निलेशच्या घराचं ‘ renovation ‘ च काम सुरू झालं होत. निलेश आणि त्याची पत्नी आनंदात होते. त्यांनी केलेले savings या कामासाठी खर्च होत होते.

दिलेल्या अंदाजापेक्षा कामाचा खर्च काहीसा वाढत गेला आणि मात्र निलेशला चिंता वाटू लागली.

investment tips
Money Mantra: घसरलेल्या मार्केटमध्ये गुंतवणुकीस सुरुवात करताय? मग या टिप्स खास तुमच्यासाठी
What is the reason behind the Sensex fall that cost investors Rs 7 lakh crore
मार्केट वेध: सेन्सेक्सची १२०० अंशाहून मोठी आपटी; गुंतवणूकदारांच्या…
Mumbai Stock market share market Sensex nifty
शेअर बाजाराचा सप्ताहरंभ ‘सेन्सेक्स’च्या ४५० अंशांच्या तेजीने; पण ट्रम्प २.० धोरणे तेजीला टिकवू देतील?
stp benefits loksatta
धन जोडावे : अस्थिर बाजारात पुढे काय?
lic mf medium to long duration fund
संभाव्य व्याजदर कपातीचा लाभार्थी, ‘एलआयसी एमएफ मीडियम टू लाँग ड्युरेशन फंड’ कसा आहे?
gold import india
अर्थसंकल्प २०२५-२६ : अन्नधान्य, सोने आयातनिर्भरतेविरुद्ध युद्धपातळीवर उपाय गरजेचे
my portfolio latest news in marathi
माझा पोर्टफोलियो – पोर्टफोलिओचा भक्कम आधारस्तंभ : ओएनजीसी
5 major developments in stock market to watch out for in coming week Which stocks will give you big gains this week
मार्केट वेध : शेअर बाजारात येत्या आठवड्यात या ५ प्रमुख घडामोडींवर लक्ष हवे? आठवड्यातील धनलाभ देणारे शेअर्स कोणते?
market stability loksatta news
तिमाही निकाल बाजाराला सावरतील?

त्याने आणि त्याच्या पत्नीने त्यांचे कष्टाचे पैसे अनेक पर्यायांमध्ये गुंतवले होते, पण आत्ता नेमके कुठून पैसे काढता येतील याचं उत्तर सापडत नव्हतं!

Fixed deposit होते पण rate of interest चांगला मिळेल म्हणून ते मोठ्या कालावधीसाठी गुंतवले होते. आता त्यातून पैसे काढणे म्हणजे penalty तर लागणार आणि पुढे मिळू शकणाऱ्या इंटरेस्टचं नुकसान होणार.

हेही वाचा… Money Mantra: विमा संरक्षण वाढत जाणारी विमा पॉलिसी

मित्रांच्या सांगण्यावरून म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक केली होती. सगळे इक्विटी प्रकारातले फंड होते. मार्केट परफॉर्मन्समुळे त्यातही फारशी प्रगती नव्हती. आणि त्यात एक्झीट लोड , टॅक्स इत्यादीचा विचार आलाच. काही बाँड घेतले होते पण सेकंडरी मार्केट मध्ये लगेच विकता येतील का ते पाहावे लागणार होते.

छोट्या कालावधीच्या loan चा विचार करणं त्याने सुरू केलं.

बरेचदा आपण आपले कष्टाचे पैसे विविध पर्यायांमध्ये गुंतवतो. पण आज बाजारात उपलब्ध असणारे गुंतवणुकीचे पर्याय, त्यांचे फायदे तोटे, नियम आणि अटी इ वेगवेगळ्या आहेत.

हेही वाचा… Money Mantra: शेअरबाजारातील व्यवहार: गुंतवणूक की व्यवसाय?

सामान्यतः आपण आपल्या गरजा अथवा ध्येय आणि ते पर्याय आणि त्यांची योग्यता यांची सांगड घालत नाही. ऐकीव माहितीवर, जास्त परतावा मिळण्यासाठी पैसे गुंतवतो पण हेच पैसे ‘ आपल्याला हवे तेव्हा आपल्या कामाला ‘ येतातच असं नाही.

म्हणूनच कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही पुढील सोपे निकष ठरवा आणि मगच गुंतवणूक करा. यामुळे तुमचेच पैसे तुमच्या योग्यप्रकारे उपयोगी येतील.

१. ध्येय निश्चिती करा

कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी ती आपण का करत आहोत ते ठरवणे महत्वाचे. यासाठी आपले ध्येय निश्चित केले पाहिजे. आपल्या आर्थिक जबाबदाऱ्या, वय , गरजा , इच्छा यांवर आपली ध्येय ठरत असतात. कमी, मध्यम आणि लांब पल्ल्याची ध्येय एकदा ठरवली की गुंतवणुकीचा सुयोग्य पर्याय निवडणे सोपे जाते.

२. गुंतवणुकीचा कालावधी ठरवा

ध्येय निश्चिती झाली की त्या ध्येयानुसार गुंतवणुकीचा कालावधी ठरतो. ध्येय साध्य करण्यासाठी लागणारा कालावधीनुसार तुम्ही सुयोग्य कालावधीचे पर्याय shortlist करू शकता.

३. स्वतः ची जोखीम क्षमता तपासा

गुंतवणूक केल्यावर, अनेक इकॉनॉमिक कारणांमुळे, आपल्या गुंतवलेल्या पैशांमध्ये होणारे चढउतार आपण ‘ मानसिक ‘दृष्ट्या कसे हाताळू शकतो हे पाहणेही खूप महत्त्वाचे ठरते. आपल्या कष्टांच्या पैशांवर गुंतवणूक केल्यावर आपण घेत असलेली जोखीम तपासणे गरजेचे. आपली प्रत्येकाची जोखीम क्षमता आपले वय, उत्पन्न, ध्येय, आर्थिक जबाबदाऱ्या, गुंतवणूक कालावधी, त्या गुंतवणूक पर्यायाचे आपल्याला असलेले ज्ञान इ गोष्टींवर अवलंबून असते. निवडलेल्या गुंतवणूक पर्यायाची जोखीम क्षमता ही आपल्या जोखीम क्षमतेशी मिळती जुळती हवी.

४. गुंतवणुकीच्या विविध पर्यायांची माहिती आणि ज्ञान

आज बाजारात गुंतवणुकीचे अनेकविध पर्याय उपलब्ध आहेत. यात काही बाजार जोखीम क्षमतेच्या आधीन आहेत, काही ठोस परतावा देणारे, काही बचत करण्यासाठी उपयुक्त तर काही सरकार पुरस्कृत आहेत. पूर्वी पोस्ट ऑफिस, बँक एफडी इत्यादींमध्ये सीमित असलेले पर्यायांमध्ये आज विविध प्रकारचे म्युच्युअल फंड, बाँड, एनसीडी म्हणजेच ‘ non convertible debentures’, शेअर्स, कॉर्पोरेट एफडी , पब्लिक प्रोविडेंट फंड, नॅशनल पेन्शन स्कीम इ वाढ झाली आहे.

अगदी सगळ्या प्रकारचे बारकावे आणि ज्ञान तुम्हाला माहीत करून घेता आले नाही तरी किमान basic माहिती तुम्हाला असणे गरजेचे आहे.

जसं की

१. गुंतवणुकीच्या पर्यायाचा स्त्रोत आणि त्याची अधिकृत माहिती
२. गुंतवणूक कालावधी
३. गुंतवणूक करताना आणि काढून घेताना लागणारी कमीत कमी गरजेची रक्कम आणि गुंतवणूक रक्कम मर्यादा
४. गुंतवणूक करताना आणि काढून घेताना लागू होणारे नियम, lock -in period इत्यादी
५. गुंतवणुकीचा प्रकार उदा. Equity, debt , Government backed up etc
६. परतावा दर आणि तो मिळण्याचे पर्याय उदा. मासिक, वार्षिक, बाजार जोखीम च्या आधीन इत्यादी
७. सिंगल किंवा जॉइंट investment चा पर्याय
८. नॉमिनेशनची सुविधा आणि अटी
९. गुंतवणूक केलेले आपले पैसे आणि त्याचा performance पाहण्यासाठी पर्याय
१०. काही अडचण अथवा शंका आल्यास संबंधित संपर्क क्रमांक उदा. बँक relationship manager चा sampark क्रमांक
१२. लागू होणारी कर प्रणाली
१३. अतिरिक्त चार्जेस जसं की एक्झीट load अथवा penalty

या प्रमाणे अधिकृत सूत्रांकडून ठोस माहिती घेऊन, आपले स्वतः चे गुंतवणुकीचे निकष ठरवून मगच सुयोग्य पर्यायाची निवड करणे हिताचे!

Story img Loader