आमच्या असोसिएशनमध्ये एकदा भारताच्या पहिल्या महिला आयपीएस डॉ. किरण बेदी यांचं व्याख्यान ऐकायची संधी मिळाली. आधी वाटलं की, त्या फक्त त्यांच्या कारकीर्दीसंदर्भातच बोलतील. अर्थात त्यांच्या जीवनातून अनेक गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. परंतु त्यांनी केलेलं एक विधान मला खूपच पटलं. एका महिला सल्लागाराने त्यांना विचारलं, “आजच्या काळात करिअर आणि घर सांभाळताना खूप नाकीनऊ येतात. करिअरकडे लक्ष दिलं तर घर-कुटुंबाकडे दुर्लक्ष होतं आणि घर-कुटुंब करत बसलो तर एक तर नोकरी करता येत नाही किंवा पुढे बढती घेता येत नाही किंवा पार्ट टाइम काही तरी करून कमी कमाईवर समाधान मानावं लागतं. एक स्त्री म्हणून तुम्ही काय सल्ला द्याल?” यावर डॉ. बेदी यांनी अतिशय चपखल असं उत्तर देऊन तिथे असलेल्या पुरुष सल्लागारांना पण जागं केलं. त्या म्हणाल्या, “आयुष्यात हवं ते मिळवायचं असेल तर मेहनत, शिस्त, चिकाटी, दूरदृष्टी तर हवीच. मात्र एका स्त्रीसाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे, ते म्हणजे नियोजित कर्तृत्व आणि पुढे जर कुटुंब वाढवायचं असेल तर काटेकोरपणे साधलेलं नियोजित मातृत्व. Do not be an accidental mother!” आणि हे वाक्य जेव्हा एका अशा स्त्रीकडून येतं, जिने त्या काळात पुरुषांची मक्तेदारी असणारं क्षेत्र निवडलं, गुन्हेगारी कमी करण्यासाठी युक्त्या लढवल्या, तिहार जेल सुधारलं आणि हे करता करता कुटुंब पण पुढे नेलं. तेव्हा तिथे बोलाची कढी अन् बोलाचा भात कसा बरं होईल? हे जरी आई होऊ पाहणाऱ्या स्त्रीसाठी जास्त महत्त्वाचं असलं, तरीसुद्धा एकंदर पालकत्व हेच एक मोठं आव्हान आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा