सुवर्ण गुंतवणुकीचे विविध पर्याय काय आहेत हे आपण सतत पाहत आलेलो आहोत, प्रत्यक्ष सोनं आणि डिजिटल सोनं याच्यामधली तफावत आपण बऱ्याच वेळेला बऱ्याच लेखांमध्ये किंवा बऱ्याच ठिकाणी पाहिलेली आहे आणि ऐकलेली आहे, ज्याच्यामुळे आपल्याला हे नक्कीच कळले की प्रत्यक्ष सोनं घेण्यापेक्षा डिजिटल सोन्यामधील गुंतवणूक नक्कीच फायदेशीर आहे… पण मग आज आपण हे पाहूयात की डिजिटल गोल्ड मध्ये नक्की कुठला प्रकार सर्वसामान्य जनतेसाठी जास्त फायद्याचा आहे, सुरक्षित आहे आणि सहज उपलब्ध आहे.

डिजिटल सोन्याची आपण एक दोन ते तीन प्रकारांमध्ये विभागणी करूयात. सॉव्हरिन गोल्ड बॉण्ड अर्थात SGB (सार्वभौम सुवर्ण रोखे) हा एक प्रकार घेऊयात आणि त्यासमोर इतर डिजिटल गोल्ड प्रकार आपण पाहूयात.

gold price increased
लग्नाच्या हंगामात सोन्याच्या दराने वाढवली चिंता… हे आहे आजचे दर…
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
public sector banks npa marathi news
सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे ‘एनपीए’ ३.१६ लाख कोटींवर
jan dhan account marathi news
अकरा कोटी निष्क्रिय जनधन खात्यांमध्ये १४,७५० कोटी पडून
Ratnagiri assembly defeat , Shivsena Thackeray Ratnagiri , Ratnagiri latest news, Ratnagiri shivsena news,
रत्नागिरी विधानसभेचा पराभवाचा वाद देवाच्या दारात, ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी गद्दारांना शिक्षा देण्यासाठी घातले गाऱ्हाणे
Shani Nakshatra transformation 2024
२०२५ सुरू होण्याआधीच शनी देणार बक्कळ पैसा; नक्षत्र परिवर्तनाने मिळणार पैसा आणि प्रतिष्ठा
Gold Silver Price Today 10 December 2024 in Marathi
Gold Silver Rate : सोनं ७७ हजारांच्या पार ! जाणून घ्या, तुमच्या शहरातील सोन्या-चांदीचा दर
sunk deposits loksatta news
विश्लेषण : बुडालेल्या ठेवी परत मिळू शकतात? शासनाचे नवे परिपत्रक काय?

आणखी वाचा: Money Mantra: मेडिक्लेम पॉलिसी कुठली घ्यावी?

सॉव्हरिन गोल्ड बॉण्ड हे भारत सरकार द्वारा संरक्षित, रिझर्व बँकेद्वारे मार्केटमध्ये आणले जातात. यात केलेली गुंतवणूक ही जवळपास १००% सुरक्षित मानली जाते तर डिजिटल सोन्यामध्ये काम करणाऱ्या इतर कंपन्या या त्यांच्या त्यांच्या विश्वासार्हतेनुसार काम करत असतात. त्यांना सरकारचा पाठिंबा किंवा सुरक्षितता नसते हा महत्त्वाचा फरक आपल्याला लक्षात घ्यावा लागेल.

दुसरा फरक हा की इतर ज्या काही कंपन्या डिजिटल गोल्ड मध्ये काम करतात त्याच्यामध्ये सुद्धा दोन प्रकार आहेत. काही कंपन्या ज्या ठिकाणी तुम्ही अत्यंत कमी रकमेमध्ये म्हणजे केवळ दहा रुपयांमध्येही सोनं खरेदी करू शकता आणि त्यांच्याकडच्या आपल्या अकाउंट मधे आपण ते ठेवू शकतो. हे असं दहा रुपयांना सोनं खरेदी करणाऱ्यांची संख्या दहा हजारपेक्षा जास्त असल्यास त्याची किंमत मोठी म्हणजे एक लाख होते आणि हे लाखभर रुपये आजच्या भावानुसार १५ ते १८ ग्रॅम सोनं या कंपन्या खरेदी करतात आणि ते त्यांच्या डिपॉझिटरी सेवा देणाऱ्या भागीदाराकडे ठेवतात. हे करत असताना जीएसटीची रक्कमही द्यावी लागते. हे थोडक्यात प्रत्यक्ष सोनं खरेदी केल्यासारखंच आहे.

आणखी वाचा: Money Mantra: म्युच्युअल फंड निवडताना काय पाहावे?

त्यामुळे सॉव्हरिन गोल्ड बॉण्डशी तुलना करायची झाल्यास सॉव्हरिन गोल्ड बॉंड खरेदी करताना जीएसटी लागत नाही तर काही डिजिटल कंपन्यांकडे जीएसटी लागतो, तर काही डिजिटल कंपन्या सोन्याचे फक्त बुकिंग करतात जे करताना अत्यंत कमी रक्कम म्हणजे फक्त हजार रुपये भरून सुद्धा एक तोळ्याचे गोल्ड बुकिंग करता येतं. उर्वरित रक्कम कंपनीच्या नियमानुसार एक वर्ष ते पाच वर्षाच्या हप्त्यामध्ये भरून तुम्हाला सोने खरेदी करता येतं. अशी सुविधा आपल्याला गोल्ड बॉण्डमध्ये मिळत नाही. त्यामुळे बिनव्याजी हप्त्यांमध्ये सोनं खरेदी करण्याची सुविधा काही डिजिटल कंपन्या देऊ करतात. तो मोठा फायदा सर्वसामान्यांना होऊ शकतो कारण केवळ हजार रुपये मासिक हप्ता भरून सुद्धा एक तोळा सोनं आपण पाच वर्षांमध्ये घेऊ शकतो याची किंमत मॅच्युरिटीच्या वेळेस कदाचित लाख रुपये झालेली असेल. हा फायदा मिळू शकतो जो फायदा सॉव्हरिन गोल्ड बॉण्डमध्ये मिळणार नाही.

सॉव्हरिन गोल्ड बॉंण्डमध्ये केलेली गुंतवणूक जर आपण पाच वर्ष ते आठ वर्ष कायम केली तर आपल्याला वाढणाऱ्या रकमेवर कुठल्याही प्रकारचा टॅक्स द्यायची गरज पडत नाही. अर्थात आपल्याला टॅक्सचा बेनिफिट मिळू शकतो जो डिजिटल गोल्डमध्ये व्यवहार करणाऱ्या कंपन्यांकडून मिळू शकत नाही हा एक महत्त्वाचा भाग लक्षात घ्यायला हवा.

सॉव्हरिन गोल्डमध्ये केलेली गुंतवणूक आपण बँकेमध्ये ठेवून त्यावर सोनेतारण कर्ज घेऊ शकतो ही सुविधा इतर काही डिजिटल गोल्डमध्ये काम करणाऱ्या कंपन्या देत नाहीत. हा महत्त्वाचा फरक लक्षात ठेवणं गरजेचं आहे.

अजून एक महत्त्वाचा फरक म्हणजे इतर काही डिजिटल गोल्ड कंपन्या त्यांच्याकडील सोनं तुम्ही व्हर्च्युअली जरी विकलं तरीसुद्धा तीन टक्क्यापर्यंतची रक्कम प्रोसेसिंग फी म्हणून कापतात तर काही कंपन्या आपलं सोनं त्यांच्याकडे ठेवण्यासाठीची फी सुद्धा वेगळी आकारतात. अशी कुठल्याही प्रकारची फी किंवा कपात सॉव्हरिन गोल्ड बॉण्डमध्ये होत नाही त्याची शंभर टक्के रक्कम आपल्याला आपल्या खात्यावर मिळून जाते.

सॉव्हरिन गोल्डमध्ये सध्या फार मोठ्या प्रमाणावर व्यवहार होत नसल्यामुळे आपल्याला योग्य भाव योग्य वेळी मिळेल याची खात्री सध्या नाहीये परंतु जसजशी जनजागृती होईल तसं या व्यवहारांची संख्या लवकरच वाढायला सुरुवात होईल. गोल्ड बॉण्डमधलं ट्रेडिंगसाठी असणारा व्हॉल्युम कमी आहे तो वाढण्यास मदत होईल.

Story img Loader