गेल्या दोन महिन्यात भारतीय शेअर बाजारात अचानक चढ उतार होताना दिसत आहेत. अचानक गटांगळ्या खाणारा बाजार सावरतो आणि एका आठवड्यानंतर बाजारात आलेली तेजी कमी होऊन तो पुन्हा मंदीच्या दिशेने जायला लागतो ! नेमकी या अस्थिरतेमागील कारणे कुठली ? ती आजच्या लेखात समजून घेऊया.

सेन्सेक्स आणि निफ्टी म्हणजे सगळा शेअर बाजार नव्हे

शेअर बाजारातील कंपन्यांचे आकारानुसार मध्यम कंपन्या मोठ्या कंपन्या आणि लहान कंपन्या असे आकार पडतात. गेल्या तीन महिन्याचा अंदाज घेतल्यास यातली निफ्टी आणि सेन्सेक्स मधील सर्वच शेअर्स आपटले आहेत किंवा वर गेले आहेत असे म्हणता येत नाही. मिडकॅप आणि स्मॉल कॅप या कंपन्यांचे इंडेक्स अजूनही सेन्सेक्स आणि निफ्टी पेक्षा चांगला परतावा देताना दिसत आहेत.

MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं; म्हणाले…
Viral Trend Chastity Belts:
Chastity Belt: योनी शुचिता पट्ट्याचा इतिहास आणि त्यामागील…
It is advisable to be cautious for partnership firms and limited liability partnerships
भागीदारी फर्म व मर्यादित देयता भागीदारीसाठी आता सावधानता बाळगणे हिताचे
decisions in GST Council’s 55th meeting
अग्रलेख: अब तक ५६!
ICC Champions Trophy 2025 Schedule Venues and Grounds in Marathi
ICC Champions Trophy 2025 Schedule: भारत-पाकिस्तान २३ फेब्रुवारीला आमनेसामने; आयसीसीने जाहीर केलं चॅम्पियन्स ट्रॉफीचं वेळापत्रक
Sada Sarvankar
Sada Sarvankar : “मला निवडणूक लढवावीच लागेल”, सदा सरवणकर हतबल; म्हणाले, “राज ठाकरेंनी माझी…”
Karuna Sharma Cried
Karuna Sharma : उमेदवारी अर्ज बाद ठरल्याने ढसाढसा रडल्या करुणा शर्मा, धनंजय मुंडेंना म्हणाल्या, “तू राक्षस…”
Ladki Bahin Yojana
Maharashtra News Updates : लाडकी बहिण योजनेसंदर्भात आदिती तटकरे यांनी दिली महत्वाची अपडेट…

अदानी आणि शेअर बाजार

अमेरिकेतील भांडवली बाजार नियंत्रित करणाऱ्या नियामकांनी अदानी उद्योग समूहाबद्दल चौकशी करण्याचे निर्देश दिले. या बातमीवर बाजाराची तीव्र प्रतिक्रिया उमटली. अदानी उद्योग समूहासंबंधी सर्व कंपन्यांचे समभाग एकाएकी आपटू लागले. अर्थातच ही घसरण तात्पुरती होती. एक महिन्याचा अदानी एंटरप्राइजेस, अदानी पॉवर, अदानी ग्रीन एनर्जी यांचा चार्ट बघितल्यास नक्की एकाच दिशेने या शेअर्सची वाटचाल सुरू आहे असे म्हणता येणार नाही. अदानी उद्योग समूहाने आपल्यावर झालेल्या आरोपांची दखल घेत त्याबद्दल स्पष्टीकरणही जाहीर केले आहे. तरीही शेअर्स मधील व्होलाटाईल म्हणजेच अस्थिरता सुरूच आहे.

हेही वाचा : भागीदारी फर्म व मर्यादित देयता भागीदारीसाठी आता सावधानता बाळगणे हिताचे

परदेशी गुंतवणूकदारांनी फिरवलेली पाठ

ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या दोन महिन्यात भारतातील शेअर बाजारांमध्ये जी घसरण दिसून आली त्यातील बराच मोठा वाटा परदेशी गुंतवणूकदारांचा आहे. फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्वेस्टर म्हणजेच एफ.आय.आय. भारतीय बाजारात मोठ्या प्रमाणावर शेअर्समध्ये गुंतवणूक करत असतात. वर उल्लेखलेल्या दोन महिन्यात या गुंतवणूकदारांनी भारतीय बाजारातील आपले शेअर्स विकून विकण्याचा सपाटाच लावला होता. सर्वसाधारणपणे फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स जेव्हा विक्रीचा सपाटा लावतात त्यावेळी बाजार कोलमडतात असा अनुभव आहे. मात्र यावर्षीची परिस्थिती जरा वेगळी आहे. जवळपास सव्वा लाख कोटी रुपयांचे शेअर्स विकल्यानंतर डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात परदेशी गुंतवणूक दारांनी पुन्हा खरेदीला सुरुवात केली आहे.

म्युच्युअल फंड एसआयपी हक्काचा आधार !

गुंतवणुकीतून आकर्षक परतावा मिळत असल्यामुळे भारतातील गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणावर म्युच्युअल फंडाच्या माध्यमातून गुंतवणूक करायला सुरुवात केली. ज्यावेळी अशी गुंतवणूक खूपच मर्यादित होती त्यावेळी परदेशी गुंतवणूकदारांच्या प्रभावामुळे भारतीय बाजार अस्थिर असायचे. मात्र आता एवढी गंभीर परिस्थिती निश्चितच राहिलेली नाही. ज्यावेळी परदेशी गुंतवणूकदार बाजारातून पैसे काढून घेतात त्यावेळी बाजार खाली आल्यावर असे चांगले शेअर्स म्युच्युअल फंड कंपन्या विकत घेतात. दर महिन्याला गुंतवणूक होणाऱ्या एसआयपी या माध्यमाची आकडेवारी बघितल्यास हे चित्र स्पष्ट होईल. दरमहा वीस ते पंचवीस हजार कोटी इतकी प्रचंड मोठी रक्कम एसआयपीच्या माध्यमातून बाजारात ओतली जाते. त्यामुळे बाजार पुन्हा एकदा सावरतात.

हेही वाचा : राव की रंक?

बाजारातील पडझडीची कारणे कोणती ?

भारतीय अर्थव्यवस्थेसंबंधी असमाधानकारक आकडेवारी

रिझर्व्ह बँकेच्या अहवालानुसार भारतातील महागाईची आकडेवारी स्थिती म्हणावी तशी सुधारताना दिसत नाही. त्यात जीडीपीची आकडेवारी दुसऱ्या व तिसऱ्या तिमाहीसाठी समाधानकारक आलेली नाही. निवडणुकांमुळे भारत सरकारच्या तिजोरीतून होणाऱ्या खर्चाला कात्री बसली. याचा प्रभाव थेट भांडवली गुंतवणूक कॅपिटल एक्सपेंडिचर वर पडला. त्याचबरोबर भारतातील ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था अजूनही सक्षम झालेली नाही. ग्रामीण अर्थव्यवस्थेतील खर्च करण्याची क्षमता जोपर्यंत वाढत नाही तोपर्यंत जीडीपीची आकडेवारी सुधारणार नाही. याचा परिणाम शेअर बाजारांवर दिसत आहे.

गुंतवणूकदारांनी काय करावे ?

तुमची कंपनी नेमकी काय करते ? अर्थात त्या कंपनीचा व्यवसाय व्यवस्थित सुरू आहे ना ? हा गुंतवणूक करण्याचा सगळ्यात पहिला निकष असला पाहिजे.

जर कंपनीची विक्री आणि नफ्याची आकडेवारी वाढती असेल तर अल्पकाळात कंपनीचा शेअर पडलेला असला तरी तो दीर्घकाळात चांगला परतावा देतोच. ज्यांनी २०२० या वर्षानंतर नव्याने शेअर बाजारात प्रवेश केला त्यांना पहिले तीन वर्ष जसे आकर्षक रिटर्न्स दिसले तसे आता दिसत नाहीत हा कळीचा मुद्दा आहे. मात्र दहा वर्षापासून चांगल्या कंपन्यांचे शेअर्स निवडून त्यामध्ये गुंतवणूक कायम ठेवलेल्या लॉंग टर्म गुंतवणूक केलेल्या लोकांना नक्कीच याचे फायदे दिसत आहेत !

Story img Loader