एखादी कंपनी तिच्या कामगिरी, कर्तृत्वाद्वारे त्या त्या क्षेत्रात मापदंड निर्माण करत असते. अशा प्रथितयश कंपन्यांचा शब्द (व्यवस्थापनाचा भविष्यवेध) हा त्या क्षेत्रासाठी भविष्यकाळासंबंधी दिशादर्शन ठरत असतो. अशा कंपन्यांना ‘तावून सुलाखून’ आपलं श्रेष्ठत्व पुन्हा सिद्ध करण्याची संधी म्हणजे कंपन्यांचे ‘तिमाही आर्थिक निकाल’ होय. ज्या कंपन्यांचे तिमाही आर्थिक निकाल उत्कृष्ट असतील ते समभाग बातमीत झळकणार. तिमाही निकालांच्या पूर्वसंध्येला अशा प्रथितयश कंपन्यांचा – त्यांच्या समभागांचा ‘बाजार तंत्रकला’च्या अंगाने घेतलेला आढावा.
१) ॲक्सिस बँक:
१० जानेवारीचा बंद भाव- १,०४०.७० रु.
तिमाही वित्तीय निकाल: गुरुवार, १६ जानेवारी
महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर: १,१०० रु.
उत्कृष्ट निकाल: या शक्यतेत समभागाकडून १,१०० रुपयांचा स्तर राखला जाईल. त्याचे प्रथम वरचे लक्ष्य १,१२० रुपये, द्वितीय लक्ष्य १.१६० रुपये.
निराशादायक निकाल: १,१०० रुपयांचा केंद्रबिंदू स्तर तोडत ९८० रुपयांपर्यंत घसरण शक्य.
हेही वाचा – कर्मचाऱ्यांच्या भल्यासाठी ‘ईसॉप’ की ‘आरएसयू’ चांगले?
u
२) इन्फोसिस लिमिटेड: १० जानेवारीचा बंद भाव- १,९६६.९५ रु.
तिमाही वित्तीय निकाल : गुरुवार, १६ जानेवारी
महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर: १,९०० रु.
उत्कृष्ट निकाल: या शक्यतेत समभागाकडून १,९०० रुपयांचा स्तर राखला जाईल. त्याचे प्रथम वरचे लक्ष्य २,००० रुपये, द्वितीय लक्ष्य २,०८० रुपये.
निराशादायक निकाल: १,९०० रुपयांचा केंद्रबिंदू स्तर तोडत १,८५० रुपयांपर्यंत घसरण शक्य.
३) विप्रो लिमिटेड: १० जानेवारीचा बंद भाव- ३००.५५ रु.
तिमाही वित्तीय निकाल: शुक्रवार, १७ जानेवारी
महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर: २९०रु.
उत्कृष्ट निकाल: या शक्यतेत समभागाकडून २९० रुपयांचा स्तर राखला जाईल. त्याचे प्रथम वरचे लक्ष्य ३२० रुपये, द्वितीय लक्ष्य ३३० रुपये.
निराशादायक निकाल: २९० रुपयांचा केंद्रबिंदू स्तर तोडत २७५ रुपयांपर्यंत घसरण शक्य.
सरतेशेवटी निफ्टी निर्देशांक आणि बँक निफ्टीचा आढावा
हेही वाचा – Money Mantra : टोरेससारखी फसवणूक टाळायची असेल तर हा लेख तुमच्यासाठीच
१० जानेवारीचा बंद भाव: निफ्टी- २३,४३१.५० / बँक निफ्टी- ४८,७३४.१५
महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर: निफ्टी- २३,७०० / बँक निफ्टी- ४९,९००
उत्साहवर्धक बातमीचा परिणाम: २३,७०० / ४९,९०० चे महत्त्वाचे केंद्रबिंदू स्तर गाठले जातील. या निर्देशांकाचे प्रथम वरचे लक्ष्य २४,०००/ ५०,५०० आणि द्वितीय लक्ष्य २४,३००/ ५०,९५० शक्य
बातमीचा उदासीन परिणाम: निर्देशांकांकडून २३,७०० / ४९,९०० चे महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर तोडले जाऊन, त्यात २३,१५० ते २२८०० / ४७,९०० स्तरापर्यंत घसरण शक्य.
– आशीष ठाकूर
लेखक भांडवली बाजार विश्लेषक आहेत.
ashishthakur1966@gmail.com
अस्वीकृती: शेअर बाजारातील व्यवहार हे जोखमीच्या अधीन आहेत. अंदाज चुकल्यास मुद्दल गमावण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी ‘स्टॉप लॉस’ आणि ‘इच्छित लक्ष्य’ या संकल्पनांचे पालन आवश्यक आहे. गुंतवणुकीपूर्वी योग्य गुंतवणूक सल्लागाराशी परामर्श आवश्यक आहे.