शुक्रवारी शेअर बाजार बंद होताना विक्रीचा सपाटा सुरूच राहिला. सलग चार दिवस ‘लाल आकडे’ दर्शवणाऱ्या बाजारांनी मागच्या दोन ते तीन आठवड्यापासून सुरू असलेल्या घोडदौडीला थोडासा विश्राम दिला आहे असे लक्षात येते. मागच्या आठवड्यात २०००० या समाधानकारक आणि उत्साह वाढवणाऱ्या पातळीवर पोहोचलेला निफ्टी आज १९७०० च्या खाली जाऊन बंद झाला आहे. आठवड्याच्या अखेरीस सेन्सेक्स ६६००९ तर निफ्टी १९६७४ वर स्थिरावला. बाजाराचा एकंदरीत अंदाज घ्यायचा झाल्यास १७४७ शेअर्समध्ये वाढ दिसून आली, १७७९ शेअर्समध्ये घट दिसून आली तर १४३ शेअरच्या भावात कोणताही फरक पडला नाही.

देशांतर्गत बाजारपेठेमध्ये कोणतीही वाईट बातमी, नकारात्मक संकेत मिळालेले नसतानाही बाजारामध्ये झालेली पडझड दोन गोष्टींकडे लक्ष वेधून घेते.

David Shaw has used concept of quant when managing assets of his investors
बाजारातली माणसं : हेज फंड बाजारातली एक रहस्यकथा – डेव्हीड शॉ
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
rs 28677 crore withdrawn by foreign investors from stock market
शेअर बाजाराकडे परदेशी गुंतवणूकदारांची पाठ? बाजार कोसळण्याचे तेच एक कारण?
Jeevan pramaan online process
Money Mantra: हयातीचा दाखला ऑनलाईन मिळवण्यासाठी जीवन प्रमाण सुविधा काय आहे?
loksatta editorial no interest rate cut by rbi retail inflation surges in october
अग्रलेख : म्हाताऱ्या शब्दांचा आरसा…
readers comments on Loksatta editorial,
लोकमानस : अर्थव्यवस्थेत वाढ, मग रुपयाची घसरण का?
indian rupee falls to all time low against us dollar
अग्रलेख : काका… मला वाचवा!
Gold prices at lows Big fall after Diwali
सुवर्णवार्ता… सोन्याचे दर निच्चांकीवर… दिवाळीनंतर मोठी घसरण…

त्यातील पहिली म्हणजे बाजारामध्ये सतत सुरू असलेल्या खरेदीला कुठेतरी लगाम घातला गेला आहे. जे ‘लॉंग टर्म इन्वेस्टर्स’ म्हणजे उत्तम शेअर्स दीर्घकाळासाठी घेऊन आपला पोर्टफोलिओ बनवू इच्छितात त्यांच्यासाठी अशा पडत्या बाजारात थोडी थोडी खरेदी करणे कायमच फायदेशीर ठरत आले आहे. दुसरी घटना म्हणजे जागतिक बाजारांमध्ये क्रूड ऑइल कडाडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्याचा थेट परिणाम ‘सेंटीमेंट’ म्हणजेच गुंतवणूकदारांच्या मानसिकतेवर होताना दिसतो.

आणखी वाचा: Money Mantra: हार्वेस्टिंग मशीनचं पीक

दोन आठवड्याचा परदेशी गुंतवणूकदारांचा (एफ आय आय) खरेदी विक्रीचा आकडा हे स्पष्टपणे दाखवतो की जेव्हा बाजारात संधी उपलब्ध आली तेव्हा परदेशी वित्त संस्थांनी विक्री करण्याकडे भर दिला आहे. एकीकडे सेन्सेक्स आणि निफ्टी यामध्ये विक्री तेजीत दिसत असताना स्मॉल आणि मिडकॅप मध्ये विशेष हालचाल जाणवली नाही. निफ्टी स्मॉल कॅप 100 अगदी किंचित वाढला तर निफ्टी मिडकॅप १०० किंचितसा कमी झाला.

सेक्टर अपडेट

निफ्टी PSU बँक, निफ्टी ऑटो हे दोन्ही सेक्टरल इंडेक्स ३.५ टक्क्याने आणि ०.२१ टक्क्याने वाढले. बाकी सर्व सेक्टरल इंडेक्स मध्ये घट दिसून आली. निफ्टी हेल्थकेअर मध्ये सर्वाधिक घट दिसून आली. निफ्टी फार्मा हा निर्देशांक सुद्धा घसरला.

पडत्या बाजरातील वाढते शेअर्स

इंडसइंड बँक सगळ्यात जास्त वाढलेला शेअर ठरला, त्यामध्ये २.८६ टक्क्यांची वाढ दिसून आली. त्या खालोखाल मारुती सुझुकी गुंतवणूकदारांना फायदा करून देणारा शेअर ठरला. स्टेट बँक, महिंद्रा अँड महिंद्रा, एशियन पेंट या शेअरच्या भावामध्ये वाढ झालेली दिसली. दुसरीकडे विप्रो अडीच टक्क्यांनी घसरला तर डॉक्टर रेड्डी, यु पी एल, सिप्ला, बजाज ऑटो या शेअरच्या भावांमध्ये घसरण झालेली दिसली.

आणखी वाचा: Money Mantra: हेल्थकेअर सेक्टरमधल्या गुंतवणूक संधी

महिन्याची आकडेवारी

भारतीय अर्थ मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठी जीडीपी मधील वाढ साडेसहा टक्के असेल असा अंदाज वर्तवला आहे. भारतीय अर्थव्यवस्थेवर असलेले मान्सूनचे संकट पूर्णपणे टळलेले नाही. खरीप आणि रब्बी पिके यांचे नेमके उत्पादन कसे होते यावर महागाईचे गणित अवलंबून आहे. क्रूड ऑइल चे वाढते भाव हे आणखी एक चिंतेचे कारण ठरू शकते असेही या पत्रकात म्हटले आहे. असे असले तरीही कॉर्पोरेट सेक्टरचे नफ्याचे वाढते आकडे, बँकिंग क्षेत्रामध्ये दमदार कर्जवाटप आणि बांधकाम क्षेत्रामध्ये पुन्हा एकदा परतलेली तेजी यामुळे जीडीपीतील वाढ कमी होणार नाही असा आशावाद मंत्रालयाच्या मासिक पत्रकामध्ये व्यक्त केला आहे. गेल्या तिमाही मध्ये जीडीपीच्या वाढीतील दर ७.८% होता. ऑगस्ट महिन्यामध्ये पाऊस कमी झालेला होता तो पुन्हा सप्टेंबर मध्ये परतून येईल आणि संभाव्य नुकसान कमी होईल अशी आशा वर्तवण्यात आली आहे.

येत्या आठवड्यात काय अपेक्षित आहे?

निफ्टी बँक आणि निफ्टी आयटी या दोन सेक्टर मध्ये आगामी काळात कशी वाढ होते आहे हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे. २०००० वरून निफ्टी पुन्हा १९६०० ला आला आहे. १९८०० आणि १९९०० या दोन पातळ्यांवर निफ्टीला पुन्हा एकदा खाली खेचण्याचा जोरदार प्रयत्न होईल असे चार्ट वरून दिसून येते. जर परदेशी गुंतवणूकदारांनी खरेदीचा विचार न करता विक्रीचा सपाटा सुरू ठेवला तर निफ्टी १९४०० पर्यंत जाऊ शकतो गेल्या. आठवड्याभरात भारत आणि कॅनडा यांच्यातील राजनैतिक कटू प्रसंगांचा बाजारांवर असा विशेष परिणाम झालेला दिसला नाही हे महत्त्वाचे आहे. कॅनडातील परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार व पेन्शन फंडांनी भारतातील गुंतवणुकीबाबत पुनर्विचार करणार नाही हेच धोरण स्वीकारले आहे ही आपल्या बाजारांसाठी समाधानकारक बाब आहे.