प्रकाश जाधव

‘योग्य निर्णय घेणे’ ही कोणत्याही क्षेत्रामध्ये यश मिळविण्याची गुरुकिल्ली आहे. शेअर बाजार हे क्षेत्रही याला अपवाद नाही. मात्र, गुंतवणूक क्षेत्रामध्ये केवळ योग्य निर्णय पुरेसा नाही. या घेतलेल्या योग्य निर्णयांचा लाभ मिळविण्यासाठी त्या निर्णयांशी ठाम राहणे तितकेच महत्त्वाचे आहे. घेतलेला योग्य निर्णय लगेच बदलल्यामुळे भविष्यात होऊ घातलेल्या फायद्याला आपण मुकतो. अशा वेळी आपले योग्य निर्णय यशामध्ये परावर्तित करणारा महत्त्वाचा नायक म्हणजे ‘संयम’!

Sensex gains , stock market rise , Sensex ,
मार्केट-वेध : शेअर बाजारात सेन्सेक्सची २२५ अंशांची कमाई; मात्र सत्रारंभीच्या मुसंडीला, दिवसअखेर पुन्हा गळती!
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
rupee recovered 8 paise from its historic low against the us dollar to settle at 86.62
नीचांकी पातळीवरून रुपया ८ पैशांनी सावरला
Stock market hits 650-point high with Sensex
मार्केट-वेध : सेन्सेक्स सावरला; पण बाजारातील तेजीचे पतंग काटले जाणार की, मोठी भरारी घेणार?
Stock market today BSE Sensex crashes over 1000 points
मुंबई शेअर बाजार हजार अंशांनी कोसळला; डॉलरच्या तुलनेत भारतीय चलन विक्रमी नीचांकावर
Fund Jigyaza Wealth Creation Through SIP
फंड जिज्ञासा – ‘एसआयपी’च्या माध्यमातून संपत्ती निर्मिती
Image Of Priyanka Gandhi And PM Modi
Dollar vs Rupee : “रुपयाच्या घसरणीचे सर्व विक्रम मोडले, पंतप्रधानांनी जनतेला उत्तर द्यावे”, प्रियांका गांधींची पंतप्रधान मोदींवर टीका
lokmanas
लोकमानस: उपभोग, गुंतवणूक, निर्यातीत वाढ आवश्यक

आयुष्यामध्ये ‘संयम’ हा अतिशय महत्त्वाचा गुण समजला जातो. लहानपणापासून आपण बऱ्याच गोष्टी ऐकलेल्या आहेत की संयम हा यशाचा मार्ग कसा ठरतो आणि अतिघाई केल्याने यश कसे हुलकावणी देते! परंतु या गोष्टींचे निष्कर्ष जितके महत्त्वाचे तितकेच, किंबहुना त्याहीपेक्षा महत्त्वाचे त्यांचे संदर्भ आहेत. बऱ्याचदा संदर्भ विसरला जातो आणि निष्कर्ष तेवढा ध्यानात ठेवला जातो! आणि म्हणूनच या लेखाद्वारे आपण ‘संयम’ या शब्दाचा योग्य संदर्भ जाणून घेणार आहोत.

पुणे- मुंबई प्रवासाचे एक सोपं उदाहरण पाहूया. जेव्हा तुम्ही पुण्यापासून मुंबईसाठी प्रवास सुरू करता, तुम्ही पुणे-मुंबई द्रुतगती महामार्ग निवडता. तरीही तुम्ही अर्ध्या तासात मुंबईला पोहोचण्याची अपेक्षा करू शकत नाही. मुंबईला पोहोचण्यासाठी तुमच्याकडे तीन तास ड्राईव्ह करण्याचा संयम असावा लागतो, नाही का?

हेही वाचा… Money Mantra : सुरक्षित क्रेडिट आणि डेबिट कार्ड पिन कसा तयार करायचा?

आता समजा, तुम्ही पुण्यातून प्रवास सुरू केला, पण पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गाला उजवीकडे वळण्याऐवजी तुम्ही डावीकडे वळलात… तुम्हाला अर्ध्या तासात मुंबई गाठली जाण्याची अपेक्षा नाही आणि तुम्ही जरी तीन तास संयमपूर्वक ड्राईव्ह करण्याची तयारीही ठेवली आहे; तरी तुम्ही मुंबईला पोहोचू शकाल काय? बिलकुल नाही! खरे तर असे काही घडणेच अशक्य आहे, कारण ठराविक अंतराने रचना केलेल्या पथदर्शक फलकांकडे तुम्ही दुर्लक्ष केलेत आणि भलत्याच रस्त्याला लागलात. तुम्हाला ठाऊक असायला हवे की पुण्याहून मुंबईकडे जाताना खेड शिवापूरचा नव्हे तर तळेगावचा टोल नाका लागणार आहे आणि खंबाटकी नव्हे तर खंडाळा घाट लागणार आहे! तुम्ही योग्य मार्गावर आहात याचे हे मापदंड आहेत, हो ना? तीन तास ड्राइव्ह करण्याचा हा संयम रस्ताच चुकीचा निवडला गेल्याने विचारशून्यच ठरेल. सारांशात, संयम तुम्हाला गंतव्यस्थानावर पोहोचण्यासाठी तेव्हाच मदत करेल जेव्हा तुमचा रस्त्याचा निर्णय योग्य असेल.

तुमचा संयम तुमच्यासाठी तेव्हा आणि तेव्हाच कामी येईल जेव्हा तुम्ही योग्य रस्ता निवडला असेल. अगदी कुठल्याही निर्णयाबाबतीत संयम बाळगताना हा निकष अतिशय महत्त्वाचा आहे. आपला निर्णय योग्य आहे का हे पडताळण्यासाठी प्रत्येकाने प्रथम अशा महत्त्वाच्या संकेत खुणा पाहिल्या पाहिजेत. जर तुमचा निर्णयच चुकीचा असला तर तुमचा अतिसंयम आर्थिकदृष्ट्या जोखमीचा ठरू शकतो. निर्बुद्धपणे दाखवलेला संयम तुम्हाला तुमच्या ध्येयापासून आणखी दूर घेऊन जाऊ शकतो. संयम कितीही चांगला असला तरीही आपला निर्णय योग्य ठरेल अशी आशा धोकादायकच! निर्बुद्ध आशावादावर अधिष्ठित संयम केवळ अनर्थकारकच!

हेही वाचा… Money Mantra: सोळावं वरीस सोन्याचं! ‘हा’ फंड आपल्या पोर्टफोलिओत हवाच!

त्याचप्रमाणे, तुम्ही तुमच्या गुंतवणुकीच्या योग्य निर्णयाबाबतीत संयम बाळगणे हे अतिशय महत्त्वाचे आहे. मात्र, चुकीच्या निर्णयाबाबत दाखविलेला संयम मात्र तुमची संपत्ती बुडवू शकतो. अशी कितीतरी उदाहरणे आपण आपल्या आजूबाजूला पाहतो; जेथे लोक गुंतवणूक करताना चुकीच्या कंपनीचा शेअर, चुकीच्या किमतीला विकत घेऊन अतिशय संयमाने आपला निर्णय बरोबर ठरेल याची वाट बघत बसतात! मी स्वतः अशा काही गुंतवणूकदारांना ओळखतो ज्यांच्याकडे २०१८ पासून येस बँकेचे शेअर्स आहेत. त्यांनी ते ३०० रुपये खरेदी किमतीपासून सध्याच्या १८ रुपयांपर्यंत घसरणीपर्यंत स्वतःपाशी राखून ठेवले आहेत. काही जणांनी आयडियाचे शेअर्स प्रत्येकी ९० रुपयांप्रमाणे घेऊन ठेवले आहेत, ज्याची आत्ताची किंमत आहे साधारण ७ रुपये!

अगदी शेअर स्पिल्ट म्हणजेच समभाग विभाजन विचारात घेऊनही पाच वर्षांच्या कालावधीमध्ये ही गुंतवणूक ८० टक्के नुकसानीत आहे. आता त्यांना आशा आहे की, एक दिवस या शेअर्सची किंमत निदान त्यांच्या खरेदी किमतीला तरी पोहोचेल आणि अखेर ना नफा ना तोटा इतके समाधान तरी त्यांना मिळेल! पण या पाच वर्षांमध्ये गमावलेल्या चांगल्या गुंतवणुकीच्या संधींचे काय? या उदाहरणातून गुंतवणूकदारांचा अविचारी निर्णय आणि त्याबद्दलचा संयम त्यांच्या आर्थिक नुकसानीला जबाबदार आहे. निर्णयाची योग्यता तपासण्याचे मापदंड न वापरता दाखविलेला संयम तुमची गुंतवणूक धुळीला मिळवू शकतो.

हेही वाचा… Money Mantra: इन्कम टॅक्स रिटर्नसाठी निकष काय असतात? (उत्तरार्ध)

तुमचा गुंतवणुकीचा निर्णय योग्य आहे किंवा नाही याची खात्री करण्यासाठी काही मापदंड आहेत, ते लक्षात घेणे अत्यंत महत्त्वाचे ठरेल. जितके लवकर ते तुम्हाला समजतील तितके तुमचे निर्णय योग्य ठरण्यासाठी चांगले. आणि हो, जर तुमचा निर्णय चुकला असेल तर तो वेळेवर दुरुस्त केला पाहिजे. हे निकष व्यक्तिपरत्वे आणि तुमच्या निर्णयाच्या आधारानुसार वेगवेगळे असू शकतात. पण निर्णय घेतल्यानंतर नव्हे तर निर्णय घेताना हे निकष अत्यंत महत्त्वाचे आहेत. ‘विकत घ्या आणि विसरून जा’ हे तत्त्व येथे कुचकामी/निष्फळ/ निरुपयोगी ठरते.

बऱ्याचदा या तत्त्वज्ञानाचा पाया या आशेवर उभा असतो की भविष्यामध्ये बाजारभाव हा फक्त वाढतच जाणार आहे. प्रत्येक शेअर आणि प्रत्येक क्षेत्रासाठी हे लागू होईलच असे नाही. काही वर्षांमध्ये कितीतरी पटीने वाढलेल्या शेअर्सची (उदाहरणार्थ बजाज फिनसर्व्ह, इन्फोसिस, आयसीआयसीआय बँक) बरीच उदाहरणे दिली जातात. परंतु, याचप्रमाणे अनेक वर्षांमध्ये गुंतवणुकीची राख करणारी उदाहरणे (उदाहरणार्थ आरपॉवर, सुझलॉन, येस बँक) त्या तुलनेत अधिक आहेत. फरक इतकाच की अशा उदाहरणांची पुरेशी चर्चा होत नाही त्यामुळे सामान्य गुंतवणूकदार हा आशावादीच राहतो.

संयमाकडे दोन दृष्टिकोनांतून पाहता येईल

पहिला सर्वसामान्य दृष्टिकोन- गुंतवणुकीच्या निर्णयाबाबत ठाम राहणे आणि आपला निर्णय बरोबर ठरेल अशी असा आशावाद ठेवून संयमाने वाट पाहत राहणे. वैयक्तिक गुंतवणूकदारांचा संयम या पहिल्या सदरात मोडतो. माझ्या मते हा दृष्टिकोन अयोग्य आहे. दुर्दैवाने, सामान्य गुंतवणूकदार गुंतवणुकीच्या निर्णयाची योग्यता समजावून न घेता संयमाबाबतचा हा दृष्टिकोनच योग्य मानून चालतात. हे तुम्ही बंपर परतावा देणाऱ्या (मल्टीबॅगर) की तुमच्या गुंतवणुकीची धूळधाण करणाऱ्या स्टॉकमध्ये गुंतवणूक करत आहात याच्या संकेतांकडे सरळ सरळ दुर्लक्ष करणे झाले. आपल्याला हे सत्य स्वीकारणे गरजेचे आहे की कधीकधी निर्णय चुकतात, आणि हे जेवढ्या लवकर समजेल तेवढे तुमच्या संपत्तीच्या दृष्टीने चांगले!

दुसरा दृष्टिकोन हा बराच सुज्ञ आहे. हा दृष्टिकोन गुंतवणूकदाराला संयमपूर्वक गुंतवणुकीच्या योग्य संधीची वाट पाहायला शिकवतो. जेणेकरून तुमचा निर्णय बहुतांशी योग्य ठरेल. गुंतवणुकीआधी योग्य अभ्यासाचा संयम नुसत्याच आशावादी संयमापेक्षा जास्त व्यवहार्य नाही का?

या दोन्हीपैकी कुठला दृष्टिकोन तर्कशुद्ध वाटतो? दुसरा, बरोबर?

अर्थात हा दृष्टिकोन तितकासा प्रचलित नाही. कारण केवळ योग्य शेअर आणि त्याची योग्य किंमत समजणे इतकेच नव्हे तर ठराविक काळानंतर कोणता निकष पडताळायचा यासाठी योग्य कौशल्याची गरज असते. यामध्ये तुमच्या निर्णयाच्या फलश्रुतीच्या प्रगतिपथावर वेळोवेळी पर्यवेक्षण गरजेचे आहे. जरी सामान्य गुंतवणूकदार अथक परिश्रम करून गुंतवणुकीसाठी काही रक्कम बाजूला ठेवत असला तरी त्याने कष्टाने कमावलेला पैसा वाढविण्यासाठी घेतलेल्या गुंतवणुकीच्या निर्णयामागे कराव्या लागणाऱ्या मेहनतीची मानसिक तयारी नसते.

आता ही मानसिकता बदलून अवाजवी आशेवर आधारित निर्णय न घेता अभ्यासपूर्ण निर्णय घेण्याची वेळ आली आहे. आपण अनिश्चित अशा जगामध्ये वावरत आहोत. बाजाराला मन, हृदय नसते आणि संपूर्ण जगामधील शेअर बाजार अशा भाबड्या आशावादी निर्णयांसाठी निष्ठूर असते.

कित्येक लोकांनी त्यांची आयुष्यभराची कमाई, जमापुंजी अशा चुकीच्या निर्णयाबद्दलच्या अविचारी संयमामुळे गमावलेली आहे. त्यामुळे सामान्य गुंतवणूकदारांनी वस्तुस्थितीचे भान राखून योग्य निर्णय घेऊन योग्य संयम बाळगला पाहिजे. जेव्हा आपण आपल्या कष्टाचा पैसा गुंतवतो तेव्हा योग्य निर्णय घेतलाय याची वेळोवेळी शहानिशा करणे आणि मग त्याचा परतावा मिळेपर्यंत संयम बाळगणे हे केव्हाही महत्त्वाचे नाही का?

Story img Loader