SBI Amrit Kalash Special FD Scheme : देशातील सर्वात मोठी सार्वजनिक बँक एसबीआयने ‘अमृत कलश’ ही विशेष एफडी योजना पुन्हा सुरू केली आहे. आता गुंतवणूकदार या विशेष एफडीमध्ये ३० जून २०२३ पर्यंत गुंतवणूक करू शकतात. तत्पूर्वी SBI च्या ‘अमृत कलश’ विशेष FD योजनेची मुदत ३१ मार्च रोजी संपुष्टात आली होती.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
SBI ने ही योजना १५ फेब्रुवारी २०२३ ला लाँच केली. त्यानंतर ही योजना ३१ मार्च २०२३ पर्यंत खुली होती. आता बँकेने १२ एप्रिल रोजी पुन्हा ती सुरू केली आहे. ही ३० जून २०२३ पर्यंत खुली आहे. या योजनेत २ कोटी रुपयांपर्यंतची गुंतवणूक करता येते. या योजनेअंतर्गत ग्राहकांना मासिक, त्रैमासिक किंवा सहामाही आधारावर व्याज भरण्याचा पर्याय मिळेल. प्राप्तिकर कायद्यांतर्गत या योजनेवर टीडीएस लागू आहे. तसेच या योजनेमध्ये मुदतपूर्तीपूर्वी पैसे काढण्याची किंवा त्याच्या आधारावर कर्ज घेण्याची सुविधा उपलब्ध आहे. अमृत कलश स्पेशल एफडी योजना पुन्हा सुरू करण्याची अधिसूचनादेखील बँकेच्या अधिकृत वेबसाइटवरून काढून टाकण्यात आली आहे. परंतु ती पुन्हा सुरू करत असल्याचं आता एसबीआयकडून सांगितले जात आहे.
‘अमृत कलश’वर व्याज आणि परिपक्वता
अमृत कलश ही SBI द्वारे ऑफर केलेली विशेष FD योजना आहे. त्यावर सर्वसामान्य नागरिकांना ७.१० टक्के तर ज्येष्ठ नागरिकांना ७.६० टक्के व्याज देण्यात येते. त्याचा परिपक्वता कालावधी ४०० दिवसांचा आहे. दोन कोटी रुपयांपेक्षा कमी पैशांची एफडी असली तरी या योजनेचा लाभ मिळतो.
हेही वाचाः भारत लवकरच इलेक्ट्रॉनिक उत्पादन केंद्र बनणार, वेदांताने २० कोरियन डिस्प्ले कंपन्यांशी केला करार
अमृत कलश योजनेची इतर वैशिष्ट्ये
एसबीआय अमृत कलश स्पेशल एफडीमध्ये शाखेला भेट देऊन किंवा ऑनलाइन गुंतवणूक करू शकता. यामध्ये तुम्ही मॅच्युरिटी पूर्ण होण्यापूर्वीच पैसे काढू शकता आणि त्यात कर्ज घेण्याची सुविधाही दिली आहे. अमृत कलश स्पेशल एफडीमध्ये तुम्हाला मासिक, त्रैमासिक, सहामाही किंवा परिपक्वतेवर व्याज मिळू शकते.
हेही वाचाः Ex-Dividend Shares: आठवड्याभरात गुंतवणूकदारांना ‘या’ शेअर्सवर मिळणार मोठा फायदा, पाहा संपूर्ण यादी
SBI मधील FD वर व्याज किती?
७ दिवस ते ४५ दिवस – ३.००%
४६ दिवस ते १७९ दिवस – ४.५०%
१८० दिवस ते २१० दिवस – ५.२५%
२११ दिवस ते एक वर्षापेक्षा कमी – ५.७५ टक्के
एक वर्ष ते दोन वर्षांपेक्षा कमी – ६.८० टक्के
दोन वर्षे ते तीन वर्षांपेक्षा कमी – ७.०० टक्के
तीन वर्षांपासून ते १० वर्षे – ६.५० टक्के