शिवाजी महाराजांनी स्वराज्याचा पाया रचला, तर सुवर्णकाळ हा पेशवाईत आला. तेव्हा मराठ्यांच्या साम्राज्याचा झेंडा हा अटकेपार (आता पाकिस्तानमध्ये असलेल्या किल्ल्याचे नाव – अटक) रोवला गेलेला. तेव्हा त्या वेळच्या पेशव्यांच्या ऐश्वर्याची, श्रीमंतीच्या थाटाची भुरळ सर्वांना पडत असे. तेव्हा सामान्य माणसाला आपला थाट ‘बाजीराव पेशव्यांसारखा’ वाटायचा. मात्र जोपर्यंत ते त्याच्या स्वप्नापुरतं मर्यादित होतं तोपर्यंत ठीक होतं. पण वास्तवातदेखील त्या सामान्य माणसाची वागणूक ही ‘श्रीमंत पेशव्यांसारखी’ व्हायला लागली तर त्याला भानावर आणण्यासाठी ‘बाबा रे, तुझ्या खिशात नाही आणा, तर तुला बाजीराव का म्हणा’ याचे स्मरण करून दिलेच पाहिजे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
पेशवेकालीन पैशाच्या देवाणघेवाणीसाठी ‘आण्याची पद्धत’असायची. आता आतापर्यंत २५ पैशाला चार आणे, ५० पैशाला आठ आणे बोलण्याची पद्धत प्रचलित होती. आता हे सर्व आठवायचं कारण कंपन्यांचे तिमाही आर्थिक अहवाल. दोन आर्थिक वर्षातील जुलै ते सप्टेंबर तिमाहीतील तुलनात्मक आढावा घेतल्यास जाहीर झालेले कंपन्यांचे तिमाही वित्तीय निकाल, हे मूलभूत विश्लेषणाच्या (फंडामेंटल ॲनालिसीस) ठोकताळ्यांचा आधार घेत टॉप लाइन, बॉटम लाइन जमल्यास ‘बीटवीन द लाइन’ स्वरूपात आर्थिक अहवाल वाचायचा प्रयत्न केल्यास, बहुतांश कंपन्यांची आर्थिक आघाडीवर विक्री, निव्वळ नफा, पी/ई, ईपीएस अशा आर्थिक प्रकृतीत ‘चार आण्याची सुधारणा’ तर सोडाच, पण कित्येक कंपन्यांना तोटा झाल्याचे दिसून आले. परिणामी या कंपन्यांच्या समभागांचे भाव भांडवली बाजारात कोसळले. सरलेल्या दोन महिन्यांत निफ्टी निर्देशांकावर ११ टक्क्यांची घसरण झाली तर बहुतांश कंपन्यांचे समभाग २० ते ४० टक्क्यांपर्यंत घसरले. ज्या कंपन्या अगोदरच तोट्यात होत्या, त्यांचा जुलै ते सप्टेंबर तिमाहीतील तोटा आणखीच वाढला. त्यांच्या मुदलातच घट आल्याने अशा कंपन्यांची आर्थिक स्थिती बघता या कंपन्यांच्या ‘खिशात नाही आणा, तर त्यांना त्या क्षेत्रातील बाजीराव का म्हणा’ असे प्रश्नार्थक उद्गार गुंतवणूकदारांच्या तोंडातून आपसूकच निघून जातात. या पार्श्वभूमीवर या आठवड्याच्या वाटचालीकडे वळू या.
हेही वाचा…माझा पोर्टफोलियो : वाहन उद्योगाचा भक्कम कणा
शुक्रवारचा बंद भाव: सेन्सेक्स: ८१,७०९.१२ / निफ्टी: २४,६७७.८०
या स्तंभातील २५ नोव्हेंबरच्या ‘मूल्याची किंमत’ या लेखात निफ्टी निर्देशांकाच्या भविष्यकालीन वाटचालीबद्दल वाक्य होतं… “येणाऱ्या दिवसांत निफ्टी निर्देशांकाने सातत्याने २३,५०० चा स्तर राखल्यास त्याचे प्रथम वरचे लक्ष्य २४,१०० ते २४,३०० असेल. या स्तरावरून एक हलकीफुलकी घसरण २३,७०० पर्यंत अपेक्षित असेल. त्यानंतर निफ्टी निर्देशांकाचे वरचे लक्ष्य २४,५०० ते २४,८००असेल.”
हे वाक्य काळाच्या कसोटीवर तपासता, निफ्टी निर्देशांकांने २३,५०० चा स्तर राखत, २७ नोव्हेंबरला २४,३५४ चा उच्चांक नोंदवला, तेथून हलकीफुलकी घसरण २३,८७३ पर्यंत झाली. या स्तराचा आधार घेत, निफ्टी निर्देशांकाने लेखात नमूद केलेले २४,८०० चे वरचे लक्ष्य सरलेल्या सप्ताहातील गुरुवारी २४,८५७ उच्चांक मारत साध्य केले.हलक्याफुलक्या घसरणीतही राखला गेलेला २४,३५० ते २४,००० चा स्तर येणाऱ्या दिवसातही निफ्टी निर्देशांकाने सातत्याने राखल्यास त्याचे वरचे लक्ष्य २५,००० ते २५,३५० असेल. आता आपण ११ नोव्हेंबरच्या ‘बाळसं की सूज’ या लेखातील दुसऱ्या सूत्राकडे वळू या…
देशाचे औद्योगिक, व्यापारविषयक धोरण: लोकशाही देशातील संसदेच्या निवडणुका व त्यानंतर स्थापन होणारे नवीन सरकार व त्या सरकारचे औद्योगिक, व्यापार, अर्थविषयक धोरण हे अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने ‘महत्त्वाचा वळणबिंदू’ असतो. भारताच्या बाबतीत २०२४ सालच्या लोकसभेच्या निवडणुकीनंतर नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय लोकशाही आघाडी पुन्हा सत्तेत येऊन अर्थव्यवस्थेशी निगडित अशा अर्थ, उद्योग, व्यापार, रेल्वे, परिवहन व रस्ते बांधकाम खात्यातील जुन्या मंत्र्यांना पुन्हा त्यांचीच मंत्रालये देत धोरण-सातत्य राखले गेल्याने, भांडवली बाजारात हर्षोल्हास झाला व अल्पावधीत ४ जून ते २७ सप्टेंबर या काळात निफ्टी निर्देशांकांवर ४,९९६ अंशांची (२१,२८१ च्या नीचांकावरून २६,२७७ उच्चांक) वाढ ही ‘भूमितीय श्रेणीत’ झाली. मात्र तीच विनाशास कारणीभूत ठरली.
नोव्हेंबरमधील निफ्टी निर्देशांकावरील ३,००० अंशांच्या घातक उतारांची कारणे :
सरकारी पातळीवर ‘धोरण सातत्य’ असूनही, वर्षभरात अपेक्षित असलेली निफ्टी निर्देशांकावरील ४,९९६ अंशांची वाढ ही अवघ्या साडेतीन महिन्यांत झाली. अतिघाई संकटात नेई या उक्तीप्रमाणे ‘भूमितीय श्रेणीत’ झालेली वाढ, त्यातच निराशाजनक तिमाही निकालांची करपलेली फोडणी, तर घसरणीचा परमोच्च बिंदू नोव्हेंबर महिन्यात आंतरराष्ट्रीय स्तरावरील परदेशी गुंतवणूक संस्थांनी भारतीय भांडवली बाजारात समभागांची सपाटून विक्रीतून नोंदविला गेला. याचं कारण हे तांत्रिक विश्लेषणातील ‘इलियट वेव्ह’ संकल्पनादेखील समजावून देते. या संकल्पनेप्रमाणे निफ्टी निर्देशांकाचे २५,९०० ते २६,३०० चे वरचे लक्ष्य येते. सरलेल्या २७ सप्टेंबरला निफ्टी निर्देशांकाने २६,२७७ चा उच्चांक मारत वरचे लक्ष्य साध्य केली. (‘लोकसत्ता अर्थ वृत्तान्त’च्या वाचकांना इलियट वेव्ह संकल्पनेतील निफ्टी निर्देशांकावरील २६,२७७ च्या उच्चांकाची माहिती आगाऊ स्वरूपात या स्तंभातील ९ सप्टेंबरच्या ‘तेजीमंदीच्या चक्राचा ल.सा.वि.’ लेखात अवगत करून दिली होती.) नेमके त्यानंतरच परदेशी गुंतवणूक संस्थांनी तुफान विक्री करत, निफ्टी निर्देशांकावर ३,००० अंशांची दाहक मंदी दिली.
हेही वाचा…बांगलादेशातील अराजकता अन् कापूस उत्पादकांना लाभ
(क्रमशः)‘शिंपल्यातील मोती’ सिक्व्वेंट सायंटिफिक लिमिटेड
(शुक्रवार, ६ डिसेंबरचा बंद भाव – १९६.४३ रु.) स्वातंत्र्य मिळाल्यापासून १९८० पर्यंत शेती प्रामुख्याने निसर्गावर अवलंबून असल्याने निसर्गाच्या लहरीपणाचा फटका शेतकऱ्याला बसत आला आहे. शेतीसह पूरक व्यवसाय म्हणून ‘श्वेत क्रांती’ची संकल्पना १९६० साली वर्गीस कुरीयन (अमूल मॅन) यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झाली. यात पशुधनावर आधारित दुग्ध व्यवसाय, कुक्कुटपालन, लोकरीचा व्यवसाय असे विविध पूरक व्यवसाय शेतकऱ्यांसाठी सुरू झाले. या पशुधनाच्या स्वास्थ्याची काळजी घेण्यास तत्पर असणारी राजाराम नारायणन यांच्या मार्गदर्शनाखाली शंभरहून अधिक देशात कार्यरत असलेली, आंतरराष्ट्रीय नियामक संस्था ज्यात अमेरिकेचे ‘अन्न, औषध प्रशासन’ (यूएस एफडीए) यासह जागतिक आरोग्य संघटनेकडून प्रमाणन मिळविलेली औषधे प्रमाणित असलेली ‘सिक्व्वेंट सायंटिफिक लिमिटेड’ कंपनीचा समभाग आपला आजचा ‘शिंपल्यातील मोती’ आहे.
आर्थिक आघाडीवर, दोन आर्थिक वर्षातील जुलै ते सप्टेंबर तिमाहीतील तुलनात्मक आढावा घेतल्यास विक्री ४९.१२ कोटींवरून ४१.९९ कोटी, १.४० कोटींच्या करपूर्व तोट्यासमोर ६.४१ कोटींचा नफा, तर ९२ लाखांच्या तोट्यातून ४.२६ कोटींचा घसघशीत निव्वळ नफा झाला आहे. समभागाचे आलेख वाचन करता समभागाने आपल्याभोवती २५ रुपयांचा परीघ निर्माण केलेला आहे. जसे की १७५…२००… २२५. येणाऱ्या दिवसात, समभागाने भांडवली बाजारात सातत्याने २३५ रुपयांचा स्तर राखल्यास, अल्पमुदतीचे वरचे लक्ष्य हे २५० रुपये, तर दीर्घमुदतीच वरचे लक्ष्य हे ३३५ ते ४०० रुपये असेल. सिक्व्वेंट सायंटिफिक लिमिटेड समभागामधील दीर्घमुदतीच्या गुंतवणुकीला १४० रुपयांचा ‘स्टॉप लॉस’ ठेवाव.महत्त्वाची सूचना : वरील समभागांत लेखकाची स्वतःची अथवा जवळच्या नातेवाईकांची गुंतवणूक नाही. वरील समभागाचे तटस्थ दृष्टीने परीक्षण करून ते वाचकांना सादर केलेले आहे.
आशीष ठाकूर लेखक भांडवली बाजार विश्लेषक आहेत. ashishthakur1966@gmail.com अस्वीकृती : शेअर बाजारातील व्यवहार हे बाजारातील जोखमीच्या अधीन आहेत. अंदाज चुकल्यास मुद्दल गमावण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी ‘स्टॉप लॉस’ आणि इच्छित लक्ष्य या संकल्पनांचे पालन करणे आवश्यक आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे.