सलील उरुणकर

नवीन व्यवसाय असो एखाद्या समाज माध्यमावरील नव्या चॅनेलचे सबस्क्रायबर्सची संख्या. सुरुवातीला प्रत्येक ग्राहक जोडण्यासाठी लागणारा वेळ, घ्यावे लागणारे कष्ट आणि त्यासाठी करावा लागलेला खर्च आणि एका ठराविक यशस्वी टप्प्यानंतरचा लागणारा वेळ, पैसा आणि कष्ट यात फरक असतो. प्राथमिक टप्प्याला यशस्वी टप्प्यापासून ठळकपणे वेगळे करणाऱ्या या प्रवासातील क्षणाला इन्फ्लेक्शन पाँईंट असेही म्हणतात. एखाद्या कंपनीच्या व्यवसायवृद्धीचा पॅटर्न आखण्यास सुरवात केली तर अनेक यशस्वी कंपन्यांच्या या पॅटर्नचा आकार हा ‘हॉकी स्टिक’सदृश्य असतो. आणि म्हणूनच स्टार्टअप्समध्ये हॉकी स्टिक ग्रोथ साध्य करण्यासाठी नवउद्योजकांना सातत्यपूर्ण कष्ट, नियोजन आणि अंमलबजावणी करावी लागते.

Guru Asta 2025 Guru will set for 27 days in the new year
Guru Ast 2025: नवीन वर्षात २७ दिवसांनी अस्त होणार गुरू! ‘या’ राशींची होणार चांदी, झटपट वाढेल पगार
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
Mangal Rashi Parivartan 2024
४२ दिवसानंतर नुसता पैसा; मंगळाच्या राशी परिवर्तनाने ‘या’ तीन राशीच्या व्यक्ती होणार भाग्यवान
jan dhan account marathi news
अकरा कोटी निष्क्रिय जनधन खात्यांमध्ये १४,७५० कोटी पडून
Shani Budh Yuti 2025 astrology
Shani Budh Yuti 2025 : नवीन वर्षात सोन्याचा हंडा घेऊन लक्ष्मी ठोठावेल ‘या’ राशींच्या मंडळींचे दार? शनी-बुधाच्या संयोगाने होऊ शकाल लखपती
Mangal Vakri 2025
मंगळ देणार पैसा, प्रेम अन् प्रसिद्धी; नव्या वर्षाच्या सुरूवातीला ‘या’ तीन राशींना मिळणार प्रत्येक कामात यश
navpancham yog in kundali
शुक्र-गुरू बनवणार नवपंचम राजयोग; ‘या’ तीन राशींना मिळणार पैसाच पैसा
Mars Gochar 2024
पुढील ११० दिवस मंगळ देणार बक्कळ पैसा; ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींना मिळणार संपत्तीचे सुख अन् प्रत्येक कामात यश

असे म्हणतात की कोणत्याही नवीन व्यवसायात पहिले एक हजार दिवस म्हणजे साधारतः तीन वर्ष खूप महत्त्वाची असतात. हे हजार दिवस जर तुम्ही टिकाव धरू शकला, तर पुढील दिवस तुलनेने सोपे असतात. स्टार्टअप नवउद्योजकांच्या बाबतीत तर हे अधिक लागू पडते, कारण ते अपारंपरिक व्यवसायपद्धती विकसित करू पाहात असतात. समाज माध्यमांद्वारे आणि ऑनलाईन मार्केटप्लेस याद्वारे व्यवसाय वाढविण्याचे अनेक मार्ग सध्या उपलब्ध असले तरीसुद्धा सुरवातीच्या दोन ते तीन वर्षातील व्यावसायिक आव्हाने प्रत्येक नवउद्योजकाच्या दृष्टीने कठीण असतात. या आव्हानांवर मात देण्याची प्रत्येक नवउद्योजकाची प्रेरणा, मार्ग वेगवेगळे असू शकतात. पारंपरिक पद्धतीने ऑफलाईन व्यवसाय करणारे ऑनलाईन येत या आव्हानांवर मात करतात, तर फक्त ऑनलाईन व्यवसाय करणाऱ्यांना आता ऑफलाईन म्हणजे ब्रिक-अँड-मॉर्टर स्टोअरचा आधार घ्यावा लागत आहे.

आणखी वाचा-Money Mantra : व्यावसायिक कर्ज घेण्याचे फायदे तोटे काय असतात? (भाग२)

हॉकी स्टिक ग्रोथ पॅटर्नचा विचार करायचा झाल्यास, कोणत्याही कंपनीच्या उलाढाल, बाजारपेठेची व्याप्ती, नफा, ग्राहकवर्गाची व्याप्ती ही यापद्धतीने मांडता येते. प्रस्थापित व्यवसायपद्धतीच्या तुलनेत नावीन्यपूर्ण व्यवसायपद्धती विकसित करणाऱ्या स्टार्टअप्सला पहिल्या दोन वर्षात अनेक आव्हानांना सामोरे जावे लागू शकते. यामध्ये भांडवलाची कमतरता, ग्राहकांकडून अपेक्षित प्रतिसाद न मिळणे, उत्पादन किंवा सेवा ग्राहकोपयोगी न राहणे किंवा अगदी शासकीय धोरणे व नियम बदलल्यामुळे येणाऱ्या अडचणींचाही समावेश असू शकतो. अनेक कंपन्यांनी सुरवातीला मोफत सेवा देऊन कालांतराने सशुल्क सेवा सुरू केल्याचे दिसते तर काहींनी सुरवातीला भरघोस सवलती देत ग्राहकवर्ग आत्मसात करून नंतर या सवलती कमी करत आपला नफा वाढविल्याचे आपल्याला दिसू शकते.

मार्ग कोणताही असला तरी अंतिम ध्येय नफा मिळविणे आणि तो वाढवत जाणे हेच असते. तरच कंपनी प्रदीर्घकाळ बाजारात टिकू शकते किंवा गुंतवणुकदारांना त्यामध्ये गुंतवणूक करण्याची संधी आहे असे वाटू शकते. हॉकी स्टिक ग्रोथ साध्य करण्यासाठी नवउद्योजकांचे त्यांच्या उद्दिष्टापासून लक्ष विचलित होऊ न देणे, ग्राहकवर्गाला सांभाळून ठेवणे आणि बाजारपेठेतील बदलांवर लक्ष ठेवत त्यानुसार आपले उत्पादन किंवा सेवेत आवश्यक ते बदल करत राहिले पाहिजे.

आणखी वाचा-Money Mantra: फंड विश्लेषण- युटीआय लार्ज कॅप फंड

हे सर्व करण्यासाठी केवळ नवउद्योजकच नव्हे तर त्यांचीही ‘टीम’सुद्धा तितकीच फोकस ठेवून काम करणारी असली पाहिजे. त्यासाठी कुशल मनुष्यबळ कसे आकर्षित करायचे याचेही नियोजन करणे महत्त्वाचे ठरते. अन्य क्षेत्रांप्रमाणे नवसंशोधन, नावीन्यता आणि उद्योजकतेच्या क्षेत्रातही खूप झपाट्याने बदल होत आहेत. ऑनलाईन मार्केटप्लेसचा फायदा पूर्वीच्या कंपन्यांना नव्हता तो आता सहजपणे उपलब्ध झाला आहे. बदलत्या परिस्थितीत जसे अनेक गोष्टींचे फायदे आहेत त्याचप्रमाणात आव्हानेही वाढली आहेत. त्यामुळे यशप्राप्तीही तितकीच आव्हानात्मक झाली आहे. सर्वच स्टार्टअप्सला हॉकी स्टिक ग्रोथ अनुकूल ठरते असे नाही. अनेक कंपन्यांना त्यांच्या ग्राहकांच्या किंवा गुंतवणुकदारांच्या वाढत्या अपेक्षांचे ओझे सहन न झाल्यामुळे त्या कालांतराने अपयशी ठरल्याचीही उदाहरणे आहेत. ही सर्व उदाहरणे लक्षात घेऊन नवउद्योजकांनी आपल्याला सकारात्मक ठरेल असे व्यवसाय विस्ताराचे नियोजन करणेच इष्ट ठरेल.

Story img Loader