सरलेल्या महिन्यात २३ जुलैला सादर झालेल्या अर्थसंकल्पात भांडवली नफ्यावरील कराच्या तरतुदीत अनेक बदल करण्यात आले, ते आपण मागील लेखात बघितले. याचबरोबर कंपन्यांनी केलेल्या समभागाच्या पुनर्खरेदीवर (बायबॅक) आकारल्या जाणाऱ्या कराच्या तरतुदीत १ ऑक्टोबर, २०२४ पासून देखील मोठा बदल करण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले.

समभागाच्या पुनर्खरेदीवर आणि लाभांशावर आकारल्या जाणाऱ्या कराची विसंगती :

वर्ष २०१३ नंतर कंपनीने समभाग पुनर्खरेदी केल्यास कंपनीला कलम ‘११५ क्यूए’नुसार अतिरिक्त कर भरावा लागत होता आणि गुंतवणूकदाराला मिळालेल्या रक्कमेवर मात्र कर भरावा लागत नव्हता. ही तरतूद फक्त शेअर बाजारात सूचिबद्ध नसलेल्या कंपन्यांसाठी लागू होती. त्यामुळे शेअर बाजारात सूचिबद्ध असलेल्या कंपन्याच्या पुनर्खरेदीद्वारे मिळालेली रक्कम गुंतवणूकदारांसाठी करपात्र होती. ५ जुलै, २०१९ नंतर जाहीर झालेल्या शेअरबाजारातील सूचिबद्ध कंपन्यांच्या पुनर्खरेदी योजनांसाठी ही तरतूद लागू करण्यात आली. यामुळे शेअर बाजारात सूचिबद्ध कंपन्यांनी पुनर्खरेदी केलेल्या समभागावर झालेल्या भांडवली नफ्यावर गुंतवणूकदारांना कर भरावा लागत नव्हता. शेअर पुनर्खरेदीमध्ये गुंतवणूकदाराला जरी कर भरावा लागत नव्हता तरी कंपन्यांना मात्र या व्यवहारावर २० टक्के इतका कर भरावा लागत होता.

Indian rupee latest marathi news
रुपयाची प्रतिडॉलर ८५ च्या दिशेने वाटचाल
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
government banks earned net profit
सरकारी बँकांना सहामाहीत ८६ हजार कोटींचा निव्वळ नफा
public sector banks npa marathi news
सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे ‘एनपीए’ ३.१६ लाख कोटींवर
jan dhan account marathi news
अकरा कोटी निष्क्रिय जनधन खात्यांमध्ये १४,७५० कोटी पडून
sunk deposits loksatta news
विश्लेषण : बुडालेल्या ठेवी परत मिळू शकतात? शासनाचे नवे परिपत्रक काय?
pimpri chinchwad property tax marathi news
पिंपरी-चिंचवडमध्ये अडीच लाख मालमत्ताधारकांनी बुडविला कर
RBI
अग्रलेख: दोन पुढे, चार मागे!

हेही वाचा : बहुउद्देशीय व्यवसाय संधीच्या दिशेने…

गुंतवणूकदारांना मिळणाऱ्या लाभांशावरील करआकारणी पूर्वी अशीच होती. कंपनीला लाभांश जाहीर केल्यानंतर ‘लाभांश वितरण कर’ (डीडीटी) भरावा लागत होता आणि या लाभांशावर गुंतवणूदाराला कर भरावा लागत नव्हता. वर्ष २०२० मध्ये ही कर आकारणीची पद्धत बदलण्यात आली. या नवीन पद्धतीमध्ये कंपनीला ‘लाभांश वितरण कर’ भरावा लागत नाही आणि मिळालेल्या लाभांशावर गुंतवणूकदाराला कर भरावा लागतो.

समभागाची पुनर्खरेदी आणि लाभांश या कंपनीकडे असलेल्या संचित साठ्यातून भागधारकांना वितरण करण्याच्या दोन पद्धती आहेत. परंतु सध्या त्याची करआकारणी वर सांगितल्याप्रमाणे वेगवेगळ्या पद्धतीने केली जाते. ही विसंगती दूर करून त्यात सुसूत्रता आणण्यासाठी लाभांशावर जशी कर आकारणी केली जाते तशीच समभागाच्या पुनर्खरेदीसाठी सुद्धा करण्यात आली आहे.

अर्थसंकल्पातील तरतूद :

आर्थिक वर्ष २०२४-२५ च्या अर्थसंकल्पात समभागाच्या पुनर्खरेदीवरील कर आकारणीत बदल केला आहे. कंपन्यांकडून समभागाच्या पुनर्खरेदीवर मिळालेली संपूर्ण रक्कम ही लाभांश म्हणून समजण्यात येईल. या रकमेतून समभाग खरेदी किंवा इतर खर्चाची वजावट मिळणार नाही. या लाभांशावर करदात्याला त्याच्या उत्पन्नाच्या टप्प्याप्रमाणे कर भरावा लागेल. कंपनीने समभागाची पुनर्खरेदी केल्यानंतर त्या समभागावरील हक्क संपल्यामुळे, करदात्याला भांडवली तोटा होतो. हा भांडवली तोटा गणतांना या समभागाची विक्री किंमत ही शून्य समजावी आणि प्रत्यक्ष खरेदी मूल्य विचारात घ्यावे. हा भांडवली तोटा समभागाच्या धारणकाळानुसार अल्प किंवा दीर्घमुदतीचा ठरविला जाईल. हा भांडवली तोटा इतर भांडवली तोट्यातून वजा करता येईल. अल्पमुदतीचा भांडवली तोटा हा अल्प आणि दीर्घमुदतीच्या भांडवली नफ्यातून तर दीर्घमुदतीचा भांडवली तोटा हा दीर्घमुदतीच्या भांडवली नफ्यातून वजा करता येईल. तो या वर्षी वजा होत नसेल तर पुढील वर्षांसाठी ‘कॅरी-फॉरवर्ड’ करता येईल. यासाठी विवरणपत्र मुदतीत दाखल करणे बंधनकारक आहे.

हेही वाचा : स्वत:च्याच सुगंधाची स्वत:लाच भूल…

नवीन तरतुदीनुसार करदात्याचे करदायित्व कसे गणले जाईल?

उदाहरणादाखल समभागाच्या पुनर्खरेदीवर करदात्याला खालील प्रमाणे उत्पन्न किंवा तोटा दाखवून कर भरावा लागेल. करदात्याने २०२१ मध्ये एका कंपनीचे ५०० समभाग प्रत्येकी १,००० रुपयांना असे एकूण ५,००,००० रुपयांना खरेदी केले होते. कंपनीने ऑक्टोबर, २०२४ मध्ये २०० समभाग प्रत्येकी ३,००० रुपयांना असे एकूण ६,००,००० रुपयांना पुनर्खरेदी केले. करदात्याला मिळालेले ६,००,००० रुपये लाभांश म्हणून इतर उत्पन्न या उत्पन्नाच्या स्त्रोतात करपात्र असतील. या लाभांशावर करदात्याला त्याच्या उत्पन्नाच्या टप्प्याप्रमाणे कर भरावा लागेल. जर करदाता ३० टक्के कराच्या टप्प्याप्रमाणे कर भरत असेल तर त्याला १,८०,००० रुपये (अधिक ४ टक्के आरोग्य आणि शैक्षणिक कर) कर भरावा लागेल. कंपनीने पुनर्खरेदी केलेले २०० समभाग हे त्याने प्रत्येकी १,००० रुपयांना असे एकूण २,००,००० रुपयांना खरेदी केले होते. भांडवली तोटा गणतांना याची विक्री किंमत शून्य समजून आणि खरेदी मूल्य २,००,००० रुपये विचारात घेऊन २,००,००० रुपयांचा दीर्घमुदतीचा भांडवली तोटा करदाता घेऊ शकतो. हा तोटा करदाता इतर व्यवहारातून झालेल्या दीर्घमुदतीच्या भांडवली नफ्यातून वजा करून करदायित्व कमी करू शकतो. करदात्याला या वर्षी इतर व्यवहारातून दीर्घमुदतीचा भांडवली नफा झाला नसल्यास तो पुढील वर्षासाठी ‘कॅरी-फॉरवर्ड’ करू शकतो आणि पुढील वर्षीच्या दीर्घमुदतीच्या भांडवली नफ्यातून वजा करू शकतो. या उदाहरणात करदात्याने बाकी ३०० समभाग मार्च, २०२५ मध्ये शेअरबाजारात प्रत्येकी ४,००० रुपयांना असे एकूण १२,००,००० रुपयांना विकले तर त्याला ९,००,००० रुपयांचा दीर्घमुदतीचा भांडवली नफा होईल (३०० समभाग x प्रत्येकी ४,००० रुपये विक्री किंमत अशी १२,००,००० रुपये वजा खरेदी मूल्य ३०० x प्रत्येकी १,००० रुपये असे ३,००,००० रुपये). या ९,००,००० रुपयांच्या दीर्घमुदतीच्या भांडवली नफ्यातून समभागाच्या पुनर्खरेदीवरील २०० समभागांच्या २,००,००० रुपयांचा भांडवली तोटा वजा होऊन करदात्याला ७,००,००० रुपयांवर कर भरावा लागेल. या दीर्घमुदतीच्या भांडवली नफ्यावर करदात्याला प्रथम १,२५,००० रुपयांवर कर भरावा लागणार नाही आणि बाकी ५,७५,००० रुपयांवर १२.५ टक्के म्हणजेच ७१,८७५ रुपये (अधिक ४ टक्के आरोग्य आणि शैक्षणिक कर) कर भरावा लागेल. लाभांश आणि भांडवली नफ्यावर मिळून त्याला एकूण २,५१,८७५ रुपये कर (अधिक ४ टक्के आरोग्य आणि शैक्षणिक कर) भरावा लागेल.

ही तरतूद बदलली नसती तर किती कर भरावा लागला असता :

ही समभाग पुनर्खरेदीवरील कराची तरतूद बदलली नसती तर वरील उदाहरणात करदात्याला समभागाच्या पुनर्खरेदीवर मिळालेले ६,००,००० रुपये करपात्र नसते. (यावर कंपनीला कलम ‘११५ क्यूए’नुसार कर भरावा लागला असता). उर्वरित ३०० समभागाच्या विक्रीवर झालेल्या ९,००,००० रुपयांच्या दीर्घमुदतीच्या भांडवली नफ्यावर कर भरावा लागला असता. या दीर्घमुदतीच्या भांडवली नफ्यावर करदात्याला प्रथम १,२५,००० रुपयांवर कर भरावा लागला नसता आणि बाकी ७,७५,००० रुपयांवर १२.५ टक्के म्हणजेच ९६,८७५ रुपये (अधिक ४ टक्के आरोग्य आणि शैक्षणिक कर) कर भरावा लागला असता. या नवीन तरतुदीनुसार करदात्याला अतिरिक्त असा १,५५,००० असा एकूण २,५१,८७५ रुपये कर भरावा लागेल.

हेही वाचा : Money Mantra: इ-इन्शुरन्स अकाऊंटचे काय फायदे आहेत?

करदात्याने पुनर्खरेदीचा पर्याय निवडला नसल्यास किती कर भरावा लागला असता :

करदात्याने समभागाच्या पुनर्खरेदीचा पर्याय निवडला नसता आणि सर्व ५०० समभाग ४,००० रुपयांच्या दराने मार्च, २०२५ मध्ये शेअर बाजारामार्फत विकले असते तर करदात्याला १५,००,००० रुपयांचा (५०० समभाग x प्रत्येकी ४,००० रुपये विक्री किंमत अशी २०,००,००० रुपये वजा खरेदी मूल्य ५०० x प्रत्येकी १,००० रुपये असे ५,००,००० रुपये) दीर्घमुदतीचा भांडवली नफा झाला आता आणि त्यावर त्याला प्रथम १,२५,००० रुपयांवर कर भरावा लागला नसता आणि बाकी १३,७५,००० रुपयांवर १२.५ टक्के म्हणजेच १,७१,८७५ रुपये (अधिक ४ टक्के आरोग्य आणि शैक्षणिक कर) कर भरावा लागला असता.

ही तरतूद १ ऑक्टोबर, २०२४ पासून लागू होणार आहे. बऱ्याच कंपन्यांनी समभाग पुनर्खरेदी प्रक्रिया सुरू केली आहे. करदाते समभाग पुनर्खरेदीच्या नवीन तरतुदी लागू होण्यापूर्वी (१ ऑक्टोबर २०२४ पूर्वी) यावरील पुनर्खरेदीचा पर्याय निवडून करमुक्त उत्पन्नाचा लाभ घेऊ शकतात.

pravindeshpande1966@gmail.com

Story img Loader