अजय वाळिंबे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

चेन्नईस्थित रेडिंग्टन लिमिटेड ही भारतातील तसेच जगभरातील तंत्रज्ञान आणि संप्रेषण क्षेत्रातील उत्पादनांची एक अग्रगण्य वितरक आणि पुरवठा कंपनी आहे. कंपनी भारतातील माहिती तंत्रज्ञान उत्पादनांची दुसऱ्या क्रमांकाची मोठी वितरक असून दोनशेहून अधिक जागतिक तंत्रज्ञान नाममुद्रांच्या उत्पादनांची प्रमुख वितरक आहे. तंत्रज्ञान उत्पादनांची निर्मिती आणि पायाभूत सुविधांच्या दुरुस्ती आणि देखभाल क्षेत्रातही कंपनी कार्यरत आहे. रेडिंग्टन भारतात पीसी, नोटबुक्स, टॅब्लेट, प्रिंटिंग सोल्युशन्स, सर्व्हर, स्टोरेज, सॉफ्टवेअर, नेटवर्किंग सोल्युशन्स, सिक्युरिटी सोल्युशन्स, स्मार्ट फोन आणि क्लाऊड यासारख्या उत्पादनांच्या पोर्टफोलिओची विस्तृत श्रेणी प्रस्तुत करते. रेडिंग्टनची जागतिक बाजारपेठांमध्ये तुर्कस्तान, संयुक्त अरब अमिराती, सिंगापूर, सौदी अरेबिया, नायजेरिया आणि कतार येथे प्रमुख उपस्थिती आहे.

रेडिंग्टनचे अनेक (चारशेहून अधिक) आंतरराष्ट्रीय नामांकित ब्रँड भागीदार असून यांत ॲपल, डेल, नोकिया, ॲमेझॉन वेब सेवा, हिताची, रेड हॅट, एप्सन, मोटोरोला, सॅमसंग, फिजित्सू, सॅनडिस्क, ओप्पो, मॅकफी, मायक्रोसॉफ्ट, एचपी, हुआवी, फोर्टिनेट, आसुस, अवाया, एसर, कॅनन, लिनोव्हो आदींचा समावेश होतो. रेडिंग्टनचे देशांतर्गत आणि परदेशात दोनशेहून अधिक विक्रेते या नाममुद्रेअंतर्गत उत्पादने बाजारपेठेपर्यंत पोहचवतात. कंपनीच्या विक्रेत्यांकडून प्रामुख्याने ॲपल, एचपी, डेल, लिनोव्हो आणि सॅमसंग या नाममुद्रांची उत्पादने विकली जात असून, त्यांचे कंपनीच्या महसुलात ६० टक्क्यांहून अधिक योगदान आहे. ॲपलकडून भारतात स्वत:ची विक्री दालने सुरू करून रेडिंग्टनच्या विक्रीत ॲपलचा वाटा सर्वाधिक आहे.

हेही वाचा >>>Money Mantra : ध्येय उद्दिष्ट गाठण्यासाठी अशी करा आखणी

भारतामध्ये कंपनीची ४५ विक्री कार्यालये, १६४ गोदामे विविध ठिकाणी पसरलेली आहेत. तर परदेशांत ३८ विक्री कार्यालये, ३६ गोदामे, २० सेवा केंद्रे आणि २० भागीदार सेवा केंद्रे आहेत. रेडिंग्टन विविध विभागांद्वारे सेवा पुरवते यांत प्रामुख्याने पुढील सेवांचा समावेश होतो:

ग्राहक व्यवसाय (संगणक, प्रिंट आणि पीसी उपकरणे),

एंटरप्राइझ व्यवसाय (उत्पादने, सर्व्हर, स्टोरेज, सुरक्षा, नेटवर्किंग,

मोबिलिटी व्यवसाय

क्लाऊड सेवा आणि डिजिटल प्रिंटिंग

सौर (सोलर)

सल्लागार

हेही वाचा >>>Money Mantra : रिझर्व्ह बँकेचे पतधोरण जाहीर, व्याजदर जैसे-थे, बाजाराचा निराशेचा सूर !

रेडिंग्टनच्या दोन भारतीय पूर्ण मालकीच्या उपकंपन्या आहेत. प्रोकनेक्ट सप्लाय चेन सोल्युशन्स लिमिटेड आणि रेडसर्व्ह ग्लोबल सोल्युशन्स लिमिटेड. तसेच कंपंनीच्या ५७ आंतरराष्ट्रीय उपकंपन्या आहेत. ‘एए’ असे उत्तम पतमानांकन असलेल्या या कंपनीचे तिसऱ्या तिमाहीचे आर्थिक निष्कर्ष नुकतेच जाहीर झाले आहेत. कंपनीने उलाढालीत ८ टक्के वाढ दाखवून ती २३,५५० कोटींवर गेली आहे. मात्र नक्त नफ्यात १० टक्के घट होऊन तो ३४१ कोटींपर्यंत खाली आला आहे. अनेक जागतिक उत्तम ब्रँड्सची विक्री, विक्रीपश्चात सेवा आणि लॉजिस्टिक्स सांभाळणाऱ्या रेडिंग्टनचा विस्तार जगभरातील ३० देशांत असून आगामी कालावधीतदेखील कंपनीकडून भरीव कमगिरीची अपेक्षा आहे.

रेडिंग्टन लिमिटेड (बीएसई कोड ५३२८०५)

www.redingtongroup.com

बाजारभाव: रु. १९०/-

प्रमुख उत्पादन/ व्यवसाय: ट्रेडिंग/वितरण, लॉजिस्टिक्स

भरणा झालेले भाग भांडवल: रु.१५६.३४ कोटी

शेअर होल्डिंग पॅटर्न (%)

प्रवर्तक —-

परदेशी गुंतवणूकदार ५६.९९

बँक/ म्युच्युअल फंड/ सरकार १७.९५

इतर/ जनता २५.०६

पुस्तकी मूल्य: रु. ८८.२

दर्शनी मूल्य: रु. २/-

लाभांश: ३६०%

प्रति समभाग उत्पन्न: रु. १५.३९

किंमत उत्पन्न गुणोत्तर: १२.४

समग्र किंमत उत्पन्न गुणोत्तर: ३७.७

डेट इक्विटी गुणोत्तर: ०.४८

इंटरेस्ट कव्हरेज गुणोत्तर: ५.४४

रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लोईड (आरओसीई): २४.९

बीटा : ०.९

बाजार भांडवल: रु. १४,९०० कोटी (स्मॉल कॅप)

वर्षभरातील उच्चांक/ नीचांक: २१२/१३६

Stocksandwealth@gmail.com