वृत्तसंस्था, टोकियो

जपानमधील तंत्रज्ञान क्षेत्रातील गुंतवणूकदार सॉफ्टबँक ग्रुपने सलग दुसऱ्या वर्षात तोटा नोंदवला आहे. कंपनीला मार्चअखेर सरलेल्या आर्थिक वर्षात ९७० अब्ज येनचा (७ अब्ज डॉलर) तोटा झाला आहे. सॉफ्टबँकेला मागील आर्थिक वर्षात १.७ लाख कोटी येनचा (१३ अब्ज डॉलर) तोटा झाला होता.

सॉफ्टबँकेकडून सॉफ्टबँक व्हिजन फंडामार्फत तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांत गुंतवणूक केली जाते. जगभरातील भांडवली बाजारांमध्ये तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांचे समभाग गडगडले आहेत. याचा परिणाम होऊन कंपनीला मोठा तोटा झाला आहे. चीनमधील ई-कॉमर्स क्षेत्रातील आघाडीची कंपनी अलिबाबाला झालेल्या फायद्यामुळेही गुंतवणुकीतील तोटा सॉफ्टबँकेला भरून काढता आलेला नाही.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
china lithium found concern in india
भारतासाठी धोक्याची घंटा? चीनमध्ये सापडला लिथियमचा मोठा साठा,…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

हेही वाचा – आता विमा पॉलिसीवर सहज कर्ज उपलब्ध होऊ शकणार, परंतु ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा; अन्यथा…

अलिबाबा कंपनीची विक्री सरलेल्या आर्थिक वर्षात मागील वर्षाच्या तुलनेत ६ टक्क्यांनी वाढून ६.५७ लाख कोटी येनवर (४९ अब्ज डॉलर) पोहोचली आहे. सॉफ्टबँकेची अनेक कंपन्यांमध्ये गुंतवणूक आहे. यात उबर, डोअरडॅश, टी-मोबाइल आणि आर्म या कंपनीचा समावेश आहे. अमेरिकेतील बँकिंग संकट आणि रशिया-युक्रेन युद्ध यांच्यामुळे जागतिक पातळीवर आर्थिक अनिश्चिततेचे वारे आहे. यामुळे सॉफ्टबँकेने गुंतवणूक केलेल्या कंपन्यांच्या समभागात घसरण होऊन फटका बसला आहे.

Story img Loader