Income Tax Act : प्राप्तिकर कायद्याचे कलम (Income Tax Act) ८० सी तुम्हाला अनेक प्रकारची सूट देते. त्याच्या मदतीने तुम्ही एका आर्थिक वर्षात १.५ लाख रुपयांपर्यंतची प्राप्तिकर सूट मिळवू शकता. केवळ वैयक्तिक प्राप्तिकरदाते आणि HUF (हिंदू अविभक्त कुटुंब) याचा लाभ घेऊ शकतात. चला तर मग आपण समजून घेऊया की, कलम ८० सी काय आणि त्याचा तुम्हाला कसा फायदा होऊ शकतो.

जुन्या कर प्रणालीतील लोकांना याचा लाभ मिळणार

तुम्ही अजूनही जुन्या कर प्रणालीमध्ये असाल तर तुम्ही त्याचा लाभ घेऊ शकता. मात्र, त्यासाठी थोडे नियोजन करावे लागेल. यामध्ये NSC, ULIP, PPF असे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. याचा फायदा घेऊन तुम्ही भरपूर कर वाचवू शकता. प्राप्तिकर कायद्याच्या कलम ८० सी अंतर्गत उपलब्ध वजावट अनेक श्रेणींमध्ये विभागली गेली आहे. त्यांची माहिती खालीलप्रमाणे आहे.

ageing population increasing in india
वृध्दांच्या लोकसंख्येचा दर वाढता, काय आहेत आव्हानं?
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
mallikarjun kharge criticize pm narendra modi in nagpur
पंतप्रधान देशाचे असतात, पण मोदी मात्र सर्व चांगले प्रकल्प आपल्याच गृहराज्यात…खरगेंची जोरदार टीका
devendra fadnavis assured to farmers if rate is less than guaranteed price government will pay difference
“हमीभावापेक्षा कमी दर मिळाल्यास फरकाची रक्कम सरकार देणार,” उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्‍वासन
Maharashtra government financial burden
महायुतीच्या लोकप्रिय आश्वासनांमुळे तिजोरीवर दीड ते दोन लाख कोटींचा अधिक आर्थिक भार ?
pm modi said ek hai toh safe
योगींच्या ‘बटेंगे तो कटेंगे’नंतर पंतप्रधान मोदींकडून ‘एक हैं तो सेफ है’चा नारा
Assembly Elections 2024 Akkalkuwa-Akrani Assembly Constituency Congress
लक्षवेधी लढत: अक्कलकुवा: लोकसभेतील पराभवाचे उट्टे काढणार का?
Sharad Pawar, Sudhir Kothari Hinganghat,
वर्धा : अखेर शरद पवार थेट ‘हिंगणघाटच्या शरद पवारां’च्या घरी, म्हणाले…

कलम ८० सी

या अंतर्गत तुम्हाला EPF आणि PPF यांसारख्या भविष्य निर्वाह निधीमध्ये केलेल्या गुंतवणुकीवर कर सूट मिळू शकते. याशिवाय लाइफ इन्शुरन्स प्रीमियम, इक्विटी लिंक्ड सेव्हिंग स्कीम, होम लोन, सुकन्या समृद्धी योजना, NSC आणि SCSS देखील या कक्षेत येतात.

कलम ८० सीसीसी

या अंतर्गत तुम्ही पेन्शन योजना आणि म्युच्युअल फंडांमध्ये केलेल्या गुंतवणुकीवर कर सूट घेऊ शकता.

हेही वाचाः Employee Layoff : महिला कर्मचाऱ्याने बनवला नोकरीवरून काढल्यानंतर व्हिडीओ, कंपनीचे सीईओही पाहून झाले भावूक

कलम ८० सीसीडी (१)

या अंतर्गत नॅशनल पेन्शन सिस्टम आणि अटल पेन्शन योजना यांसारख्या सरकारी पाठिंबा असलेल्या योजनांमधील गुंतवणुकीवर तुम्हाला कर सूट मिळते.

हेही वाचाः शेअर बाजारात ऐतिहासिक उच्चांक, सेन्सेक्स पहिल्यांदाच ७३ हजारांच्या पार, निफ्टीने २२ हजारांचा स्तर ओलांडला

कलम ८० सीसीडी (१ बी)

NPS मध्ये ५० हजार रुपयांपर्यंतच्या योगदानाला या कलमांतर्गत सूट देण्यात आली आहे.

कलम ८० सीसीडी (२)

NPS मधील रोजगार प्रदात्याचा वाटा या कलमांतर्गत सूट मिळण्यास पात्र आहे. आता आम्ही तुम्हाला अशाच काही पर्यायांची माहिती देणार आहोत, ज्यामध्ये गुंतवणूक करून तुम्ही कर सूट मिळवू शकता.

जीवन विमा प्रीमियम

जीवन विमा पॉलिसीसाठी भरलेला प्रीमियम तुम्हाला कर लाभ देईल. यामध्ये तुम्ही स्वतःसाठी, पत्नीसाठी आणि मुलांसाठी पॉलिसी घेऊ शकता. हिंदू अविभक्त कुटुंब (HUF) चे सदस्यदेखील समान लाभांसाठी पात्र आहेत.

सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी

PPF मध्ये केलेले कोणतेही योगदान तुम्हाला कलम ८० सीअंतर्गत कर सवलतदेखील देते. यामध्ये तुम्ही जास्तीत जास्त १.५ लाख रुपये जमा करू शकता.

नाबार्ड ग्रामीण बाँड

तुम्ही नाबार्ड रुरल बाँड्समध्ये पैसे गुंतवले असले तरी तुम्हाला कर सवलत मिळते.

युनिट लिंक्ड विमा योजना

ULIP योजना तुम्हाला दीर्घकाळात चांगले परतावा देतात. वार्षिक १.५ लाख रुपये गुंतवून कर सूट मिळू शकते.

राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र

कमी जोखमीच्या योजनांमध्ये NSC ची गणना केली जाते. त्याची परिपक्वता ५ ते १० वर्षांमध्ये होते. यामध्ये तुम्ही कितीही पैसे गुंतवू शकता. पण सवलत फक्त १.५ लाख रुपयांवरच मिळणार आहे.

कर बचत एफडी

हे कोणत्याही बँक किंवा पोस्ट ऑफिसमधून खरेदी केले जाऊ शकतात. त्यांचा लॉक इन पीरियड ५ वर्षांचा आहे.

ईपीएफ

कर्मचारी भविष्य निर्वाह निधीवर मिळालेल्या परताव्यात तुम्हाला एकूण व्याजासह कर सूट मिळते. हा लाभ घेण्यासाठी तुमची नोकरी किमान ५ वर्षांची असावी.

इन्फ्रास्ट्रक्चर बाँड्स

इन्फ्रास्ट्रक्चर बाँड्स तुम्हाला ८० सीअंतर्गत कर सवलतीचा लाभ देखील देतात.

ELSS

तुम्हाला ELSS अंतर्गत कर सूट देखील मिळते. या योजनांचा लॉक इन कालावधी ३ वर्षांचा आहे.

ज्येष्ठ नागरिक बचत योजना

तुम्ही SCSS मध्ये वार्षिक १.५ लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करून कर सूट मिळवू शकता. यामध्ये तुमचे वय ६० वर्षांपेक्षा जास्त असणे अनिवार्य आहे.

गृहकर्ज

तुम्ही गृहकर्जाच्या मुद्दलाची परतफेड करूनही कर सवलत मिळवू शकता.

सुकन्या समृद्धी योजना

मुलींसाठी चालवल्या जाणाऱ्या या योजनेवर तुम्हाला ८.२ टक्के वार्षिक व्याज मिळते. या योजनेअंतर्गत करसवलतही दिली जाते.