SIP calculator: मध्यमवर्गीय कुटुंबांना अनेकदा खर्च करण्यापूर्वी पैसे वाचवण्याची योजना तयार करून ठेवावी लागते. मुलांच्या शिक्षणाचा खर्च कदाचित आपला खिशासुद्धा रिकामा करू शकतो. त्यामुळेच दीर्घकालीन गुंतवणुकीद्वारे तुम्ही चांगला फंड जमा केला पाहिजे. लहान रकमेची बचत करून आणि ती गुंतवून मोठी रक्कम जमा केली जाऊ शकते. जर तुमच्या मुलाचे वय २०२४ मध्ये ३ वर्षे असेल, तर तो १८ वर्षांचा होईपर्यंत म्हणजेच २०४२ पर्यंत तुम्हाला २२ लाख रुपयांचा मॅच्युरिटी फंड मिळू शकेल. यासाठी तुम्हाला SIP योजनेत गुंतवणूक करावी लागेल. याचा उपयोग तुम्ही मुलांच्या शिक्षणासाठी आणि उच्च शिक्षणासाठी करू शकता.

हेही वाचाः Money Mantra : केंद्रीय कर्मचार्‍यांसाठी जुन्या पेन्शन योजनेसंदर्भात मोठे अपडेट, मोदी सरकारने संसदेत केली घोषणा

Market Technique Stock Market
बाजाराचा तंत्र-कल : शेअर बाजाराला बाळसं की सूज?
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
Germanys Warren Buffett Karl Hellerding
जर्मनीचा वॉरेन बफे : कार्ल हेलरडिंग
oil india limited portfolio
माझा पोर्टफोलियो : पोर्टफोलिओला महारत्नाची जोड
Mission on Oilseeds in Crisis due to gm soybeans
जीएम सोयाबीन विना तेलबिया मिशन संकटात
maha vikas aghadi releases manifesto for maharashtra assembly poll 2024
महिला, शेतकऱ्यांवर आश्वासनांची खैरात; मविआचा ‘महाराष्ट्रनामा’ जाहीर
Kharge slams Modi for ignoring dalit leaders in cabinet
मतांसाठीच दलित, आदिवासी हिताची भाषा ; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचा आरोप
crores of rupees seized from car in khed shivapur toll naka area
अन्वयार्थ : हजार कोटी सापडले, त्याचे पुढे काय झाले?

जाणून घ्या SIP गुंतवणूक म्हणजे काय?

पद्धतशीर गुंतवणूक योजनेला SIP म्हणतात. याद्वारे म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता येते. साधारणपणे शेअर बाजारात पैसे बुडण्याची भीती असते. जर तुम्हाला जोखमीपासून दूर राहायचे असेल आणि शेअर बाजारात थेट गुंतवणूक करायची नसेल, तर SIP गुंतवणूक तुमच्यासाठी शक्तिशाली ठरू शकते. याचा परिणाम बाजारातील चढउतारांवर होतो. या कारणास्तव तज्ज्ञांचा असा विश्वास आहे की, SIP मधील दीर्घकालीन गुंतवणूक तुमच्या गुंतवणुकीची रक्कम तोट्यापासून वाचवू शकते. SIP मध्ये ठराविक रक्कम ठराविक कालावधीत गुंतवावी लागते.

हेही वाचाः जानेवारी २०२४ पर्यंत कांदा स्वस्त होण्याची शक्यता, भाव ४० रुपये प्रति किलोच्या खाली राहण्याची मोदी सरकारला अपेक्षा

SIP कॅल्क्युलेटर: १५० रुपये गुंतवून २२ लाख कमवा!

या SIP प्लॅनमध्ये तुम्हाला दररोज १५० रुपये गुंतवावे लागतील. म्हणजे तुम्ही एका महिन्यात ४,५०० आणि एका वर्षात ५४,००० रुपयांची गुंतवणूक करता. लक्षात ठेवा तुम्हाला ही गुंतवणूक १५ वर्षांसाठी करावी लागेल म्हणजेच तुम्ही एकूण ८,१०,००० रुपये SIP मध्ये गुंतवाल. साधारणपणे SIP मध्ये दीर्घकालीन गुंतवणूक १२ टक्के वार्षिक परतावा देऊ शकते. समजा तुम्हालाही १२ टक्के परतावा मिळेल. या गणनेनुसार, तुम्हाला १५ वर्षांत फक्त ₹१४,६०,५९२ इतकेच व्याज मिळेल. जेव्हा SIP मॅच्युअर होईल, तेव्हा तुम्हाला गुंतवणुकीची रक्कम (₹ ८,१०,०००) आणि व्याजाची रक्कम (₹ १४,६०,५९२) मिळून मिळेल. म्हणजेच तुम्हाला एकूण २२,७०,५९२ रुपये मिळतील.