वित्त विषयात आपण नेहमीच ‘टॅक्स हेवन’ ही संकल्पना बऱ्याचदा ऐकतो. टॅक्स हेवन अर्थात कर स्वर्ग म्हणजे असे देश जिथे कर सगळ्यात कमी किंवा जवळ जवळ नसतोच. म्हणजे तुम्ही आपला पैसा त्या देशांमध्ये ठेवला आणि त्या पैशातून उद्योगधंदा केला तर तुम्हाला इतर कुठल्याही देशापेक्षा कमी कर किंवा शून्य कर द्यावा लागतो. उदाहरणार्थ, तुम्ही एखाद्या कंपनीचे समभाग घेतले आणि काही काळानंतर विकले तर झालेल्या नफ्यावर भारतात कर द्यावा लागतो, पण हेच समभाग तुम्ही ‘टॅक्स हेवन’ देशांतून आपल्या देशात गुंतवणूक म्हणून घेतले तर तुम्हाला ‘टॅक्स हेवन’ देशात कुठलाही कर द्यावा लागत नाही किंवा अतिशय कमी कर द्यावा लागतो. मोठ्या कंपन्या आणि अतिश्रीमंत लोक आपली कमाई कायदेशीररीत्या या देशांमधून सगळीकडे वळवतात. यातील काही देशांमध्ये असे कायदे आहेत की, पैसे ठेवणाऱ्यांची माहिती गुप्त ठेवली जाते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘टॅक्स हेवन’ देशांमध्ये तुम्ही कितीही पैसे ठेवू शकता, जर का ते योग्य मार्गाने कमावले असतील तर. पण इथे येणारे पैसे योग्य मार्गाने फारच कमी वेळा येतात. म्हणजे जसे की, दारूच्या गुत्त्यावर तुम्ही गेलात तर अट्टल दारू पिणारे लोक जास्ती येतात. तिथे तुम्ही जाऊन म्हणालात की, औषध म्हणून मी प्यायला गेलो होतो. तर कोण विश्वास ठेवणार? तसेच ‘टॅक्स हेवन’मधील पैसा ‘मी अधिक गुंतवणुकीसाठी ठेवला’ यावरदेखील कोणीच विश्वास ठेवू शकत नाहीत. म्हणून ‘टॅक्स हेवन’ देश काळा पैसा किंवा अयोग्य मार्गाने मिळवलेला पैसा लपवण्यासाठी छावणी या स्वरूपात वापरले जातात. यामध्ये प्रामुख्याने ब्रिटिश व्हर्जिन आयलँड, केमन द्वीपसमूह, बर्मुडा, स्वित्झर्लंड, लक्झेंबर्ग, हाँगकॉंग, सिंगापूर, मॉरिशस, माल्टा या देशांचा समावेश होतो.

हेही वाचा… Money Mantra: प्रश्न तुमचे उत्तरं तज्ज्ञांची

जगभरातील देश या देशांशी वेगवेगळे करार करून माहिती मिळवण्याच्या प्रयत्न करत असतात. जे देश माहिती देत नाहीत त्या ठिकाणाहून ‘पनामा पेपर्स’ सारख्यांच्या माध्यमातून किंवा शोध पत्रकारितेतून गौप्यस्फोट होत असतात. या देशांमध्ये सुमारे ५.३ लाख कोटी पौंड्स एवढी संपत्ती आहे. जी एकूण जगातील संपत्तीच्या ७ टक्क्यांच्या जवळपास आहे. अमेरिकेतील मोठ्या कंपन्या नियमितपणे आपली कमावलेली संपत्ती या देशांमध्ये पाठवतात. ॲपलसारख्या मोठ्या कंपनीने आयर्लंडसारख्या ‘टॅक्स हेवन’ देशात सुमारे २०० अब्ज डॉलरची गुंतवणूक केली आहे. यातील बरेचसे देश छोटे आणि कमी लोकसंख्येचे असल्यामुळे अशा क्लृप्त्या वापरून जगातील पैशांचे आकर्षण केंद्र बनली आहेत.

असो, आपल्यासारख्या मध्यमवर्गीयांना तांदळाच्या डब्यात लपवलेल्या काही नोटा, बँकेच्या लॉकरमधील काही नोटांची बंडले हे जणू ‘टॅक्स हेवन’ देशांमध्ये लपवलेत असे भासवले जाते तेव्हा याला काय म्हणावे?

ashishpthatte@gmail.com