तृत्पी राणे

एक सर्वसामान्य गुंतवणूकदार जेव्हा पैसे गुंतवतो, तेव्हा तो फक्त फायद्याची अपेक्षा करतो. अर्थात यात काही चुकीचंदेखील नाही. परंतु किती फायदा होईल या प्रश्नाबरोबर किती नुकसान होऊ शकेल, हा विचार करणारी फार कमी मंडळी असतात. साधारणपणे मागील परतावे बघून आपण गुंतवणूक करतो आणि जेव्हा आपली गुंतवणूक तोट्यात जाते तेव्हा ‘आपलं काय चुकलं’ म्हणून विचार करतो. बरेच वेळा आपण याचं खापर दुसऱ्यावर (वितरक, सल्लागार, मित्र इत्यादी!) किंवा अगदी कोणी मिळालं नाही तर शेअर बाजारावर फोडून मोकळे होतो. मागील लेखामध्ये मी एक गोष्ट वाचकांच्या लक्षात आणून दिली होती, ती म्हणजे – नुकसान कमी ठेवा! आजच्या लेखातून आपण नुकसान व्यवस्थापन कसं करायचं हे समजून घेऊ या!

Indian Railways Compensation for Death| Compensation for Natural Death in Trains
रेल्वे प्रवासादरम्यान प्रवाशाचा नैसर्गिक मृत्यू झाल्यास नुकसान भरपाई मिळते का? काय आहेत रेल्वेचे नियम?
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Taloja MIDC road accident
भरधाव मोटार उलटून तरुणीचा मृत्यू; मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर अपघात; सात जण जखमी
Mumbai national park encroachment loksatta news
राष्ट्रीय उद्यान लुप्त होईल… अतिक्रमणांवर कारवाई न केल्यावरून उच्च न्यायालयाची सरकारवर टीका
worker dies after falling from terrace case registered against contractor for negligence
गच्चीवरुन पडल्याने कामगाराचा मृत्यू; ठेकेदाराविरुद्ध गुन्हा दाखल
One person died, eight injured , vehicle fell in valley,
ठाणे : वाहन दरीत कोसळून एकाचा मृत्यू तर आठ जण जखमी
Maharashtra ST Bus Service
एसटीच्या इलेक्ट्रिक बस तोट्यात, सरासरी एका किलोमीटर मागे…
youth who attacked builder gets 10 year jail
बांधकाम व्यावसायिकावर कुऱ्हाडीने वार करणाऱ्या तरुणाला सक्तमजुरी; न्यायालयाकडून आरोपीला पाच लाखांचा दंड

नुकसान व्यवस्थापन तीन पद्धतीने करता येते – नुकसान व्हायच्या आधीचे (प्रतिबंधात्मक किंवा Preventive Loss Management), नुकसान होत असताना (प्रासंगिक किंवा Incidental Loss Management), आणि नुकसान झाल्यानंतर (घटनोत्तर किंवा Post Facto Loss Management).

१. प्रतिबंधात्मक – नुकसान होऊ नये म्हणून केलेली कृती. गुंतवणुकीच्या बाबतीत म्हणायचं झालं तर गुंतवणुकीतून नुकसान होऊ नये म्हणून तिच्याबाबतीत केलेला तपास, चौकशी, आपल्या जोखीमक्षमतेनुसार तिचा पोर्टफोलिओमधील ठरविलेला वाटा, वेळोवेळी तिचा मागोवा घेणं आणि सगळं अपेक्षेनुसार सुरू आहे याची खात्री करणं – हे सगळं येतं. एखाद्या शेअरमधील गुंतवणुकीचं उदाहरण इथे आपण घेऊ शकतो. शेअर घ्यायच्या आधी त्याचं विशलेषण (फंडामेंटल / टेक्निकल) करून मग बाजाराची परिस्थिती, आपलं ॲसेट अलोकेशन हे सगळं बघून आपण त्यात गुंतवणूक करतो. मग तो शेअर पुढे कशी कामगिरी करतो किंवा ती कंपनी कशी वाढते हे आपण वेळोवेळी तपासत राहतो. कंपनीचा वार्षिक आणि त्रैमासिक अहवाल वाचतो, मार्केट रिसर्च रिपोर्ट चाळतो. त्याही पुढे जाऊन काही जण तर जागतिक पातळीचे विचारसुद्धा करतात. अशा पद्धतीने केलेल्या गुंतवणुकीतून नुकसान होणारच नाही असं इथे अजिबात सांगायचं नाहीय. परंतु नुकसान व्हायची शक्यता कमी मात्र नक्की होते. या गोष्टीचा सर्वात मोठा फायदा नुकसान झालं तर काय करायचं या प्रश्नाच्या उत्तरामध्ये सापडतं. एक सजग गुंतवणूकदार नुकसानीला घाबरत नाही, परंतु आपल्या हातात शक्य असलेल्या गोष्टी करून तो नुकसान होणार नाही किंवा झालं तरी कमी होईल ही खबरदारी वेळोवेळी घेत असतो. विमा कवचसुद्धा याच पद्धतीने काम करतं.

२. प्रासंगिक – सगळ्यांनाच सगळ्याच वेळी नुकसान होणार नाही असं फारच क्वचित घडतं. साधारणपणे पोर्टफोलिओ म्हटलं की, काही टक्के गुंतवणूक फायद्यात आणि त्याच वेळी काही टक्के गुंतवणूक तोट्यात असू शकते. परंतु तोटा हा कायमस्वरूपी आहे की तात्पुरता हे तोटा होत असताना लक्षात येणं खूप महत्त्वाचे आहे. शिवाय कधी कधी तर मुद्दाम ‘कॉन्ट्रा’ अर्थात विपरीत दृष्टिकोन ठेऊन तात्पुरती तोट्यात असलेली गुंतवणूक घेतली जाते. तोटा येत्या काळात फायद्यामध्ये परावर्तित होईल, ही आशा त्यामागे असते. म्ह्णून तोटा होत असताना त्याचा पुरेपूर पडताळा करून, तो कमी करता येईल का हे पाहावं. इथे आपण ‘स्टॉप लॉस’चं उदाहरण घेऊ या. शिस्तबद्ध रीतीने डे ट्रेडिंग करणारे नेहमीच या पद्धतीने आपलं नुकसान कमी करतात. यासाठी प्रत्येक गुंतवणूकदाराने स्वतःची नुकसान पातळी ठरवून आणि भावनाशून्य होऊन तिचा नियमितपणे वापर केल्यास, तोटा कमी होण्यामध्ये नक्कीच मदत होते.

आरोग्य विमा आहे म्हणून कुणी मुद्दाम आजारी पडतं का, किंवा उगीचच ट्रीटमेंट वाढवून खर्च वाढवतं का? नाही ना, मग गुंतवणुकीच्या बाबतीत नुसतं तिचा तोटा वाढत राहतोय हे बघत बसण्यात मला काही तथ्य वाटत नाही. काही काळ नुकसान सहन करून जर पुढे चांगला फायदा होत असेल तर ते ठीक आहे. परंतु चुकीच्या किमतीला घेतलेला शेअर परत त्याच किमतीवर येईस्तोवर न विकणे हे जास्त नुकसानदायक असते. त्यापेक्षा थोडा तोटा सहन करून मिळालेले पैसे चांगल्या ठिकाणी गुंतविले तर पोर्टफोलिओचा परतावा हा नक्कीच जास्त होईल.

३. घटनोत्तर – इथे आपण अशा नुकसानाकडे बघतो ज्याचा आपण अंदाज बंधू शकलो नव्हतो. उदाहरण घ्यायचं तर एका कंपनीच्या रोख्याचं घेऊ या. चांगली दर्जेदार कंपनी जेव्हा बाजारात रोखे आणून कर्ज घेते तेव्हा तिच्या मागील कामगिरी, पुढील धोरणं आणि प्रवर्तकांची हमी इत्यादी गोष्टींचा विचार करून गुंतवणूकदार आपले पैसे तिच्या रोख्यांमध्ये गुंतवतात. परंतु काही कारणास्तव कंपनीला खूप मोठं नुकसान झालं आणि कंपनी बुडीत गेली तर ही गोष्ट अशा वेळी गुतंवणूकदाराला नंतरच कळते. काही वेळा कायद्यानुसार कधी कधी पैसे परत मिळतात, परंतु ते कसे, कधी आणि किती मिळणार हे मात्र माहीत नसतं. अशा प्रकारच्या घटनांमुळे आपल्या पोर्टफोलिओला मोठा धक्का बसू नये म्हणून आपण प्रत्येक गुंतवणुकीचं प्रमाण ठरवून त्यानुसार पोर्टफोलिओ बांधतो. तरीही नुकसान झालंच तर त्यातून जो काही मार्ग काढून पैसे परत मिळवता येतील हे बघतो. परंतु या सगळ्यामध्ये वेळ आणि पैसे दोन्हीही खर्च होतात.

तोटा झाल्यानंतरसुद्धा तो फायदा करून देतो. इथे मी प्राप्तिकर नियमांची गोष्ट करत आहे. वेगवेगळ्या प्रकारचा भांडवली तोटा आपला कर कमी करण्यात मदत करतो. तेव्हा गुंतवणूकदाराने कर सल्लागाराच्या मदतीने झालेल्या नुकसानीचा वापर करून, त्याबाबतीत योग्य पद्धतीने आणि मुदतीच्या आत कर विवरण भरून आपले कर व्यवस्थापनसुद्धा स्मार्ट धाटणीने करावं.

वरील प्रकारे नुकसान व्यवस्थापन करताना प्रत्येक गुंतवणूदाराने सजग राहणं अपेक्षित आहे. पैसे खिशातून किंवा बँकेतून जायच्या आधी हे सगळं जाणून घेऊन योग्य पद्धतीने ते करणं हीच यशस्वी पोर्टफोलिओ व्यवस्थापनाची गुरुकिल्ली आहे.

‘सेबी’ नोंदणीकृत गुंतवणूक सल्लागार

trupti_vrane@yahoo.com

Story img Loader