जर तुम्ही सुकन्या समृद्धी योजनेत (SSY) गुंतवणूक केली असेल, तर तुमची रक्कम मॅच्युरिटीवर ३ पट वाढणार आहे. त्याचबरोबर यामध्ये तुम्हाला मिळणारे व्याज एकूण गुंतवणुकीच्या दुप्पट असेल. पोस्ट ऑफिसच्या या सरकारी योजनेत १ एप्रिलपासून व्याजदर वार्षिक ८ टक्के करण्यात आला आहे. म्हणजेच आता मुलांच्या विशेषत: मुलींच्या नावावर असलेली ही लोकप्रिय सरकारी योजना (SSY) पूर्वीपेक्षा अधिक आकर्षक बनली आहे. विशेष म्हणजे या योजनेची मॅच्युरिटी २१ वर्षे आहे, मात्र यामध्ये पालकांना फक्त १५ वर्षे गुंतवणूक करावी लागेल. उर्वरित वर्षभर व्याज चक्रवाढ होत राहते. या योजनेत वर्षाला जास्तीत जास्त १,५०,००० रुपये जमा केले जाऊ शकतात. तसेच तुम्ही २५० रुपयांत खाते उघडू शकता.

सुकन्या समृद्धी योजनेचे कॅल्क्युलेटर

दरवर्षी १ लाख रुपयांच्या गुंतवणुकीचा अंदाज
SSY वर व्याज: ८ टक्के प्रतिवर्ष
वार्षिक गुंतवणूक: १ लाख रुपये
१५ वर्षांत गुंतवणूक: १५,००,००० रुपये
२१ वर्षांच्या मॅच्युरिटीवर एकूण रक्कम: ४४,८९,६९० रुपये
व्याज लाभ: २९,८९,६९० रुपये

Jeevan pramaan online process
Money Mantra: हयातीचा दाखला ऑनलाईन मिळवण्यासाठी जीवन प्रमाण सुविधा काय आहे?
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
Loans from State Bank, HDFC,
एचडीएफसी पाठोपाठ स्टेट बँकेकडून कर्ज महाग
loksatta editorial no interest rate cut by rbi retail inflation surges in october
अग्रलेख : म्हाताऱ्या शब्दांचा आरसा…
Mega Housing Lottery application process, entension, CIDCO
सिडकोच्या २६ हजारांच्या महागृहनिर्माण सोडत प्रक्रियेला महिन्याभराची मुदतवाढ
indian rupee falls to all time low against us dollar
अग्रलेख : काका… मला वाचवा!
public banks profit increase by 26 percent in first half fy 25
सरकारी बँकांच्या नफ्यात सहामाहीत २६ टक्के वाढ
young adults prefer to invest in stocks directly rather than mfs report by fin one
म्युच्युअल फंडापेक्षा तरुणाईचा कल थेट समभागांत गुंतवणुकीकडे; ९३ टक्के कमावत्या तरुणांत मासिक बचतीची सवय

तुमची एकूण गुंतवणूक १५ लाख रुपये आहे, परंतु मॅच्युरिटीवर तुम्हाला ४४,८९,६९० रुपये मिळतील, जे गुंतवणुकीच्या ३ पट असतील. तसेच तुम्हाला यावर २९,८९,६९० रुपये व्याज मिळेल, जे गुंतवणुकीच्याच्या तुलनेत जवळपास दुप्पट आहे.

कराच्या दृष्टीनेही ही योजना सर्वोत्तम

सुकन्या समृद्धी योजना ही करमुक्त योजना आहे. या EEE वर म्हणजेच कर सूट तीन वेगवेगळ्या स्तरांवर उपलब्ध आहे. प्रथम प्राप्तिकर कायद्याच्या कलम ८० सी अंतर्गत १.५० लाखांपर्यंतच्या वार्षिक गुंतवणुकीवर सूट मिळते. दुसरे म्हणजे त्यातून मिळणाऱ्या रिटर्नवर कोणताही कर नाही. तिसरे म्हणजे मॅच्युरिटीवर मिळणारी रक्कम करमुक्त असते.

हेही वाचाः सेन्सेक्स ८०० अंकांनी कोसळला; घसरणीमागील प्रमुख कारण काय?

मुदतपूर्तीपूर्वी पैसे काढता येतात

मुलगी १८ वर्षांची झाल्यावर तिच्या लग्नासाठी परिपक्वतेपूर्वी ५० टक्के रक्कम काढता येते. याशिवाय खाते उघडल्यानंतर ५ वर्षांनी काही विशिष्ट परिस्थितीत मुदतपूर्तीपूर्वी पैसे काढता येतात. जसे की, खातेदाराचा अचानक मृत्यू, पालकाचा मृत्यू, खातेदाराचा गंभीर आजार किंवा खाते सुरू ठेवण्यास असमर्थता असणे.

हेही वाचाः एलॉन मस्कच्या संपत्तीत मोठी घसरण, श्रीमंतांच्या यादीत अंबानी अन् अदाणींचे स्थान काय?

SSY: सुकन्या समृद्धी योजनेत कधी आणि किती व्याज?

१ एप्रिल २०१४: ९.१%
१ एप्रिल २०१५: ९.२%
१ एप्रिल २०१६ – ३० जून २०१६: ८.६%
१ जुलै २०१६ – ३० सप्टेंबर २०१६: ८.६%
१ ऑक्टोबर २०१६ – ३१ डिसेंबर २०१६: ८.५%
१ जुलै २०१७- ३१ डिसेंबर २०१७: ८.३%
१ जानेवारी २०१८- ३१ मार्च २०१८: ८.१%
१ एप्रिल २०१८- ३० जून २०१८: ८.१%
१ जुलै २०१८- ३० सप्टेंबर २०१८: ८.१%
१ ऑक्टोबर २०१८- ३१ डिसेंबर २०१८ : ८.५%
१ जानेवारी २०१९- ३१ मार्च २०१९ : ८.५%
१ जानेवारी २०२०- ३१ मार्च २०२० : ८.४%
१ एप्रिल २०२०-३० जून २०२० : ७.६%
१ जानेवारी २०२३ – ३१ मार्च २०२३ : ७.६%
१ एप्रिल २०२३ पासून: ८ %