RBI Rate Cut : रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी सलग दुसर्‍यांदा २५ बेसिस पाँइट्स (०.२५ टक्के)ने रेपो दरात कपात केली आहे. चलनविषयक धोरण समिती(एमसीए)च्या तीन दिवसांच्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. काल (९ एप्रिल) जाहीर केलेल्या या निर्णयानंतर येत्या काही दिवसांत गृह, वैयक्तिक, वाहन आणि ठेवींवरील व्याजदर कमी होणार आहेत.
यापूर्वी फेब्रुवारी २०२५ मध्ये आरबीआयने २५ बेसिस पाँइट्सची कपात केली होती, ज्याचा काही प्रमाणात फायदा बँकांचा ग्राहकांना झाला होता. आता पुन्हा ही कपात केल्याने कर्जाचे दर आणखी खाली जाऊ शकतात, आणि बँकांनी ठरवल्यास याचा फायदा ग्राहकांना देखील मिळू शकतो.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या एप्रिलमधील चलनविषयक धोरण समितीच्या आढाव्यात पुन्हा रेपो दरांमध्ये कपात केली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान सध्या रेपो दरात केलेल्या कपातीमुळे गृहकर्जाचा हप्ता कमी होऊ शकतो. पण कमी म्हणजे नेमका किती कमी याबद्दल आपण जाणून घेणार आहोत.
एक कोटीच्या कर्जावर किती पैसे वाचतील?

या बातमीसह सर्व प्रिमियम कंटेंट मोफत वाचा

जर व्याजदर ५० बेसिस पॉइंटने कमी झाले तर तुम्ही तुमच्या १ कोटी रुपयांच्या गृहकर्जावर किती बचत करू शकता? याबद्दलची आकडेमोड आपण जाणून घेणार आहोत. जर तुमच्या गृहकर्जाची रक्कम १ कोटी रुपये असेल आणि त्याचा कालावधी २० वर्षांचा असेल आणि व्याजदर ९ टक्के असेल, तर तुमचा सध्याचा ईएमआय सुमारे ८९,९७३ रुपये असेल.

जर बँकेने पूर्ण ५० बीपीएस कपात केली तर तुमच्या कर्जावरील व्याजदर ८.५ टक्क्यांपर्यंत कमी होईल. तुमचा नवीन ईएमआय सुमारे ८६,७८२ रुपये असेल. याचा अर्थ दरमहा ३,१९० रुपये आणिवर्षभरात सुमारे ४७,८८० रुपये असेल. म्हणजेच कर्जाच्या संपूर्ण कालावधीसाठी तुम्हाला ७.६५ लाख रुपयांपेक्षा जास्त सूट मिळेल.

मूळ व्याजदर – ९ टक्के ; सुधारित व्याजदर: ८.५ टक्के; कालावधी २० वर्षे (सोर्स – Bankbazaar.com)

रक्कममूळ ईएमआय सुधारित ईएमआयमूळ व्याजदर सुधारित व्याजदर ईएमआय बचत व्याज बचत
३०,००,००० रुपये
२६,९९२ रुपये २६,०३४ रुपये३४,७८,०२७ रुपये३२,४८,३२७ रुपये९५७ रुपये२,२९,७०० रुपये
४०,००,००० रुपये
३५,९८९ रुपये३४,७१३ रुपये४६,३७,३६९ रुपये४३,३१,१०३ रुपये१,२७६ रुपये३,०६,२६६ रुपये
५०,००,००० रुपये
४४,९८६ रुपये४३,३९१ रुपये५७,९६,७११ रुपये५४,१३,८७९ रुपये१,५९५ रुपये३,८२,८३३ रुपये
६०,००,००० रुपये५३,९८४ रुपये५२,०६९ रुपये६९,५६,०५४ रुपये६४,९६,६५५ रुपये१,९१४ रुपये४,५९,३९९ रुपये
७०,००,००० रुपये६२,९८१ रुपये६०,७४८ रुपये८१,१५,३९६ रुपये७५,७९,४३० रुपये२,२३३ रुपये५,३५,९६६ रुपये
८०,००,००० रुपये७१,९८७ रुपये६९,४२६ रुपये९२,७४,७३८ रुपये८६,६२,२०६ रुपये२,५५२ रुपये६,१२,५३२ रुपये
१,००,००,००० रुपये८९,९७३ रुपये८६,७८२ रुपये१,१५,९३,४२३ रुपये१,०८,२७,७५८ रुपये३,१९० रुपये७,६५,६६५ रुपये

मराठीतील सर्व मनी-मंत्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rbi rate cut know how much can people save on rs 50 lakh home loan if rbi cuts repo rate by 50 bps marathi news rak