करदात्याला विवरणपत्र मुदतीत दाखल करता यावे यासाठी प्राप्तिकर विभागाने विवरणपत्राचे फॉर्म १, २ आणि ४ या वर्षी एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच उपलब्ध करून दिले आहेत. करदाता आपले विवरणपत्र ऑनलाइन दाखल करू शकतो. असे असले तरी करदात्याचा २०२३-२४ या आर्थिक वर्षाच्या शेवटच्या तिमाहीत कापलेला उद्गम कर (टीडीएस) किंवा गोळा केलेला कर (टीसीएस) फॉर्म २६ एएस किंवा वार्षिक माहिती अहवालामध्ये (एआयएस) अजून दिसत नाही. तसेच जे करदाते नोकरी करतात त्यांना मालकाकडून फॉर्म १६ अजून मिळालेले नाहीत. उद्गम कर कापणाऱ्याला फॉर्म १६ किंवा फॉर्म १६ ए देण्याची मुदत १५ जून, २०२४ पर्यंत आहे. करदात्याने विवरणपत्र दाखल करण्यापूर्वी फॉर्म २६ एएस आणि वार्षिक माहिती अहवालामधील माहिती तपासली पाहिजे, जेणेकरून सगळे व्यवहार, उत्पन्न, उद्गम कर आणि भरलेला कर विवरणपत्रात अचूक दाखविला जाईल. त्यामुळे विवरणपत्राचे फॉर्म उपलब्ध झाले असले तरी करदात्याने ही माहिती मिळाल्याशिवाय विवरणपत्र दाखल करण्याची घाई करू नये.

प्रश्न : मी एक वकील आहे. २०२३-२४ या आर्थिक वर्षात माझी व्यावसायिक जमा ६० लाख रुपये आहे. मला अनुमानित कराच्या तरतुदी लागू होतील का? आणि नसल्यास मला लेखा परीक्षणाच्या तरतुदी लागू होतील का?

Flipkart Cancellation Fee Rule Charges
Flipkart Cancellation Fee : ऑनलाइन ऑर्डर रद्द करताच पैसे द्यावे लागणार? फ्लिपकार्टचा ‘हा’ नियम जुना, वाचा कंपनी काय म्हणते
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Free Aadhaar update details in marathi
Free Aadhaar update: उरला फक्त शेवटचा १ दिवस, आधारकार्डशी संबंधित ‘हे’ काम पटापट करा, अन्यथा…;
Property tax defaulters properties seized in Titwala
टिटवाळा येथे कर थकबाकीदारांच्या दोन कोटीच्या मालमत्तांना टाळे, पालिकेच्या अ प्रभागाची कारवाई
Onion prices fall due to increased production
नाशिक : आवक वाढल्याने कांद्याची घसरण
pimpri chinchwad property tax marathi news
पिंपरी-चिंचवडमध्ये अडीच लाख मालमत्ताधारकांनी बुडविला कर
Dombivli tax arrears people, Dombivli property seal,
डोंबिवलीत मालमत्ता कर थकबाकीदारांच्या गाळ्यांना टाळे
Both exams held statewide school registration and student applications were open from October 17 to December 7
विद्यार्थ्यांनो अंतिम मुदतवाढ, अन्यथा,,
  • संदीप काळे
    उत्तर : ज्या करदात्यांचे व्यवसायाचे उत्पन्न ५० लाख रुपयांपेक्षा जास्त आहे, त्यांना लेख्याचे परीक्षण करून घेणे आणि त्याचा अहवाल मुदतीत सादर करणे बंधनकारक आहे. अनुमानित कराच्या तरतुदी, कलम ४४ एडीएनुसार, जे ठरावीक व्यावसायिक आहेत (ज्यात वकील, सनदी लेखापाल (सीए), वास्तुविशारद, अभियंता, चित्रपट कलाकार, वगैरे) त्यांना लागू होतात. अशा ठरावीक व्यावसायिकांची एका आर्थिक वर्षात मिळालेली एकूण जमा ५० लाख रुपयांपेक्षा कमी आहे आणि त्यांनी एकूण जमेच्या ५० टक्के किंवा त्यापेक्षा जास्त नफा दाखविला असेल तर त्यांना लेखा परीक्षणाच्या तरतुदी लागू होत नाहीत. परंतु मागील वर्षापासून याची व्याप्ती वाढविली आहे. ही ५० लाख रुपयांची मर्यादा वाढवून ७५ लाख रुपये इतकी केली आहे. परंतु ही वाढ सरसकट न करता त्यासाठी एक अट आहे. ज्या व्यावसायिकांची रोखीने मिळालेली जमा एकूण जमेच्या ५ टक्क्यांपेक्षा कमी असेल तर त्यांच्यासाठी ही ५० लाख रुपयांची मर्यादा ७५ लाख रुपये इतकी असेल. त्यामुळे आपल्याला रोखीने मिळालेली जमा ही एकूण जमेच्या ५ टक्क्यांपेक्षा कमी असेल तर आपल्याला ४४ एडीए या कलमानुसार अनुमानित कराच्या तरतुदी लागू होतील आणि आपल्याला लेखापरीक्षण बंधनकारक असणार नाही. रोखीने मिळालेली जमा एकूण जमेच्या ५ टक्क्यांपेक्षा जास्त असेल तर आपल्याला ७५ लाख रुपयांची वाढीव मर्यादा लागू होणार नाही आणि एकूण जमा ५० लाख रुपयांपेक्षा जास्त असल्यामुळे आपल्याला लेखापरीक्षण करून घ्यावे लागेल.

प्रश्न : माझ्याकडे दोन घरे आहेत. मी एक घर विकून ते पैसे नवीन व्यावसायिक जागा खरेदीसाठी वापरल्यास मला घराच्या विक्रीवर झालेल्या भांडवली नफ्यातून वजावट घेता येईल का?

  • प्रकाश सावंत

उत्तर : एक घर विकून झालेला दीर्घमुदतीचा भांडवली नफा दुसऱ्या नवीन घरात गुंतविल्यास कलम ५४ नुसार वजावट घेता येते. या कलमानुसार नवीन घर ठरावीक मुदतीत खरेदी केल्यास किंवा बांधल्यास करदाता वजावट घेऊ शकतो. व्यावसायिक जागेत केलेल्या गुंतवणुकीवर या कलमानुसार वजावट घेता येत नाही.

हेही वाचा – Money Mantra: अ‍ॅपवरून झटपट कर्ज घेताना, काय काळजी घ्याल?

प्रश्न : मी चार वर्षांपूर्वी एका खासगी कंपनीचे समभाग विकले होते, त्यावर मला ८ लाख रुपयांचा दीर्घ मुदतीचा भांडवली तोटा झाला होता. त्या वर्षीच्या विवरणपत्रात हा तोटा दाखवून कॅरी-फॉरवर्ड केला होता. २०२३-२४ या आर्थिक वर्षात मला घराच्या विक्रीतून ११ लाख रुपयांचा अल्पमुदतीचा भांडवली नफा झाला. मी या वर्षीच्या नफ्यातून कॅरी-फॉरवर्ड केलेला तोटा वजा करू शकतो का?

  • शेखर मांडवकर
    उत्तर : दीर्घ मुदतीचा भांडवली तोटा हा पुढील ८ वर्षांपर्यंत कॅरी फॉरवर्ड करता येतो. यासाठी त्या वर्षीचे विवरणपत्र मुदतीत दाखल करणे बंधनकारक आहे. पुढील वर्षांमध्ये दीर्घ मुदतीच्या नफ्यातूनच मागील वर्षीचा दीर्घ मुदतीचा तोटा वजा करता येतो. त्यामुळे आपल्याला या वर्षी झालेल्या अल्प मुदतीच्या भांडवली नफ्यातून मागील वर्षीचा दीर्घ मुदतीचा तोटा वजा करता येणार नाही. तो फक्त दीर्घ मुदतीच्या भांडवली नफ्यातूनच वजा करता येईल.

प्रश्न : मी ज्येष्ठ नागरिक असून माझे वय ६२ वर्षे आहे. मागील वर्षी मला व्याजाचे २ लाख रुपये उत्पन्न मिळाले. त्यामुळे मी विवरणपत्र दाखल केले नाही. मी २०२३-२४ या आर्थिक वर्षात माझे जुने घर विकले, मला १२ लाख रुपयांचा दीर्घ मुदतीचा भांडवली नफा झाला. याच वर्षात कलम ५४ ईसीनुसार रोख्यांमध्ये पैसे गुंतविले. त्यामुळे मला यावर कर भरावा लागत नाही. तर मला विवरणपत्र भरावे लागेल का?

  • एक वाचक
    उत्तर : स्थावर मालमत्ता विकून कलम ५४ ईसीनुसार रोख्यांमध्ये मुदतीत गुंतवणूक केल्यास करदाता दीर्घ मुदतीच्या भांडवली नफ्यातून वजावट घेऊ शकतो आणि कर वाचवू शकतो. आपण दीर्घ मुदतीच्या भांडवली नफ्याएवढी गुंतवणूक या कलमानुसार स्थावर मालमत्तेच्या विक्रीनंतर ६ महिन्यांच्या आत ठरावीक रोख्यांमध्ये केल्यास कर भरावा लागणार नाही. प्राप्तिकर कलम १३९ नुसार कलम ५४ ईसीनुसार वजावट घेण्यापूर्वी उत्पन्न कमाल करमुक्त मर्यादेपेक्षा जास्त असेल तर विवरणपत्र भरणे बंधनकारक आहे. आपले उत्पन्न, वजावटीपूर्वी, एकूण १४ लाख रुपये (२ लाख व्याज आणि १२ लाख रुपयांचा भांडवली नफा) इतके आहे. त्यामुळे आपल्याला विवरणपत्र भरणे बंधनकारक आहे, मात्र कर भरावा लागणार नाही.

हेही वाचा – Money Mantra: म्युच्युअल फंडाच्या युनिट्स विक्रीपश्चात होणारा भांडवली नफा व करदायीत्व

प्रश्न: मी एक घर खरेदी करणार आहे. या खरेदीवर उद्गम कर कापण्यासाठी मला टॅक्स डिडक्शन क्रमांक (टॅन) घ्यावा लागेल का?

उत्तर : आपण निवासी भारतीयाकडून घर खरेदी करणार असाल तर आपल्याला टॅक्स डिडक्शन क्रमांक (टॅन) घेणे गरजेचे नाही. खरेदी करणाऱ्याचा आणि विक्री करणाऱ्याचा पॅन क्रमांक भरून हा कर भरता येतो. आपण अनिवासी भारतीयाकडून घर खरेदी करणार असाल तर मात्र आपल्याला टॅक्स डिडक्शन क्रमांक (टॅन) घेणे गरजेचे आहे.

  • प्रवीण देशपांडे

pravindeshpande1966@gmail.com

Story img Loader