महिंद्रा उद्योग समूहातील आघाडीचा ब्रँड असलेल्या स्वराज ट्रॅक्टर्स या कंपनीने स्वराज ‘8200 व्हील हार्वेस्टर’ हे नवीन मशीन बाजारात दाखल केले आहे. भारतामध्ये शेती व्यवसायामध्ये सर्वाधिक गुंतवणूक यंत्रांवर असली पाहिजे. यांत्रिक शेतीकडे वाटचाल सुरू होण्यासाठी किफायतशीर, भारतीय शेतीला आणि जमिनीला सुयोग्य ठरतील अशी आणि वापरण्यास सुलभ यंत्रे बनणे आवश्यक आहे. ट्रॅक्टर बनवण्यात ‘महिंद्रा अँड महिंद्रा’ चा हात कोणीच धरू शकत नाही. त्याचबरोबर आता अत्याधुनिक हार्वेस्टिंग मशीनचा समावेश कंपनीने आपल्या ताफ्यात केला आहे.

आणखी वाचा: Money Mantra: ‘मिशो’च्या नफ्याचं गमक काय?

Kavadi for lord importance of kavadi price of a kavadi
लोक-लौकिक : ‘कवडी’मोल!
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
India turmeric export target of 1 billion doller by 2030
हळदीचे १०० कोटी डॉलरचे निर्यातलक्ष्य
Artificial Intelligence, Sugarcane Farming, Lokshiwar ,
लोकशिवार : ऊस शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता
portfolio, investment , Alphaportfolio Concept ,
चला अल्फापोर्टफोलिओ तयार करूया
torres financial fraud loksatta news
Money Mantra : टोरेससारखी फसवणूक टाळायची असेल तर हा लेख तुमच्यासाठीच
SEBI is now also obsessed with AI to speed up the process Claims that work is underway on more than a dozen projects print eco news
प्रक्रियेत गतिमानतेसाठी सेबीचाही आता ‘एआय’ ध्यास! डझनभराहून अधिक प्रकल्पांवर काम सुरू असल्याचा दावा
Seizure and attachment action against 3000 properties for non-payment of property tax
मालमत्ता कर थकबाकीदारांच्या दारात आता बॅण्डवादन

हार्वेस्टिंग मशीनचा वापर नेमका कशासाठी?

सोप्या भाषेत हार्वेस्टर म्हणजे शेतातील पीक तयार झाल्यानंतर कापण्यासाठी, खुडण्यासाठी, तोडण्यासाठी बनवलेले मशीन होय. चांगल्या दर्जाच्या हार्वेस्टरचे काही गुणविशेष म्हणजे सलग किती आकारावरील पीक कापणीसाठी घेता येईल यासाठी रुंदी महत्त्वाची असते. म्हणजे कमीत कमी फेऱ्यांमध्ये अधिकाधिक पीक कापता येतं. इंजिन किती हॉर्स पॉवरचे आहे ? यावर त्याची शक्ती ठरते. तर ‘टॅंक क्षमता’ म्हणजेच हार्वेस्टिंग मशीनने तोडलेले पीक अर्थात त्याचे दाणे किंवा कणसं साठवण्यासाठी किती किलोग्राम क्षमतेची जागा उपलब्ध आहे.

आणखी वाचा: Money Mantra: झोमॅटो जोरदार

बाजारात नव्याने आलेल्या ‘स्वराज 8200’ या हार्वेस्टिंग मशीनमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला गेलेला आहे. कमीत कमी धान्याची नासाडी व्हावी, दर तासाला अधिकाधिक एकरवर हार्वेस्टिंगचे काम यशस्वीरित्या व्हावे अशाप्रकारे याचे डिझाईन बनवण्यात आले आहे. मशीन मधील कृत्रिम प्रज्ञा ही संज्ञा अजूनही भारतीय शेतीमध्ये नवीन असली तरी छोट्याशा स्वरूपात या हार्वेस्टिंग मशीन मध्ये याचा वापर केला आहे. इंटेलिजंट सिस्टीम मध्ये मशीनच्या मालकाचे नाव, सध्या मशीन नेमक्या कोणत्या ठिकाणी कार्यरत आहे, त्याचे लोकेशन ट्रॅकिंग, मशीन सुरू केल्यापासून दिवसभरात किती एकर जमिनीवर कापणी झाली आहे ? एकूण किती किलोमीटर प्रवास करून मशीन एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेण्यात आले आहे ? त्यासाठी डिझेलचा किती वापर झाला ? ही सर्व माहिती संगणकीय प्रणाली द्वारे उपलब्ध होणार आहे.

बऱ्याचदा अशी यंत्र शेतकऱ्यांकडून भागीदारीमध्ये किंवा वापरासाठी वाटून घेतली जातात यावेळी दिवसभरात यंत्राने किती आणि कसा फायदा झाला आहे हे शेतकऱ्याला समजणे सोपे होईल. डिझेल भरल्यानंतर वापर केल्यावर त्यात किती डिझेल शिल्लक आहे हे सर्वच यंत्रामध्ये कळते. पण एड ब्लू (AdBlue) या तंत्रज्ञानाने डिझेलची पातळी कमी झाल्यावर हार्वेस्टिंग मशीन मध्ये आवाज येऊ लागतो. थोडक्यात वापरणाऱ्याला त्याचा अंदाज मिळतो. इंजिन व्यवस्थित काम करते आहे अथवा नाही व त्यात काही बिघाड असल्यास सर्विसिंग करायचे असल्यास त्याचे अलर्टस मालकाला मिळू शकतात. यासाठी ‘स्मार्ट’ ही टेक्नॉलॉजी ही यंत्रणा मशीन मध्ये बसवण्यात आली आहे.

स्वराज ब्रँड साठी स्वतःच तयार केलेल्या टीआरईएम ४ इंजिनाचा स्वराज ८२०० विल हार्वेस्टर मध्ये वापर केला गेला आहे. हार्वेस्टिंग मशीन शेतकऱ्याचे कष्ट कमी करत असले तरीही ते मशीन वापरणे कौशल्याचे काम आहे. इंजिनाची रचना अशी केली आहे, हार्वेस्टिंग मशीन मधील बसण्याची जागा अशा प्रकारे डिझाईन केली आहे की वापरणाऱ्याला कमीत कमी त्रास होईल. एकदा पिकांच्या काढणीला सुरुवात झाली, कापणीला सुरुवात झाली की हार्वेस्टिंग मशीन सलग वापरावे लागते. त्यावेळी वापर सुलभ व्हावा यासाठी डिझाईन मध्ये भर देण्यात आलेला आहे. मशीन वापरणाऱ्यासाठी स्टिअरिंग व्हील उंचीनुसार टिल्ट करून घेता येते. शेतकऱ्यांना मशीन वापरताना काही अडचण आली तर एक रिलेशनशिप मॅनेजर कंपनीने ठेवला आहे जो शेतकऱ्यांच्या समस्या समजून घेऊन त्याचे ‘रिमोट’ म्हणजेच दूरस्थ पद्धतीने निराकरण करू शकेल. रिलेशनशिप मॅनेजर बरोबरच कंपनीच्या स्मार्टफोन ॲप मधून व्हिडिओ कॉलिंग च्या माध्यमातून मशीन मधील बिघाड किंवा दुरुस्ती यासंबंधी सल्ला दिला जाऊ शकेल. यंत्राचा बाह्य भाग उत्तम दर्जाच्या धातूंपासून बनवण्यात आलेला आहे यंत्रातील शाफ्ट जस्त या धातूच्या मुलांना सकट देण्यात आले आहेत.

‘‘स्वराज ८२०० व्हील हार्वेस्टर हे अत्याधुनिक यंत्र बाजारात आल्यामुळे भारतातील कृषी व्यवसाय अत्याधुनिक करण्याच्या आणि शेतकऱ्यांना नवनवीन तंत्रज्ञान किफायती दरात उपलब्ध करून देण्याचे देण्याच्या स्वप्नांना नवीन पाठबळच मिळाले आहे’’ असे महिंद्रा अँड महिंद्राच्या फार्म इक्विपमेंट सेक्टर चे अध्यक्ष हेमंत सिक्का यांनी स्पष्ट केले.

हे हार्वेस्टिंग मशीन स्वराज मोटर्सच्या स्वतःच्या अत्याधुनिक कारखान्यांमध्ये बनवले जाणार आहे व स्वराज्यच्याच स्वतःच्या डीलरशिप नेटवर्कद्वारे शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिले जाणार आहे. विक्री पश्चात सेवा देण्यासाठी तंत्रज्ञ आणि सल्लागारांची एक वेगळी यंत्रणाच कार्यरत राहणार आहे.

Story img Loader