या आठवड्याच्या अखेरीस भारतीय शेअर बाजार सावध दिसले. बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचा सेन्सेक्स ०.३१ टक्क्यांनी कमी होऊन ६४९४८ वर स्थिरावला. तर नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा निफ्टी ०.२८ टक्क्यांनी कमी होऊन १९३१० वर स्थिरावला. या आठवड्यातील शेअर्समधील उलाढालीचा विचार केल्यास मारुती सुझुकी, रिलायन्स, नेसले, ॲक्सिस बँक, हिंदुस्तान युनिलिव्हर या शेअर्समध्ये तेजी दिसली. तर टाटा कन्सल्टन्सी सर्विसेस, टेक महिंद्रा, इन्फोसिस, विप्रो आणि सन फार्मा या कंपन्या गुंतवणूकदारांनी पसंत केल्या नाहीत. त्यामुळे शेअरच्या भावात घसरण दिसून आली. यापैकी टेक महिंद्रा आणि टाटा कन्सल्टन्सी यांचे शेअर जवळपास दोन टक्क्यांनी उतरले.

या आठवड्यात आयटीसी या एफएमसीजी श्रेणीतील कंपनीचे पहिल्या तिमाहीचे आकडे जाहीर झाले. याचबरोबर आयटीसी हॉटेल्स लिमिटेड या कंपनीची आयटीसी मधून वेगळी कंपनी म्हणून लिस्टिंग करण्याच्या डीमर्जर या प्रस्तावाला सुद्धा मान्यता देण्यात आली. मात्र आयटीसी चा समभाग १.५२% एवढा घसरला.

government banks earned net profit
सरकारी बँकांना सहामाहीत ८६ हजार कोटींचा निव्वळ नफा
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
inflation rate declined
किरकोळ महागाई दराची उसंत, नोव्हेंबरमध्ये ५.४८ टक्क्यांवर घसरण
indian stock market nifty sensex
अमेरिकी महागाई दराच्या प्रतीक्षेत निर्देशांकात नगण्य वाढ
jan dhan account marathi news
अकरा कोटी निष्क्रिय जनधन खात्यांमध्ये १४,७५० कोटी पडून
equity funds investment declined
इक्विटी फंडांतील ओघ ओसरला! नोव्हेंबरमध्ये १४ टक्क्यांनी घटून ३५,९४३ कोटींवर
sunk deposits loksatta news
विश्लेषण : बुडालेल्या ठेवी परत मिळू शकतात? शासनाचे नवे परिपत्रक काय?
loksatta money motra article Growth and Value strategy
तुमची रणनीती काय? ‘ग्रोथ की व्हॅल्यू’

आणखी वाचा: आयटीसी आणि आयटीसी हॉटेल यांचे डीमर्जर

लिबर्टी ग्लोबल आणि इन्फोसिस या कंपन्यांनी एकत्र येऊन ब्रॉडबँड सेवा, दूरसंचार, डिजिटल मनोरंजन या क्षेत्रात व्यवसाय करण्याचे ठरवले आहे. बाजाराने याचे स्वागत केले व इन्फोसिस चा शेअर थोडासा वर गेलेला दिसला. आयटी क्षेत्रातील दुसरी कंपनी एलटीआयमाईंडट्रीला ॲमेझॉन वेब सर्व्हिसेस या कंपनीकडून डिजिटल क्षेत्रातील नवी ऑर्डर मिळाली.

कोल इंडिया आणि ओएनजीसी या दोन्ही सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांचे शेअर घसरलेले पाहायला मिळाले. भारताच्या क्रेडिट रेटिंग संबंधी आंतरराष्ट्रीय स्तरावर नकारात्मक बातम्या येत होत्या. या पार्श्वभूमीवर ‘मूडीज’ या आंतरराष्ट्रीय स्तरावरील रेटिंग एजन्सीने भारताचे रेटिंग ‘BAA3’ म्हणजेच ‘स्टेबल आउटलूक’ म्हणून जाहीर केले आहे. असे असले तरीही भारतातील राजकीय परिस्थिती, सामाजिक स्तरावरील घडत असलेल्या घटना आणि भारतावरील वाढते कर्ज यावर कंपनी लक्ष ठेवून आहे असेही म्हटले आहे.

आणखी वाचा: Money Mantra: ‘मिशो’च्या नफ्याचं गमक काय?

जुलै महिन्यात भारताची एकूण आयात आणि निर्यात घटली. आयात १७ टक्क्याने तर निर्यात १५.९% ने कमी झाली. असे असले तरी रशियाकडून भारतात होणारी क्रूड ऑइलची आयात विक्रमी पातळीवर पोहोचली आहे. एप्रिल ते जुलै २०२३ या कालावधीत २०.४५ बिलियन डॉलर्स एवढ्या मूल्याचे खनिज तेल आयात केले गेले. जागतिक बाजारांचा अंदाज घ्यायचा झाल्यास जपान आणि चीन या दोन्ही बाजारातून नकारात्मक बातम्या समोर येत आहेत. जपानची अर्थव्यवस्था महागाईच्या समस्येमुळे ग्रासलेली असली तरी लवकरच त्यावर उपाययोजना केल्या जातील. तरीही जपान आणि चीन मधली अर्थव्यवस्था जागतिक बाजारासाठी चिंतेचा विषयच आहे.

‘फीच’ या आघाडीच्या क्रेडिट रेटिंग एजन्सीने अमेरिकन बँकिंग व्यवस्थेच्या स्थितीबद्दल आपले मत प्रतिकूल नोंदवले आहे. कर्ज आणि नफा यांची स्थिती सुधारली नाही तर वित्तसंकट ओढवू होऊ शकते. अमेरिकेतील महागाई नियंत्रित करण्यासाठी अमेरिकेची केंद्रीय बँक कोणता निर्णय घेते याकडे सगळ्यांचे लक्ष आहे. अमेरिकेतील अर्थव्यवस्था मंदावली तर त्याचा थेट परिणाम भारतातील आयटी कंपन्यांच्या व्यवसायावर होत असतो. त्यामुळे भारतातील आयटी कंपन्यांचे शेअर या आठवड्यामध्ये गडगडलेले पाहायला मिळाले.

दरम्यान ११ ऑगस्ट ते १८ ऑगस्ट या आठवड्याच्या काळात काही प्रमुख मिड आणि स्मॉल कॅप कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी उलाढाल दिसून आली. जवळपास ५० स्मॉल कॅप कंपन्यांचे शेअर्स दोन आकडी नफा गुंतवणूकदारांच्या पदरात पाडून गेले. कोचीन शिपयार्ड (३०.६५ % ) बालाजी टेलिफिल्म (२१.५२ % ) अपार इंडस्ट्रीज (१९.४९ % ) कॉफी डे इंटरप्राईझ (१७.२६ % ) पंजाब केमिकल (१५.९५ % ) जम्मू काश्मीर बँक (१६.२१ %) हिताची एअर कंडिशनिंग (२१.९० % ) या शेअर्समध्ये जोरदार खरेदी दिसून आली. सेक्टरल इंडेक्स चा विचार करता बीएससी मेटल २ % , बीएससी टेलिकॉम २ % , बीएससी ऑइल अँड गॅस १.२% घसरले.

निफ्टीच्या १९५०० लेव्हलकडे लक्ष
येत्या आठवड्यात निफ्टी साठी १९,१०० आणि १९२१० या निफ्टी लेव्हल्सचा नीट अभ्यास करावा लागेल. निफ्टीसाठी १९५०० ही २० EMA पातळी आहे. जर आठवडाभर निफ्टी त्याखालीच बंद झाला तर येत्या आठवड्यासाठीची निफ्टीची गणिते पुन्हा बदलू शकतात.

Story img Loader