तीन दिवसाच्या पडझडीनंतर शुक्रवार अखेरीस (१९ जानेवारी २०२४) शेअर बाजारांनी पुन्हा एकदा तेजीच्या दिशेने वाटचाल सुरू केली. आणि शनिवारच्या सत्रात ही तेजी पसरून पुन्हा बाजार लाल रंगात बंद झालेले दिसले. २० जानेवारी २०२४ रोजी संपलेल्या सप्ताहाअखेरच्या आकडेवारीनुसार ‘सेन्सेक्स’ २६० अंशाने कमी होऊन ७१४२५ वर स्थिरावला तर ‘निफ्टी-५०’ ३७ अंशांनी कमी होऊन २१५८६ वर स्थिरावला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

आठवड्या अखेरीस निफ्टीतील हिंदुस्थान युनिलिव्हर, महिंद्रा अँड महिंद्रा, टीसीएस, इंडसइंड बँक आणि एचसीएल टेक्नॉलॉजी हे शेअर्स घसरलेले पाहायला मिळाले. कोल इंडिया, अदानी पोर्ट, अदानी एंटरप्राइजेस, कोटक महिंद्रा बँक आणि आयसीआयसीआय बँक या शेअर्समध्ये तेजी दिसून आली. तिसऱ्या तिमाहीची आकडेवारी जाहीर झाल्यावर निकाल समाधानकारक न आल्यामुळे हिंदुस्तान युनिलिव्हर या कंपनीच्या शेअरमध्ये खरेदीचा सपाटा दिसून आला.

हेही वाचा :दोन घरांतील गुंतवणूक ग्राह्य

बँक, मेटल, पॉवर या सेक्टरल इंडेक्स मध्ये अर्धा ते एक टक्क्याची वाढ दिसली तर एफएमसीजी, आयटी, फार्मा आणि रिअल इस्टेट हे सेक्टरल इंडेक्स अर्ध्या ते एक टक्क्यांनी घसरले. निफ्टी आणि सेन्सेक्समध्ये आठवड्याभरामध्ये दीड टक्क्याची घट नोंदवली गेली तर मिडकॅप आणि स्मॉलकॅप मध्ये मात्र खरेदी झाली व हे दोन्ही निर्देशांक अर्धा ते एक टक्क्यावर बंद झाले.

एचडीएफसी बँक आणि घसरणीला सुरुवात

आठवड्याच्या सुरुवातीला एचडीएफसी बँकेतील शेअर्सच्या जोरदार घसरणीने बाजारामध्ये चिंतेचे वातावरण पसरले होते. एचडीएफसी आणि एचडीएफसी बँक या दोन कंपन्यांच्या विलीनीकरणानंतर तयार झालेल्या महाकाय बँकांपैकी एक असलेल्या कंपनीचे शेअर्स दोन दिवसात दहा टक्क्यांनी घसरले. याचा थेट परिणाम बाजाराच्या मनोधैर्यावर झाला.

हेही वाचा : Money Mantra : प्रश्न तुमचे, उत्तरं तज्ज्ञांची

५२ आठवड्यातील उच्चांकाचा विक्रम

स्वान एनर्जी, रेल विकास निगम, जेके पेपर, आयआरएफसी, हुडको, आरती इंडस्ट्रीज यासह साडेतीनशे कंपन्यांनी आठवड्याअखेरीस तेजी अनुभवली व शेअर्सचे भाव ५२आठवड्यातील उच्चांकाला जाऊन पोहोचले. आरती इंडस्ट्रीज या कंपनीला आंतरराष्ट्रीय कंत्राट मिळाल्याने तो शेअर वरच्या दिशेला वाटचाल करत राहणार आहे, असे दलाली पेढ्यांनी म्हटले आहे.

निकालांची सुरुवात आशादायक

ऑक्टोबर ते डिसेंबर या तिसऱ्या तिमाहीसाठी कंपन्यांचे निकाल यायला सुरुवात झाली आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज या कंपनीचे तिमाही निकाल अपेक्षेप्रमाणे समाधानकारक आले आहेत. व्यवसायामध्ये तीन टक्के वाढ नोंदवताना कंपनीची एकूण विक्री जवळपास अडीच लाख कोटी इतकी झाली आहे तर तिमाही नफा १९६४१ कोटी एवढा नोंदवला गेला आहे. रिलायन्स जिओचा तिसऱ्या तिमाहीचा नफा १२% वाढून पाच हजार दोनशे कोटींवर पोहोचला आहे कंपनीने एक कोटी नवीन ग्राहक डिसेंबर महिन्यामध्ये मिळवले.

फार्मा क्षेत्रातील आघाडीची कंपनी असलेल्या ‘लुपिन’ या कंपनीचा शेअर ५२ आठवड्यातील सर्वोच्च पातळीवर पोहोचला. अमेरिकेतील यु एस फूड अँड ड्रग ऍडमिनिस्ट्रेशन या संस्थेकडून गाऊट या आजारावरील औषधाच्या विक्रीसाठी कंपनीला परवानगी मिळाली आहे.

हेही वाचा : Money Mantra : एचडीएफसी बँकेच्या शेअरमध्ये घसरण, तुमच्या फंडांचा आढावा घेतलात का?

भारतातील आघाडीच्या पाईप बनवणाऱ्या ‘फिनोलेक्स इंडस्ट्रीज’ या कंपनीचे निकाल समाधानकारक आले आहेत. डिसेंबर अखेरीस संपलेल्या तिमाही मध्ये कंपनीने नफ्यामध्ये घसघशीत २४ टक्क्याची वाढ दर्शवली आहे. विक्रीमध्ये किंचितशी घट आली असली तरीही कंपनीचा नफा वाढलेला आहे. ‘पीव्हीसी पाईप’ या व्यवसायातील कंपनीचे बाजारातील सर्वोच्च स्थान कायम ठेवण्यासाठी कंपनीचा प्रयत्न राहणार आहे. कृषी क्षेत्राबरोबर प्लंबिंग व्यवसायामध्ये कंपनीला भरघोस विक्रीचा फायदा झाला आहे.

‘इरेडा’ या कंपनीचा शेअर दहा टक्के वाढून १४८ पर्यंत पोहोचला. कंपनीने तिमाही नफ्यामध्ये ६७% ची घसघशीत वाढ जाहीर केल्यानंतर हा परिणाम दिसून आला. ‘एन.एच.पी.सी.’ या कंपनीचा शेअर जवळपास दहा टक्के वाढून ८० रुपयावर पोहोचला. कंपनीने म्हणजेच सरकारने आपल्याकडील साडेतीन टक्के हिस्सा खुल्या बाजारात विकल्यामुळे भावात तेजी पाहायला मिळाली.

हेही वाचा :Money Mantra : फ्लोटिंग आणि फिक्स्ड रेटचे फायदे-तोटे काय असतात? 

‘हिमाचल फ्युचरिस्टिक कम्युनिकेशन’ १२% वाढून जवळपास शंभर रुपयांच्या आसपास पोहोचला आहे. कंपनीला 5G तंत्रज्ञानाशी संबंधित महत्वाची यंत्रसामग्री पुरवण्याची ऑर्डर मिळाल्याने शेअर मध्ये उसळी पाहायला मिळाली.

निफ्टीचा टेक्निकल अंदाज

आगामी आठवड्यात निफ्टीसाठी २१५०० ते २१७०० ही पातळी महत्त्वाची ठरणार आहे. जर २१५०० ची पातळी मोडली तर निफ्टी २१३०० व २११५० या पातळीवर स्थिरावू शकतो. विरुद्ध दिशेने जर ‘ब्रेकआऊट’ मिळाला तर २१७०० ही पातळी महत्त्वाची ठरणार आहे.