ओंकार भिडे

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आता इलेक्ट्रिक व्हेईकलची चर्चा सुरूय, माझ्या मित्रानेही घेतली आहे, इव्ही घेतली की पैसे वाचतात, असे ऐकले आहे, मग आता इव्ही घ्यावीच या निर्णयापर्यंत आपण पोचलेले असू शकता. पण, हा पर्याय सध्या तरी योग्य नाही? होय इव्हीच्या किमती अजूनही अफोर्डेबल नाहीत, पेट्रोलच्या तुलनेत त्या महागच आहेत. पर्यावरणासाठी इव्ही नक्कीच चांगल्या आहेत. पण, त्यासाठी योग्य किमतीला आणि अधिक रेंजच्या तसेच, तंत्रज्ञानाने परिपक्व असणाऱ्या असल्या पाहिजेत. मग माझ्या मित्राने घेतली म्हणून आपण इव्ही घ्यावी का?

-टू व्हीलर इव्ही १.५० लाख रुपयांच्या आसपास आहे,

-रेंज कमाल ११० ते १५० किलोमीटर. (संबंधित मॉडेलनुसार)

-आय सी ई (इंटरनल कम्बॅशन इंजिन) पेट्रोलवर चालणारी टू व्हीलर एख लाख रुपयांच्या आसपास. (१००-११० सीसी, कम्यूटर सेगमेंट स्कूटर), मायलेज प्रति लिटर ६०-६५ किमी.

-पेट्रोल मोटरसायकलच्या तुलनेत इव्ही स्कूटर ६०% महाग, पेट्रोलची गाडी चालवण्याचा प्रति किलोमीटर खर्च २ रुपये.

-दुचाकीसाठी मोजलेली अतिरिक्त रक्कम वसूल होण्यासाठी लागणारा कालावधी ५ वर्ष.

हेही वाचा : Money Mantra: झिरो इंटरेस्ट लोन काय असतं?

-इव्हीची चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर मर्यादित, रिसेल व्हॅल्यू सध्या तरी थेट बाजारात उपलब्ध नाही.

-वॉरंटी पिरेडच्या पलीकडे बॅटरी, चार्जर खराब झाल्यास किती पैसे द्यावे लागणार याबाबत स्पष्टता नाही.

-लाँग राइडला जायचे झाल्यास मर्यादा, सर्वत्र चार्जिंग उपलब्ध नाही.

-सध्या बाजारात इलेक्ट्रिक कार ही उपलब्ध.

-पारंपारिक कार च्या तुलनेत किमतीत दुपटीचा फरक.

-बॅटरी खराब झाल्यास कार किमतीच्या आर्थिक किंमत बॅटरीची.

-अतिरिक्त भरलेली किंमत अथवा इव्हीसाठी द्यावा लागलेला प्रीमियम वसूल होण्यासाठी लागणारा कालावधी सहा वर्षे.

-कंपनीने क्लेम केलेली रेंज आणि प्रत्यक्षात रस्त्यावर मिळणाऱ्या रेंजमध्ये मोठा फरक.

हेही वाचा : Money Mantra : कोटक महिंद्राची नवी ‘कोटक कंझम्शन फंड’ योजना – जाणून घ्या सर्वकाही

-लाँग ड्राईव्ह ला जाताना वा रिमोट प्लेस ला जातान चार्जिंग ची सुविधा आहे की नाही हे पाहावे लागणार.

एकूणच परिस्थिती पाहता दुसऱ्याला आपल्याकडे इव्ही आहे हे दाखवायचे असल्यास हा पर्याय चांगला आहे. पण, व्यावहारिक विचार केल्यास इव्ही टेक्नॉलॉजी प्रगत व्हायला काहीसा कालावधी जाणार.

सगळ्याच वाहन कंपन्यांच्या इव्ही नाहीत. त्यामुळे स्पर्धा नसल्यामुळे ग्राहकांसाठी किमती ‘महागच.’

परिस्थिती भारतात इव्ही टेक्नॉलॉजी प्रगत व्हायला, कंपन्यांमध्ये स्पर्धा वाढायला तीन ते पाच वर्षांचा कालावधी. त्यामुळे एकूण विचार करता सध्या यापासून आस्ते कदम ठेवलेले बरे!

मराठीतील सर्व मनी-मंत्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Should you buy an electric vehicle things you should know before buying an electric vehicle mmdc css