकर कुलकर्णी

प्रश्न (प्राजक्ता राणे): डिजिटल रुपी म्हणजे काय ?

Beed Sarpanch Murder Case Prime Accused Valmik Karad Cast
अग्रलेख : कूच बिहार!
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
what is the genome india project why it matters
विश्लेषण : जिनोमइंडिया प्रकल्प भारतासाठी किती महत्त्वाचा?
how to use data science properly how to learn data science
कृत्रिम प्रज्ञेच्या प्रांगणात : डेटा सायन्स
UGC, recruit professors, Instructions UGC,
आयोगामार्फत प्राध्यापक भरतीस नकार; प्रचलित नियमांनुसारच प्रक्रिया राबवण्याच्या ‘यूजीसी’च्या सूचना
TCS , quarterly results , Infosys, Wipro,
ससा कासवाची गोष्ट : ‘टीसीएस’ला फळले… इन्फोसिस, विप्रोच्या तिमाही निकालांचे काय ?
Maha Kumbh Mela 2025
Maha Kumbh Mela 2025: महाकुंभ झाला डिजिटल; AI आणि ड्रोन्सची करडी नजर, शिवाय बरेच काही!
Pune will soon be known as an electronic cluster says Ashwini Vaishnav
पुण्याची ओळख लवकरच ‘इलेक्ट्रॉनिक क्लस्टर’, काय म्हणाले अश्विनी वैष्णव?

उत्तर – आपल्या रिझर्व्ह बँकेच्या फिजिकल करन्सीचे डिजिटल रुपांतर म्हणजे डिजिटल रुपी याला ई-रूपी असेही म्हणतात. ही सीबीडीसी (सेन्ट्रल बँक डिजिटल करन्सी ) म्हणून सुद्धा ओळखली जाते.

प्रश्न (अपर्णा अधिकारी) : डिजिटल करन्सी देण्याचा नेमका काय उद्देश आहे?
उत्तर- १) सध्याच्या प्रत्यक्ष नाणी पाडणे किंवा नोटा छपाई, त्यांची वाहतूक व सुरक्षा यावर होणाऱ्या खर्चात बचत करणे.
२) प्रचलित पेमेंट पद्धत जलद व सुरक्षित करणे.
३) बिटकॉइन, इथेरेम, टेथर यासारख्या खाजगी अनियंत्रित क्रिप्टो करन्सीसना पर्याय देणे.
४) आर्थिक व्यवहारातील रोखीचे प्रमाण कमी करणे.

आणखी वाचा-Money Mantra : प्रश्न तुमचे उत्तरं तज्ज्ञांची

प्रश्न (सुयश नाडगौडा): डिजिटल रुपी परदेशात वापरता येईल का?
१) नाही. डिजिटल रुपीचा वापर फक्त देशांतर्गत करता येईल. आपण सध्या प्रत्यक्ष चलनात असलेल्या नाणी किंवा नोटा (फिजिकल रुपी करन्सी) वापरून जसे व्यवहार करतो, तेच तसेच व्यवहार देशभरात करण्याची सोय उपलब्ध आहे.

प्रश्न (देवेंद्र नाईक): डिजिटल रुपी व अन्य क्रिप्टो करन्सी यात नेमका काय फरक आहे?
डिजिटल रुपी रिझर्व्ह बँकेने इश्यू केले असल्याने ते एक लीगल टेंडर असून ते भारत सरकारचे अधिकृत चलन आहे.याउलट क्रिप्टो करन्सीला हे कोणत्याही देशांचे अधिकृत चलन नाही. त्यामुळे ते सुरक्षित नाही.

आणखी वाचा-Money Mantra : केंद्र सरकारच्या फ्लोटिंग रेट सेव्हिंग्ज बाँड्सची वैशिष्ट्यं काय आहेत?

प्रश्न (शरयू मोडक) : सर्वसामान्य व्यक्तीस डिजिटल रुपीचा वापर कसा करता येईल?
१) सर्वप्रथम डिजिटल रुपी वालेट अॅप डाउनलोड करावे लागते
२) या वॉलेटमध्ये आपल्याला हव्या असलेल्या डिनॉमिनेशनचे टोकन लोड करावे लागते.
३) हे टोकन वापरून आपण घेतलेल्या वस्तू अथवा सेवांचे पेमेंट करू करता येते.
४) आपल्या वॉलेट मध्ये दुसऱ्याकडून पेमेंट मागवू शकता.
५) वॉलेटमध्ये शिल्लक असलेले टोकन रिडीम करून रक्कम आपल्या वालेट जोडलेल्या बँक खात्यात ट्रान्स्फर करू शकता.

Story img Loader