आयटीआय म्युच्युअल फंडाचे निधी व्यवस्थापक रोहन कोर्डे यांच्याशी ‘लोकसत्ता’चे गौरव मुठे यांनी केलेली खास बातचीत…

Congress forms panel to monitor ‘conduct of free and fair elections
निवडणूक प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यासाठी काँग्रेसची समिती; मतदारयाद्यांमधील घोळाचा आढावा घेण्याचा निर्णय
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Karnataka Congress differences news in marathi
कर्नाटक काँग्रेसमधील मतभेद उघड ; मुख्यमंत्र्यांच्या राजकीय सल्लागाराचा राजीनामा
Sanjay raut on all part mps meeting
खासदारांच्या बैठकीला मुहूर्तच मिळेना; नवीन खासदारांची एकही बैठक नाही
rules for RTE admissions Change, Committee Education Department
आरटीईच्या प्रवेशांसाठीच्या नियमांमध्ये होणार बदल… शिक्षण विभागाकडून समितीची स्थापना
All-party meetings in Parliament
अर्थअधिवेशन आजपासून, पहिला टप्पा १३ फेब्रुवारीपर्यंत; अर्थसंकल्पाबाबत उत्सुकता
Ajit Pawar On Mahayuti Politics
Ajit Pawar : राज्याला तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार? संजय राऊतांच्या दाव्यावर अजित पवारांचं चार शब्दांत उत्तर; म्हणाले…
Guardian Minister Shivendra Singh Raje Bhosle Mitra Mandal circle of friends latur
लातूरामध्ये पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले मित्र मंडळाची ‘अचानक’ स्थापना

प्रश्न १ : बाजारात प्रमुख निर्देशांक दहा टक्क्यांपर्यंत घसरले आहेत? म्युच्युअल फंड व्यवस्थापक म्हणून या बाजारस्थितीकडे कसे पाहता? मंदी आहे की संधी? किरकोळ गुंतवणूकदारांनी काय केलं पाहिजे?

उत्तर: एका शब्दात सांगायचे झाल्यास, तर ही संधीच आहे. चालू वर्षात सप्टेंबरपर्यंत निफ्टीने ५५ टक्क्यांपर्यंत परतावा दिला होता. त्या तुलनेत जागतिक बाजार सरासरी २१ टक्क्यांनी वाढले होते. थोडक्यात जागतिक भांडवली बाजारांच्या तुलनेत देशांतर्गत निर्देशांकांची कामगिरी चांगली होती. मात्र त्यामुळे आपल्या कंपन्यांचे मूल्यांकन वाढले आहे. त्यामुळे निफ्टीचे पीई गुणोत्तर मांडले गेले तर ते एक वर्षाच्या फॉरवर्ड बेसिसवर २१ पटीने अधिक होते आणि व्यापक बाजाराचे प्रतिनिधित्व करणारे स्मॉलकॅप आणि मिडकॅपमधील कंपन्यांचे मूल्यांकन त्याहून अधिक होते. त्यामुळे अशा परिस्थितीत जेव्हा कोणतीही प्रतिकूल बातमी येते किंवा कंपनीची तिमाहीत कामगिरी समाधानकारक नसते त्या वेळी त्यावर बाजारात खूपच नकारात्मक प्रतिक्रिया दिसते. बाजारात मोठ्या प्रमाणावर अस्थिरता दिसून येते. भू-राजकीय घडामोडींमुळे आणि आशिया खंडाच्या अगदी जवळ म्हणजे इस्रायल विरुद्ध हमास-इराणमधील तणावामुळे असो किंवा रशिया-युक्रेनमुळे पुरवठा साखळीतील व्यत्यय किंवा चीनमध्ये स्वस्तात उपलब्ध असलेल्या समभागांमुळे परदेशी गुंतवणूकदार भारतातून निधी चीनकडे वळवत आहेत.

हेही वाचा – तलवारीपेक्षा लेखणी बलवान !

चांगले निकाल दिल्यास कंपन्यांचे समभाग वर देखील जात आहेत. निफ्टीने सप्टेंबर महिन्यात २६ हजार अंशांची उच्चांकी पातळी गाठल्यावर गुंतवणूकदारांच्या अपेक्षादेखील वाढल्या. अपेक्षा पूर्ण नाही झाल्या की निराशेचे मोठे पडसाद बाजारावर उमटतात. गेल्या २० ते २५ वर्षांत बाजारातील मोठी घसरण बघितल्यास डॉटकॉम क्रायसिस, ९-११ चा हल्ला, जागतिक आर्थिक अरिष्ट, वर्ष २०१८ मधील बँकिंग क्रायसिस किंवा करोनानंतरची परिस्थिती बघितली तर बाजार दोन-तीन वर्षांच्या कालावधीत पूर्वीच्या उच्चांकाच्याही पुढे गेला आहे. त्यामुळे दीर्घकालीन परिस्थिती आपण बघितली तर, ही गुंतवणूकदारांना एक चांगली संधी आहे. पण गुंतवणूकदारांनी साधारण ३ ते ५ वर्षांच्या दृष्टिकोनातून नियोजन केले पाहिजे. नाहीतर कदाचित जो फायदा अपेक्षित आहे तो प्राप्त होणार नाही.

प्रश्न २ : दिवाळीनंतर बाजार नवीन उच्चांक गाठेल, अशी सर्वत्र चर्चा होती. तेजीचे वारे सुरू होते तेव्हा सेन्सेक्स एक लाखापर्यंत जाण्याचे लक्ष्य दिले गेले. प्रत्यक्षात त्यात १० टक्क्यांहून अधिक घसरण झाली आहे. आता डिसेंबरपर्यंत बाजार कुठे असेल?

उत्तर: माझे नेहमी हेच म्हणणे असते की, जर आपल्या सकल राष्ट्रीय उत्पादनातील (जीडीपी) वाढ मजबूत असेल किंवा कंपन्यांचे निकाल चांगले येत असतील किंवा भांडवली गुंतवणूक मोठ्या प्रमाणवर होत असेल तर बाजाराला वरच्या दिशेला जाण्यापासून कोणीच थांबवू शकत नाही. मात्र आपण अगदीच अल्पकालीन विचार केला, तर या तिमाहीमध्ये थोडे कमकुवत निकाल लागले आहेत. त्यामुळे त्या दृष्टिकोनाने बघितले तर या निकालानंतर डिसेंबरपर्यंत बाजाराला वर जाण्यासाठी विशेष उत्तेजन मिळणार नाही. सप्टेंबरमध्ये निफ्टीने गाठलेली २६ हजारांची पातळी आता तो तात्काळ पार करू शकणार नाही. कदाचित बाजार काही काळ अरुंद पातळीत रेंगाळताना दिसेल. त्यानंतर २०२५ मध्ये अर्थसंकल्पानंतर पुढील वर्षाचे आर्थिक निकाल कसे लागतात ते पाहावे लागेल. मात्र सध्या नवीन उच्चांकाची अपेक्षा न ठेवणे योग्य ठरेल.

प्रश्न ३ : सध्याच्या बाजार परिस्थितीत कोणत्या क्षेत्रावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे? कोणत्या क्षेत्राची कामगिरी तुमच्या मते चांगली राहील?

उत्तर: सर्वसाधारणपणे बघितले तर माहिती तंत्रज्ञान क्षेत्राची (आयटी) कामगिरी आतापर्यंत चांगली राहिली नव्हती. आयटी कंपन्यांनी मांडलेला दृष्टिकोन सुधारणा दर्शवत आहे. याचे मुख्य कारण म्हणजे, अमेरिकेने कमी केलेले व्याजदर. ते पुढेही कमी होण्याची शक्यता आहे. ज्याने आयटी क्षेत्राला एकूणच सकारात्मक पकड मिळेल. दुसरे औषध निर्माण क्षेत्राची कामगिरी चांगली राहील. पण कन्झम्पशन अर्थात उपभोग क्षेत्राशी निगडित कंपन्यांचे निकाल बघितले तर ते अपेक्षेपेक्षा कमकुवत राहिले आहेत. भांडवली वस्तू क्षेत्राचे निकालदेखील अपेक्षेपेक्षा कमी आहेत.

प्रश्न ४ : निफ्टी निर्देशांकांबद्दल, त्यातील आघाडीच्या कंपन्याबद्दल काय सांगल?

उत्तर: आघाडीच्या कंपन्यांबद्दलपण तेच म्हणता येईल. आगामी डिसेंबर तिमाहीमध्ये आयटी आणि फार्मा यांचे निकाल चांगले राहतील. बँकिंगचे निकाल मिश्र असतील. मोठ्या बँकांचे निकाल त्या मानाने चांगले सरलेल्या सप्टेंबर तिमाहीमध्येदेखील चांगले आले आहेत.

प्रश्न ५ : मध्यंतरी लार्जकॅप कंपन्यांची कामगिरी निराशाजनक होती, त्यामानाने मिडकॅप आणि स्मॉलकॅप खूप वधारले होते. थोडक्यात फुगवटा होता, तर आता तुम्हाला हे मूल्यांकन वाजवी वाटते का? जेव्हा म्युच्युअल फंड योजना बाजारामध्ये गुंतवणूक करतात, तेव्हा तुम्ही कसा विचार करता?

उत्तर: मिडकॅप आणि स्मॉलकॅपचे अलगीकरण करून जर आपण मूल्यांकन काढले तर ते आपल्याला सरासरीपेक्षा जास्त वाटेल. पण मिडकॅप आणि स्मॉलकॅप कंपन्यांमधील वाढ ही लार्जकॅप कंपन्यांपेक्षा जास्त होते. लार्जकॅप कंपन्यांच्या समभागांमध्ये आपल्याला स्थिरता हवी असते, ते समभाग बाजाराबरोबर पडतदेखील नाहीत, त्यामुळे पडणाऱ्या बाजारामध्ये लार्जकॅपमध्ये थोडा समतोल जाणवतो. मात्र बाजार वर गेल्यानंतर मिडकॅप आणि स्मॉलकॅपमध्ये मिळणारा परतावा जास्त असतो. शेवटी कंपनीचे ध्येय हेच असते की, स्मॉलकॅपमधून मिडकॅपमध्ये प्रवेश करणे आणि मिडकॅपमधून लार्जमध्ये जाणे. त्यामुळे या कंपनीचे समभाग आपल्याकडे असणे केव्हाही चांगले. पण काही वेळा आपल्याला पाहिजे तसा परतावा मिळत नाही, पण जर आपली कंपनीची निवड आणि संशोधन बरोबर असेल तर आपला हिट रेशो जास्त असतो. तुमची निवड योग्य असेल तर तुम्हाला परतावा मिळतोच. त्या पद्धतीने पोर्टफोलिओमध्ये ज्या कंपन्या चांगली कामगिरी करू शकतात, त्या असाव्यात. मग ती स्मॉलकॅप असो मिडकॅप असो किंवा लार्जकॅप असो. बऱ्याचदा काही मिडकॅप कंपन्यांनीदेखील लार्जकॅपपेक्षा चांगला परतावा दिला आहे. त्यामुळे संधी येत राहतील. जर योग्य कंपनीची निवड होत असेल तर वाढ होत राहणार आहे. आमचे गुंतवणुकीचे धोरण असे आहे की, आम्ही योग्य कंपनीच्या निवडीवर लक्ष केंद्रित करतो. त्यामुळे आपला पोर्टफोलिओ खात्रीशीर आणि चांगली कामगिरी करणारा असू शकतो. आम्ही क्षेत्राची थीम निश्चित करून, त्यातल्या चांगल्या कंपनीचे समभाग पोर्टफोलिओमध्ये ठेवतो.

हेही वाचा – बाजारातली माणसं : बाप से बेटा सवाई – उत्पल शेठ

प्रश्न ६ : तुमचा या क्षेत्रातला १७ ते १८ वर्षांचा अनुभव आणि वाहननिर्मिती क्षेत्राचा खास अभ्यास आहे. तर सध्याच्या परिस्थितीत गुंतवणूकदारांनी या क्षेत्रावर लक्ष केंदित करावे काय?

उत्तर: क्षेत्र-केंद्रित (सेक्टोरल) फंड जे असतात, त्यात आपली खरेदीची वेळ खूप महत्त्वाची असते. फ्लेक्झीकॅप, मल्टिकॅप, मिडकॅप आणि स्मॉलकॅपमधील ज्या कंपनी असतात, त्यात सगळ्या क्षेत्रातील कंपन्यांचा समावेश असतो. पण एखाद्या विशिष्ट क्षेत्राची निवड केली तर, बऱ्याचदा आपली वेळ बरोबर जुळत नाही. दीर्घकालीन लक्ष्य ठेवले तरच चांगला परतावा मिळतो. सध्याच्या परिस्थितीमध्ये आयटी, फार्माची निवड योग्य ठरेल. अमेरिकेतील व्याजदर कमी झाल्यामुळे या क्षेत्राला फायदा होईल. बऱ्याच गुंतवणूकदारांना फार्मा क्षेत्राकडून चांगला परतावा आधीच मिळालेला आहे. मात्र तेथे अजून चांगल्या कामगिरीला वाव आहे. भांडवली वस्तू क्षेत्र आणि ऊर्जा ही दोन क्षेत्रे गेल्या वर्षात फार ओव्हरवेट होती. ज्यांनी परतावादेखील चांगला दिला आहे. पण निवडणुकीच्या निकालानंतर असे वाटले की, सरकारचे लक्ष भांडवली गुंतवणुकीपेक्षा कल्याणकारी योजनांजकडे जास्त आहे. त्यामुळे या क्षेत्रांची वाढ कमी झाली. पण येत्या पाच ते १० वर्षांचा विचार केला, तर हे क्षेत्र पुढे चांगली कामगिरी करतील. सध्या त्यांचे मूल्यांकन जास्त होते आणि सरकारने भांडवली गुंतवणुकीवरील लक्ष कमी केल्यामुळे कदाचित नजीकच्या कालावधीत त्यांची कामगिरी खालावेल. मात्र आपण दहा वर्षांसाठी गुंतवणूक ठेवणार असू तर हे क्षेत्र चांगली कामगिरी करतीलच.

प्रश्न ७ : सध्याच्या वातावरणात आयटीआय म्युच्युअल फंडाचे गुंतवणूक धोरण काय?

उत्तर: एक तर देशांतर्गत उपभोग आणि आत्मनिर्भर भारत या थीमवर आधारलेली गुंतवणूक आहे. ज्यामुळे पुढील ५ ते १० वर्षे देशाच्या जीडीपीतील वाढ कायम राहील. दुसरी गोष्ट म्हणजे, आयातीला पर्याय, फार्मा क्षेत्रातील घटकांचे देशांतर्गत उत्पादन, भांडवली वस्तूंचे उत्पादन किंवा एकूणच पायाभूत विकासाला दिलेल्या महत्त्वामुळे आत्मनिर्भरतेकडे पाऊल हे आहे. सरकारचे लक्ष आता रोजगारनिर्मितीवर असून त्यात यशस्वी झाल्यास उपभोग आणखी वाढेल.

प्रश्न ८ : आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या अहवालानुसार, विद्यमान वर्षात विकासदर ७ टक्के राहील आणि पुढील वर्षासाठी ७.२ टक्क्यांचा अंदाज आहे. पण त्यांच्या म्हणण्यानुसार, अर्थव्यवस्थेवर लोकसंख्या वाढीचा खूप भार आहे आणि यातून रोजगारनिर्मिती कशी होईल?

उत्तर: रोजगारनिर्मिती व्हायलाच पाहिजे नाहीतर उपभोग वाढणार नाही. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचा ७ टक्क्यांचा अंदाज सद्य:स्थितीत समर्पक वाटतो. मात्र प्रत्यक्षात दर कमीच राहिला तरी ६ टक्क्यांपेक्षा अधिक जीडीपीचा दर खूप चांगलाच आहे. कारण इतर उदयोन्मुख बाजारांच्या तुलनेत तो अधिक असणार आहे. आपल्यापेक्षा अधिक गतीने वाढतील असे फार कमी उदयोन्मुख बाजार असतील. या परिस्थितीत चीनला विकासदर टिकवणे कठीण आहे. चीनची एक समस्या ही की, लोकसंख्येचा दर कमी होत चालला आहे, त्यामुळे त्यांना लोकसंख्याशास्त्रीय लाभांश मिळणार नाही. भारताला मात्र हा फायदा मिळेल. मात्र मनुष्यबळाचा चांगला वापर होणे आवश्यक आहे. त्यामुळे आपल्याला लोकसंख्या नियंत्रणासाठी कठोर पावले उचलण्याची गरज आहे .पण जे आर्थिकदृष्ट्या खालच्या स्तरात आहेत त्यांनादेखील फायदे मिळाले पाहिजेत आणि त्याचाच प्रयत्न सरकार करत आहे. पायाभूत प्रकल्पाचा विकास, उत्पादन आणि औद्योगिक उत्पादन वाढवण्यासाठी मनुष्यबळ आवश्यक आहे ते आपल्याकडे आहे. रोजगार, उत्पन्न वाढ, त्यातून खर्चात होणारी वाढ असे चक्र सुरू राहिल्यास एकूणच अर्थव्यवस्थेची वाढ चांगली होते.

Story img Loader