Real Estate vs Mutual Funds : गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्हाला अनेक गोष्टींचा विचार करावा लागतो आणि त्यानंतरच तुम्ही पैसे कुठे गुंतवायचे, त्यानुसार यादी तयार करता. दीर्घ मुदतीबद्दल बोलायचे झाल्यास काही गुंतवणूकदार रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करतात, तर काही म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक करण्याला प्राधान्य देतात. गुंतवणूक सुरू करण्यापूर्वी गुंतवणूकदारांच्या मनात एक संभ्रम असतो. तो म्हणजे रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करणे चांगले की म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करणे. दोघांपैकी गुंतवणुकीसाठी कोणते चांगले माध्यम आहे, त्याची तुलना करून तुम्हाला ते ठरवता येईल.

नेमकी कायदेशीर समस्या काय?

रिअल इस्टेटची एक समस्या ही कायदेशीर परिणामांसह निर्माण होते. कोणत्याही मालमत्तेबाबत काही कायदेशीर अडचण असल्यास हे प्रकरण दीर्घकाळ चिघळू शकते. यामुळे मालमत्तेचे मूल्यही कमी होते आणि त्यामुळे तुमचे पैसे दीर्घकाळ अडकून राहू शकतात. दुसरीकडे SEBI म्युच्युअल फंडांचे नियमन करते, त्यामुळे त्यात कायदेशीर अडचणी येण्याची शक्यता फारच कमी असते.

Bharatiya Janata Party continues to pursue the state government for waiver of penalty on property tax panvel municipal corporation
पनवेल: शास्तीमाफीसाठी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
mmrda acquire farmers lands in 124 villages of uran panvel and pen for third mumbai
भूसंपादनाविरोधात शेतकऱ्यांची एकजूट; उरण, पनवेलमधील १२४ गावे संपादित करण्याची अधिसूचना
supreme court marital dispute case
Factors to decide Alimony Amount: घटस्फोटानंतर पोटगीची रक्कम किती असावी? सर्वोच्च न्यायालयाने सांगितले ८ महत्त्वाचे घटक
impeachment motion against justice Shekhar Yadav
अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींविरोधात महाभियोगाची शक्यता; महाभियोग म्हणजे काय? आजवर किती न्यायाधीशांवर झाली कारवाई?
Panvel Virar House expensive , House expensive Panvel,
पाच वर्षात पनवेल, विरारची घरे महागली; दोन्ही ठिकाणच्या किमतीत ५८ टक्क्यांनी वाढ
taloja housing project fraud case court takes serious note of the plight of flat buyers
तळोजास्थित गृहप्रकल्प कथित फसवणूक प्रकरण : सदनिका खरेदीदारांच्या दुर्दशेची न्यायालयाने घेतली गंभीर दखल
sunk deposits loksatta news
विश्लेषण : बुडालेल्या ठेवी परत मिळू शकतात? शासनाचे नवे परिपत्रक काय?

…तर मालमत्तेची देखरेख करणे खूप कठीण

जर तुम्ही भागीदारीत मालमत्ता खरेदी केली असेल किंवा एखाद्या दुर्गम भागात मालमत्ता खरेदी केली असेल तर त्याची देखरेख करणे खूप कठीण आहे. जर तुम्ही तसे करू शकत नसाल तर तुम्हाला कायदेशीर समस्यांना सामोरे जावे लागू शकते. दुसरीकडे जेव्हाही तुम्ही म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता, तेव्हा तुमच्या उद्देशानुसार तुमचे पैसे वाढत आहेत की नाही याचाही तुम्ही मागोवा घेऊ शकता.

म्युच्युअल फंडामध्ये फक्त ५०० रुपयांत SIP सुरू करा

रिअल इस्टेटमध्ये गुंतवणुकीसाठी भरपूर पैसे लागतात, तर म्युच्युअल फंडातही कमी रकमेने सुरुवात करता येते. तुम्ही म्युच्युअल फंडामध्ये फक्त ५०० रुपयांत SIP देखील सुरू करू शकता, जे दरमहा तुमच्या बँक खात्यातून आपोआप कापले जातील आणि काही काळानंतर तुमच्याकडे भरपूर भांडवल तयार होईल.

हेही वाचाः आधार आणि पॅन तात्काळ करा लिंक अन्यथा आयटीआर परतावा मिळणार नाही, टीडीएसवरही परिणाम होणार

कर दायित्व कोणते चांगले?

रिअल इस्टेट आणि म्युच्युअल फंड या दोन्हीमध्ये गुंतवणूक केल्यावर तुम्हाला कर लाभ मिळू शकतात. काही म्युच्युअल फंडांमध्ये तुम्हाला १.५ लाख रुपयांपर्यंतच्या ठेवींवर कलम ८० सीअंतर्गत कर लाभ मिळू शकतो. रिअल इस्टेटमध्ये इंडेक्सेशनद्वारे गुंतवणूकदार कर वाचवू शकतात.

म्युच्युअल फंडातून गरजेच्या वेळी पैसे काढता येणार

पैसे गुंतवण्यापूर्वी गुंतवणूकदार तरलतेकडेही लक्ष देतात, म्हणजे गरजेच्या वेळी त्यांच्या हातात किती लवकर रोकड मिळू शकेल. या निकषावर म्युच्युअल फंड अधिक चांगले आहेत, कारण रिअल इस्टेट गुंतवणुकीतून बाहेर पडणे ही वेळखाऊ प्रक्रिया आहे. याउलट म्युच्युअल फंडातून तुम्हाला हवे तेव्हा तुम्ही घरी बसून तुमचे पैसे ऑनलाइन काढू शकता.

हेही वाचाः एअर इंडियाचा रेकॉर्ड मोडत ‘ही’ कंपनी इतिहास रचण्याच्या तयारीत; ५०० विमानांची सर्वात मोठी ऑर्डर देणार?

गुंतवणूक प्रक्रिया कशी असते?

रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करताना अनेक प्रक्रिया आणि कागदपत्रे द्यावी लागतात. याशिवाय गुंतवणूकदारांना CERSAI शुल्क, मुद्रांक शुल्क, नोंदणी शुल्क इत्यादी भरावे लागतात. अशा परिस्थितीत ही खूप वेळखाऊ प्रक्रिया असल्याचे सिद्ध होते. याउलट म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्यास काही मिनिटे लागतात. तुम्ही यामध्ये SIP द्वारे गुंतवणूक केल्यास तुमच्या बँक खात्यातून नियमित अंतराने पैसे आपोआप कापले जातात आणि त्यासाठी कोणताही अतिरिक्त खर्च लागणार नाही.

मालमत्तेतून फारसा परतावा मिळत नाही

गुंतवणूकदार रिअल इस्टेटकडे आकर्षित होत आहेत. गेल्या काही वर्षांपासून ही एक जोखमीची गुंतवणूक राहिली असली तरी त्यातून फारसा परतावा मिळत नाही. दुसरीकडे म्युच्युअल फंड मध्यम जोखमीसह उच्च परतावा देत आहे. रिअल इस्टेटला दरवर्षी ७-११% परतावा मिळतो, तर म्युच्युअल फंड निवडलेल्या फंडावर अवलंबून १४-१९% परतावा मिळवू शकतात. दीर्घ कालावधीसाठी म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक केल्याने चांगला परतावा मिळू शकतो, कारण रिअल इस्टेटच्या विपरीत चक्रवाढ व्याजाने पैसे वाढतात.

Story img Loader