घर, सोने, इत्यादी संपत्तीच्या खरेदी-विक्री व्यवहारांमध्ये नफा किंवा तोटा होतो. नफा झाल्यास त्याच्या प्रकारानुसार कर भरावा लागतो. उद्योग-व्यवसाय असेल तर “उद्योग-व्यवसायाच्या उत्पन्नाच्या” स्रोतात नफा दाखवून कर भरावा लागतो किंवा ही संपत्ती भांडवली संपत्ती असेल तर त्याच्या विक्रीवर होणाऱ्या भांडवली नफ्यावर कर भरावा लागतो. अशा व्यवहारात करदात्याला तोटा झाल्यास करदात्याने काय करावे आणि त्याचा करदात्याच्या करदायित्वावर काय परिणाम होतो हे जाणून घेतल्यास करदाता त्याचा फायदा घेऊ शकतो. करदात्याला तोटा झाल्यास हा तोटा करदात्याचे सध्याचे किंवा भविष्यातील करदायित्व कमी करू शकतो. त्यासाठी काय अटी आहेत याची माहिती या लेखात घेऊया.

जसे उत्पन्नाचे पाच स्रोत आहेत. पगार/वेतनाचे उत्पन्न, घरभाडे उत्पन्न, उद्योग-व्यवसायाचे उत्पन्न, भांडवली नफा आणि इतर उत्पन्न या पाच स्रोतामध्ये करदात्याला त्याचे उत्पन्न विभागावे लागते. करदात्याला ज्या व्यवहारात तोटा होतो तो त्याच स्रोतामध्ये दाखवावा लागतो. हा तोटा घरभाडे उत्पन्न, उद्योग-व्यवसायाचे उत्पन्न, भांडवली नफा या स्त्रोताच्या उत्पन्नात होऊ शकतो. असा तोटा झाल्यास करदात्याला तो दुसऱ्या उत्पन्नातून वजा करता येतो का? असल्यास त्यासाठी काय नियम आहेत? हा तोटा इतर उत्पन्नातून वजा करण्यासाठी एक ठराविक क्रम आहे आणि त्या क्रमानुसार तो उत्पन्नातून वजा करता येतो किंवा पुढील वर्षांसाठी कॅरी-फॉरवर्ड करता येतो. यासाठी खालील नियम आहेत.

Market Technique Stock Market
बाजाराचा तंत्र-कल : शेअर बाजाराला बाळसं की सूज?
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
oil india limited portfolio
माझा पोर्टफोलियो : पोर्टफोलिओला महारत्नाची जोड
Mission on Oilseeds in Crisis due to gm soybeans
जीएम सोयाबीन विना तेलबिया मिशन संकटात
maha vikas aghadi releases manifesto for maharashtra assembly poll 2024
महिला, शेतकऱ्यांवर आश्वासनांची खैरात; मविआचा ‘महाराष्ट्रनामा’ जाहीर
Kharge slams Modi for ignoring dalit leaders in cabinet
मतांसाठीच दलित, आदिवासी हिताची भाषा ; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचा आरोप
crores of rupees seized from car in khed shivapur toll naka area
अन्वयार्थ : हजार कोटी सापडले, त्याचे पुढे काय झाले?
narendra modi yogi adityanath campaign in maharashtra
लालकिल्ला : मोदी-योगींच्या प्रचाराने काय साधणार?

हेही वाचा…‘सरफेसी’ कायदा आणि गैरवापर (भाग २)

त्याच उत्पन्नाच्या स्त्रोतातून प्रथम वजावट

करदात्याला ज्या उत्पन्नाच्या स्रोतामध्ये तोटा झाला असेल तर तो प्रथम त्याच उत्पन्नाच्या स्रोतामध्ये झालेल्या नफ्यामधून वजा करता येतो. उदा. करदात्याला एका उद्योग व्यवसायाच्या उत्पन्नात तोटा झाल्यास तो तोटा दुसऱ्या उद्योग-व्यवसायाच्या उत्पन्नातून प्रथम वजा करावा लागतो. याला काही अपवाद आहेत :

सट्टा व्यवहारातील (ज्या व्यवहारात मालाचा ताबा घेतला जात नाही) तोटा हा इतर उद्योग-व्यवसायातील उत्पन्नातून वजा करता येत नाही, तो फक्त सट्टा व्यवहारातील नफ्यामधूनच वजा करता येतो. सट्टा व्यवहारातील उत्पन्न आणि उद्योग-व्यवसायाचे उत्पन्न हे एकाच उत्पन्नाच्या स्त्रोतात, म्हणजे “उद्योग-व्यवसायाच्या उत्पन्नाच्या”, असले तरी सट्टा व्यवहारातील तोटा हा इतर उद्योग-व्यवसायातील उत्पन्नातून वजा करता येत नाही.

घोड्याच्या व्यवसायातील तोटा हा फक्त घोड्याच्या व्यवसायातील उत्पन्नातूनच वजा करता येतो, लॉटरी, शब्दकोडे, पत्तेखेळ, किंवा जुगार, बेटिंग मधील तोटा इतर कोणत्याही उत्पन्नातून वजा करता येत नाही, दीर्घमुदतीचा भांडवली तोटा हा फक्त दीर्घमुदतीच्या भांडवली नफ्यातूनच वजा करता येतो, अल्पमुदतीच्या भांडवली नफ्यातून वजा करता येत नाही. अल्पमुदतीचा भांडवली तोटा मात्र दीर्घमुदतीच्या भांडवली नफ्यातून किंवा अल्पमुदतीच्या भांडवली नफ्यातून वजा करता येतो. जे उत्पन्न करमुक्त आहे अशा उत्पन्नाच्या बाबतीत तोटा झाल्यास तो तोटा इतर उत्पन्नातून वजा करता येत नाही.

हेही वाचा…ई-मेल घोटाळा

इतर स्त्रोतातील उत्पन्नातून वजावट

एका उत्पन्नाच्या स्रोतमध्ये झालेला तोटा त्याच स्रोतामधून वजा होत नसेल तर तो इतर स्त्रोतामधील उत्पन्नामधून वजा करता येतो. याला अपवाद खालीलप्रमाणे :

भांडवली तोटा हा इतर स्रोताच्या उत्पन्नातून वजा करता येत नाही, उद्योग-व्यवसायातील तोटा पगाराच्या उत्पन्नातून वजा करता येत नाही, ‘घराच्या उत्पन्नातील’ तोटा इतर उत्पन्नातून वजा करता येतो, परंतु फक्त २ लाख रुपयांपर्यंतचाच तोटा इतर उत्पन्नातून वजा करता येतो. करदात्याने नवीन करप्रणाली स्वीकारल्यास हा २ लाख रुपयांचा तोटा इतर उत्पन्नातून वजा करता येत नाही.

कोणत्याही उत्पन्नाच्या स्रोतामधील तोटा हा लॉटरी, शब्दकोडे, पत्तेखेळ, किंवा जुगार, बेटिंग मधील उत्पन्नातून वजा करता येत नाही,
कोणत्याही उत्पन्नाच्या स्रोतामधील तोटा हा घोड्याच्या व्यवसायातील उत्पन्नातून वजा करता येत नाही, करदात्याने नवीन करप्रणालीचा विकल्प (कोणतीही वजावट न घेता सवलतीच्या दरात कर भरण्याचा) निवडल्यास ‘घरभाडे उत्पन्न’ या सदरातील तोटा इतर उत्पन्नातून वजा करता येत नाही. आभासी चलनाच्या व्यवहारात झालेला तोटा हा इतर उत्पन्नातून वजा करता येत नाही.

हेही वाचा…म्युच्युअल फंडांद्वारेच चक्रवाढ लाभाची किमया शक्य

पुढील वर्षासाठी कॅरी फॉरवर्ड

एका उत्पन्नाच्या स्रोतामध्ये झालेला तोटा त्याच स्रोतामधून वजा होत नसेल आणि तो इतर स्रोतामधील उत्पन्नामधून सुद्धा वजा होत नसेल तर तो पुढील वर्षासाठी कॅरी फॉरवर्ड करता येतो. हा पुढील वर्षासाठी कॅरी फॉरवर्ड केलेला तोटा पुढील वर्षातील उत्पन्नातून वजा करता येतो. यासाठी सुद्धा काही नियम आहेत. ज्या वर्षीचा तोटा पुढील वर्षांसाठी कॅरी फॉरवर्ड करावयाचा आहे त्या वर्षीचे विवरणपत्र मुदतीत दाखल करणे बंधनकारक आहे. याला अपवाद घरभाडे उत्पन्न या स्रोतातील तोटा हा आहे. विवरणपत्र मुदतीत दाखल केले नसले तरी या स्रोतातील तोटा पुढील वर्षात कॅरी-फॉरवर्ड करता येतो. मागील वर्षांचे (ज्या वर्षी तोटा आहे) विवरणपत्र मुदतीत दाखल केले असले आणि या वर्षीचे विवरणपत्र मुदतीनंतर दाखल केले तर फक्त या वर्षीचा तोटा कॅरी-फॉरवर्ड करता येणार नाही, मागील वर्षांचा तोटा कॅरी-फॉरवर्ड करता येईल. विवरणपत्र मुदतीत दाखल केले नसल्यास हा तोटा पुढील वर्षात कॅरी-फॉरवर्ड करता येत नाही. परंतु त्याच वर्षीचा तोटा त्याच वर्षीच्या नफ्यातून, विवरणपत्र मुदतीनंतर दाखल केले असले तर, वजा करता येतो.

किती वर्षांसाठी आणि कसा वजा करता येतो :

‘घर भाडे उत्पन्न’, ‘उद्योग-व्यवसायातील उत्पन्न’, ‘भांडवली नफा’ या स्रोतातील तोटा त्याच स्रोतातील उत्पन्नातून किंवा इतर उत्पन्नातून वजा न झाल्यास पुढील ८ वर्षांसाठी कॅरी फॉरवर्ड करता येतो. पुढील वर्षांमध्ये हा तोटा फक्त त्याच स्रोताच्या उत्पन्नातूनच वजा करता येतो. परंतु, दीर्घमुदतीचा भांडवली तोटा हा पुढील वर्षी फक्त दीर्घमुदतीच्या भांडवली नफ्यातूनच वजा करता येतो. अल्पमुदतीचा भांडवली तोटा हा पुढील वर्षी दीर्घ आणि अल्पमुदतीच्या भांडवली नफ्यातून वजा करता येतो. करदात्याचा तोटा वर नमूद केल्याप्रमाणे ८ किंवा ४ वर्षात नफ्यातून वजा होत नसेल तर तोट्याचा हक्क लोप पावेल.

हेही वाचा…लोहपोलाद क्षेत्र: चढउतार, व्यवसाय संधी आणि गुंतवणूक

‘सट्टा व्यवसायातील तोटा’ हा त्याच वर्षीच्या सट्टा व्यवसायाच्या नफ्यातून वजा न झाल्यास पुढील ४ वर्षांसाठी तो कॅरी फॉरवर्ड करता येतो. परंतु पुढील वर्षांमध्ये सुद्धा हा तोटा फक्त सट्टा व्यवसायाच्या उत्पन्नातूनच वजा करता येतो. करदात्याला तोटा पुढील वर्षी कॅरी-फॉरवर्ड करतांना काळजी घेणे गरजेचे आहे. करदात्याने त्याला झालेल्या तोट्याची योग्य नोंद ठेवणे गरजेचे आहे. विवरणपत्रात मागील वर्षातील तोटा कॅरी फॉरवर्ड न केल्यास किंवा इतर उत्पन्नातून वजा न केल्यास तोट्याचा फायदा करदाता घेऊ शकणार नाही आणि त्याला जास्त कर भरावा लागू शकतो.