Money Mantra: मागील दोन लेखात आपण होम सेव्हर लोन व होम लोन वरील व्याज आकारणी या बाबत माहिती घेतली. आज आपण होम लोन प्रीपेमेंट करावे की, न करता गुंतवणूक करावी या बाबत माहिती घेऊ. बऱ्याचदा होम लोन घेतल्यानंतर आपल्याला एकमूठी रक्कम वारसा हक्कातून किंवा अन्य कारणाने मिळत असते. किंवा आपले उत्पन्न वाढल्याने होम लोनच्या मासिक हप्त्या व्यतिरिक्त कर्ज खात्यात जास्तीची रक्कम भरणे शक्य असते. तथापि, ही रक्कम होम लोनच्या परतफेडीसाठी वापरावी की, गुंतवणूक करावी असा संभ्रम होत असतो, त्या संदर्भात काही महत्त्वाचे मुद्दे याप्रमाणे-

गुंतवणूक करायची की, कर्ज परतफेड?

गुंतवणूक करायची की, कर्ज परतफेड करावयाची याचा निर्णय घेताना खालील बाबी विचारात घेऊनच निर्णय घेणे योग्य असते.-
रक्कम कर्ज परतफेडीसाठी वापरली, तर आपले कर्ज मुदतीपेक्षा कमी कालावधीत चुकते होऊ शकते. यामुळे कर्जावरील द्यावे लागणारे व्याजही कमी होते. उपलब्ध रकमेतून संपूर्ण कर्ज चुकते झाले तर कर्जमुक्त झाल्याचे समाधान मिळते, तसेच पुढे हप्ता भरावा लागणार नसल्याने तेवढी रक्कम दरमहा खर्चासाठी उपलब्ध असल्याने आत्तापर्यंत जी काटकसर करावी लागत होती, ती आता करावी लागणार नाही व सढळ हाताने खर्च करता येऊ शकतो. शिवाय, हातात येणारी वाढीव रक्कम भविष्यातील गरजांसाठी गुंतविता येऊ शकते.

income tax law, income tax, property, gifts,
भेटी करपात्र आहेत का?
rs 28677 crore withdrawn by foreign investors from stock market
शेअर बाजाराकडे परदेशी गुंतवणूकदारांची पाठ? बाजार कोसळण्याचे तेच…
David Shaw has used concept of quant when managing assets of his investors
बाजारातली माणसं : हेज फंड बाजारातली एक रहस्यकथा – डेव्हीड शॉ
chemical manufacturing industries in india stock market share prices
क्षेत्र अभ्यास अजब रसायन बाजार
mita shetty
टाटा इंडिया इनोव्हेशन फंडाची कामगिरी कशी राहील?
dhfl scam of wadhawan family
घोटाळ्यांचे घराणे (डीएचएफएल)
Jeevan pramaan online process
Money Mantra: हयातीचा दाखला ऑनलाईन मिळवण्यासाठी जीवन प्रमाण सुविधा काय आहे?
Market Technique Stock Market
बाजाराचा तंत्र-कल : शेअर बाजाराला बाळसं की सूज?
Germanys Warren Buffett Karl Hellerding
जर्मनीचा वॉरेन बफे : कार्ल हेलरडिंग

हेही वाचा…मार्ग सुबत्तेचा : नियोजित पालकत्व

कर्ज चुकते झाल्याने जी हप्त्याची रक्कम भरावी लागणार नसते, त्यामुळे तुलनेने कमी हप्त्याचे व कमी कालावधीचे कार लोन घेऊन आपली कारची हौस भागविता येते. आता आपण कर्ज परतफेड न करता उपलब्ध रकमेची गुंतवणूक करण्याचे काय फायदे आहेत, हे पाहू.

सध्या बहुतांश बँका किंवा होम फायनान्स कंपन्यांचे होम लोन साठीचे व्याज दर ९.५ ते १०% च्या दरम्यान आहेत. अशा वेळी जर आपण थोडी जोखीम घेऊन शेअर्स / म्युचुअल फंड किंवा अन्य अपारंपारिक पर्यायात (उदा: पी२पी लेंडिंग, इनव्हॉईस डीसकौंटिंग , व्हर्चुअल करन्सी, रिअल इस्टेट फंड आदी) दीर्घकालीन उद्देशाने एकरकमी अथवा नियमित (एसआयपी ) गुंतवणूक केल्यास १२ ते १३% रिटर्न मिळवता येतो. याउलट परतफेड केल्याने केवळ ९.५ ते १०% या दरणे लागू होणारे व्याज वाचते. दीर्घकालीन ३ ते ३.५% च्या फरकामुळे अंतिम शिल्लक रक्कम द्याव्या लागणाऱ्या व्याजापेक्षा निश्चितच जास्त असते. तसेच होम लोन परतफेडीचा प्राप्तिकर वाचविण्यासाठी जो उपयोग होतो (८० अंतर्गत मुद्दल परतफेड व सेक्शन २४(ब) अंतर्गत रु. २ लाखा पर्यंचे व्याज ) तो लाभ कर्ज रक्कम मुदतपूर्व फेडल्यास मिळत नाही.

हेही वाचा…क…कमॉडिटीचा : तूर विका, टीसीएस घ्या

नियमित कर्जफेड करून उपलब्ध वाढीव रक्कम वेळोवेळी योग्य ती जोखीम घेऊन गुंतविल्यास कर्जफेड होत असतानाच आपली गुंतवणूक होत असल्याने कर्ज फेडीची मुदत संपताना आपण कर्जमुक्त तर होतोच, शिवाय वेळोवेळी केलेल्या गुंतवणुकीमुळे व त्यावर मिळणाऱ्या रिटर्न मुळे चांगली शिल्लक जमा होते. मुदतपूर्व परतफेड करायची का गुंतवणूक करावयाची याचा निर्णय वरील बाबी विचारात घेऊन आपल्याला योग्य वाटेल तो निर्णय घ्यावा, कारण दोन्हीचे काही फायदे व काही तोटे आहेत.