वसंत माधव कुळकर्णी

भारतातील सर्वात जुन्या मिडकॅप फंडाला ३० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने फंड घराण्याने निवडक विश्लेषकांना निधी व्यवस्थापकांशी संवाद साधण्याच्या निमित्ताने आमंत्रित केले होते. कोठारी पायोनिअर प्रायमा (सध्याचे नांव फ्रँकलीन इंडिया प्रायमा) या नावाने हा फंड स्मॉल ॲण्ड मिडकॅप फंड म्हणून १ डिसेंबर १९९३ रोजी अस्तित्वात आला. या फंडात १ जानेवारी १९९४ ते १ मार्च २०२४ दरम्यान ३६३ महिन्यांत दरमहा १,००० रुपयांची ‘एसआयपी’ करणाऱ्या गुंतवणूकदाराच्या ३,६३,००० रुपयांचे २९ फेब्रुवारी २०२४ रोजीच्या ‘रेग्युलर ग्रोथ एनएव्ही’ नुसार १८,६१,९८८ रुपये झाले असून या गुंतवणुकीवर २०.५३ टक्के वार्षिक परतावा मिळाला आहे. फंडाच्या एनएफओमध्ये १ डिसेंबर १९९३ रोजी गुंतविलेल्या १,००० रुपयांचे २९ फेब्रुवारी २०२४ रोजीच्या ‘रेग्युलर ग्रोथ एनएव्ही’ नुसार २,१०,७५० रुपये झाले असून १९.३५ टक्के परतावा मिळाला आहे. याचा अर्थ गुंतलेले पैसे दर साडेतीन वर्षात दुप्पट होत आले आहेत.

Market Technique Stock Market
बाजाराचा तंत्र-कल : शेअर बाजाराला बाळसं की सूज?
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
dream of five and half thousand policemens house in Lohgaon will come true soon
लोहगावात साडेपाच हजार पोलिसांच्या घराचे स्वप्न लवकरच साकार
jayant patil criticize ajit pawar about koyta gang in hadapsar
पुण्यातील कोयता गँगचा बंदोबस्त करा आणि मग आमच्या पोलीस स्टेशनवर बोला : जयंत पाटील
Germanys Warren Buffett Karl Hellerding
जर्मनीचा वॉरेन बफे : कार्ल हेलरडिंग
Political Parties in Maharashtra Vidhan Sabha Election 2024
रविवार प्रचारवार; घरोघरी भेटी, गृहनिर्माण संकुलांना भेटी, चौक सभा यांना जोर
Mission on Oilseeds in Crisis due to gm soybeans
जीएम सोयाबीन विना तेलबिया मिशन संकटात
maha vikas aghadi releases manifesto for maharashtra assembly poll 2024
महिला, शेतकऱ्यांवर आश्वासनांची खैरात; मविआचा ‘महाराष्ट्रनामा’ जाहीर

ज्या वेळी हा ‘एनएफओ’ आला तेव्हा कोठारी पायोनियर ही म्युच्युअल फंड उद्योगात अपरिचित नाममुद्रा होती. त्या काळात म्युच्युअल फंड उद्योगाच्या एकूण मालमत्तेपैकी ८० टक्के मालमत्ता एकाच फंड घराण्याकडे (युनिट ट्रस्ट ऑफ इंडिया) होती. आज आघाडीच्या १० फंड घराण्यांकडे म्युच्युअल फंड उद्योगाच्या एकत्रित मालमत्तेपैकी ८० टक्के मालमत्ता आहे. यूटीआयची घसरण पहिल्या क्रमांकावरून सातव्या क्रमांकावर झाली आहे. मागील तिमाहीत यूटीआयने मालमत्ता क्रमवारीत ॲक्सिस म्युच्युअल फंडाला मागे टाकले आणि आठव्या क्रमांकावरून सातव्या स्थानावर प्रगती केली. दोन दशकांपूर्वी म्युच्युअल फंड उद्योगात यूटीआय, कॅनरा बँक, बीओआय, आणि एसबीआयसारख्या सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी प्रवर्तित केलेल्या आणि खात्रीशीर परतावा देणाऱ्या योजनांचा दबदबा होता. त्यावेळी कॅनस्टार, बीओआय डबल स्क्वेअर प्लस आणि अत्यंत लोकप्रिय ‘युनिट स्कीम १९६४’ सारख्या खात्रीशीर परतावा देणाऱ्या फंडांशी स्पर्धा करताना ‘मार्केट-लिंक्ड प्लॅन्स’ची दमछाक होत असे. अशा पार्श्वभूमीवर उदयास आलेल्या कोठारी पायोनिअर प्रायमा या फंडास फारसा प्रतिसाद मिळाला नाही. ‘एसआयपी’ संस्कृती त्या वेळी अस्तित्वात नव्हती, इलेक्ट्रॉनिक ट्रान्सफर, ‘ईसीएस’ हा प्रकारदेखील नव्हता आणि दरमहा गुंतवणूक करण्यासाठी अतिरिक्त चेकबुक बाळगण्याची आवश्यकता होती. हे अतिरिक्त चेकबुक घेण्यासाठीही त्यावेळी बँकेच्या कर्मचाऱ्यांची मनधरणी करायला लागायची. साहजिकच फंडाच्या पहिल्या एनएव्हीपासून ‘एसआयपी’ करणारा गुंतवणूकदार शोधूनही सापडायचा नाही.

हेही वाचा >>>Money Mantra: बँकिंग क्षेत्र : व्यवसाय बदलाची नांदी

कोठारी पायोनियर प्रायमा आणि ब्लूचीप (लार्जकॅप) फंडांनी केलेल्या संपत्ती निर्मितीतून साहजिकच आजच्या गुंतवणूकदारांनी धडे शिकले पाहिजेत.पहिला धडा हा की, केवळ मोठ्या नावाच्या परिचित नाममुद्रा चांगली कामगिरी करतात असे नाही. तर कठोर ‘इन्व्हेस्टमेंट प्रोसेस’ असलेले फंड संपत्तीची निर्मिती करू शकतात.दुसरा धडा, निश्चित परताव्याच्या मागे न लागता, दीर्घकालीन गुंतवणुकीतूनच संपत्ती निर्मिती करता येते.

तिसरा धडा असा की, बाजारातील चढ-उतारांचा फ्रँकलिन इंडियाच्या फंडांच्या कामगिरीवर परिणाम झाला. गेल्या ३० वर्षांत या फंडाने बरेच चढ-उतार अनुभवले, तीन प्रदीर्घ काळ चाललेल्या मंदी, फंडाच्या प्रायोजकांमध्ये बदल, वेळोवेळी फंडाच्या गुंतवणूक चौकटीतील बदल (स्मॉल ॲण्ड मिडकॅपकडून, मिडकॅप फंड म्हणून मिळालेली ओळख) या काळात सात निधी व्यवस्थापकांनी हा फंड व्यवस्थापित केला. तरीही ज्या गुंतवणूकदारांनी या घटनांकडे दुर्लक्ष करून आपली गुंतवणूक राखून ठेवली त्यांना या गुंतवणुकीने भरघोस संपत्ती निर्मितीचे माप पदरात टाकले.

निप्पॉन इंडिया ग्रोथनंतर चार आकडी ‘एनएव्ही’ गाठणारा हा दुसरा फंड ठरला आहे. दोन वर्षाच्या फरकाने अस्तित्वात आलेल्या या दोन्ही फंडांनी गुंतवणूकदारांना दीर्घकाळात कधीच निराश केले नाही. या फंडाला कॅलेंडर वर्ष १९९५, १९९६ आणि १९९७ या तीन वर्षांतील गुंतवणूकदारांना अल्प वाढ किंवा तोटा झाला. (१ ऑगस्ट १९९५ रोजी एनएव्ही रुपये १७.१७ आणि १ ऑगस्ट १९९७ रुपये १०.८८ ) याची भरपाई कॅलेंडर वर्ष १९९८, १९९९ आणि २००० या वर्षात केली गेली. (१ डिसेंबर १९९७ रुपये ८.८० ते ३ जानेवारी २००० रोजी रुपये ३८.११) ज्यांनी ‘प्रॉफिट बुकिंग’च्या नावाखाली पैसे काढून घेतले त्यांनी पुढील २३ वर्षात ५६ पट नफा कमावण्याची संधी गमावली. (२९ फेब्रुवारी २०२४ रेग्युलर ग्रोथ एनएव्ही रुपये २,१५९.७३.) हा फंड ३० वर्षापैकी ८ वर्षे ‘टॉप क्वारटाइल’मध्ये, ११ वर्षे ‘अपर मिडल क्वारटाइल’मध्ये, ४ वर्षे ‘लोवर मिडल क्वारटाइल’मध्ये, ४ वर्षे ‘मिडल क्वारटाइल’मध्ये आणि ३ वर्षे ‘बॉटम क्वारटाइल’मध्ये राहिला.

हेही वाचा >>>money montra: माझा पोर्टफोलियो : प्लास्टिक इंजिनीयरिंगमधील उत्तम गुणवत्त

एकंदरीत, तीन कारणांनी फंडातून बाहेर पडायला हरकत नसते. पहिले कारण दोन वर्षांपेक्षा जास्त काळ फंडाची मानदंडसापेक्ष खराब कामगिरी असेल तर, तुम्ही एखाद्या चांगल्या फंडात ‘स्विच’ करू शकता. तुमचा जोखिमांकाशी विपरीत गुंतवणूक असेल तर आणि तुमचे वित्तीय ध्येय साध्य करण्यास तीन वर्षांपेक्षा कमी कालावधी असेल तरच इक्विटी फंडातून नफा काढून घेणे योग्य असते. फंडाने कधीही तीन तिमाहीपेक्षा अधिक कालावधीत मानदंडसापेक्ष खराब कामगिरी केलेली नाही.

या फंडाचे विद्यमान निधी व्यवस्थापक जानकीरामन रेंगाराजू संदीप मनम आणि अखिल कल्लुरी हे आहेत. फ्रँकलिन टेम्पलटनचे एक दिग्गज निधी व्यवस्थापक केएन शिवसुब्रमण्यन यांनी या फंडाच्या निधी व्यवस्थापनाची धुरा प्रदीर्घ काळ वाहिली. या फंडाच्या तसेच फ्रँकलिन इंडिया ब्लूचिप फंडाच्या लखलखीत कामगिरीचे श्रेय शिव सुब्रमणियम यांना जाते. जानकीरामन यांना स्मॉल आणि मिडकॅप क्षेत्रातील संशोधनाचा प्रदीर्घ अनुभव आहे आणि ते त्यांच्या पोर्टफोलिओसाठी आकर्षक मूल्यमापनांसह उच्च वाढीची (हाय ग्रोथ) क्षमता असणारे दर्जेदार समभाग निवडण्यात माहीर आहेत. आर. जानकीरामन यांना आता सीआयओ – इमर्जिंग मार्केट इक्विटीज-इंडिया यापदी पदोन्नती देण्यात आली आहे. ते २००७ पासून फ्रँकलिन इंडियाच्या गुंतवणूक चमूचा भाग आहेत. त्यांची फंड जगतात मिड- आणि स्मॉल-कॅप विशेषज्ज्ञ अशी ओळख आहे. या उद्योगात २० वर्षांपेक्षा जास्त अनुभव आणि त्यांनी फ्रँकलिन इंडियाचे माजी सीआयओ (आणि सुंदरमचे विद्यमान सीईओ) आनंद राधाकृष्णन यांच्यासोबत प्रदीर्घ काळ काम केले आहे. त्यांच्या पदोन्नतीचा निर्णय गुंतवणूकदारांना फायद्याचा ठरेल याबद्दल शंका नाही. फेब्रुवारी २०११ पासून ते फ्रँकलिन इंडिया प्राइमा फंडाचे निधी व्यवस्थापन करत आहेत, अखिल कल्लुरी यांची सप्टेंबर २०२२ पासून सह-निधी व्यवस्थापक म्हणून नियुक्ती झाली आहे.

डिसेंबर १९९३ मध्ये अस्तित्वात आलेल्या या फंडाने मागील महिन्यात १० हजार कोटी मालमत्तेचा टप्पा ओलांडला. या फंडाला तीस वर्षांच्या संपत्तीनिर्मितीची समृद्ध परंपरा आहे. हा फंड बाजारातील जोखीम घेण्यास न कचरणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी योग्य साधन आहे. दीर्घ कालावधीत समृद्धी निर्माण करणाऱ्या फंडांच्या यादीत हा फंड आघाडीवर आहे. साहजिकच सेवानिवृत्तीसारख्या दीर्घकालीन आर्थिक उद्दिष्टांसाठी हा फंड अतिशय योग्य फंड आहे. तथापि, नव्याने गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांनी अल्पावधीत मोठ्या अस्थिरतेच्या तयारीने या फंडात गुंतवणूक करावी.

– वसंत माधव कुळकर्णी / shreeyachebaba@gmail.com