वसंत कुलकर्णी
पराग पारिख फ्लेक्झीकॅप फंडाला येत्या शुक्रवारी २४ मे रोजी ११ वर्षे पूर्ण होतील. या अकरा वर्षात फंडाने सुरुवातीच्या १ लाखांचे दिनांक १४ मे रोजी ७.१२ लाख केले असून वार्षिक १९.५७ टक्के दराने परतावा दिला आहे. फंडाच्या एकूण गुंतवणुकीच्या ३५ टक्क्यांपेक्षा कमी गुंतवणूक भारताबाहेरील कंपन्यांमध्ये आणि ६५ टक्के गुंतवणूक देशांतर्गत कंपन्यांमध्ये आहे. पराग पारिख फ्लेक्सी कॅप फंड (पूर्वीचा पराग पारिख लाँग टर्म इक्विटी फंड) हा मोजक्या भारतीय म्युच्युअल फंडांपैकी सर्वात यशस्वी फंड आहे. ‘अॅम्फी’च्या ताज्या आकडेवारीनुसार, फ्लेक्झीकॅप फंड गटात सर्वाधिक मालमत्तेचे व्यवस्थापन करणारा ठरला आहे. सुनिश्चित गुंतवणूक प्रक्रिया आणि स्थिर निधी व्यवस्थापन चमू यांच्या संयोगामुळे मागील ११ पैकी ७ वर्षे हा फंड ‘टॉप क्वारटाइल’मध्ये झळकला आहे. गेली आठ वर्षे हा फंड मॉर्निंगस्टारचे ‘फाइव्ह स्टार रेटिंग’ अनुभवत आहे.

सेबीने नोव्हेंबर २०२० मध्ये निर्मिलेल्या फ्लेक्सीकॅप गटात सर्वाधिक काळ ‘टॉप क्वारटाइल’मध्ये असण्याचा विक्रम या फंडाने केला आहे. एक, तीन, पाच आणि दहा वर्षांच्या कालखंडात या फंडाने ‘अल्फा’ निर्मिती केली आहे.

rupee falls 4 paise to close at all time low of 84 43 against us dollar
रुपया ८४.४३ च्या गाळात!
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
readers comments on Loksatta editorial,
लोकमानस : अर्थव्यवस्थेत वाढ, मग रुपयाची घसरण का?
edible oil import india
खाद्यतेलात आत्मनिर्भर होण्याच्या घोषणा हवेतच ! जाणून घ्या, एका वर्षात किती खाद्यतेलाची आयात झाली आणि त्यासाठी किती रुपये मोजले
indian rupee falls to all time low against us dollar
अग्रलेख : काका… मला वाचवा!
public banks profit increase by 26 percent in first half fy 25
सरकारी बँकांच्या नफ्यात सहामाहीत २६ टक्के वाढ
Gold prices at lows Big fall after Diwali
सुवर्णवार्ता… सोन्याचे दर निच्चांकीवर… दिवाळीनंतर मोठी घसरण…
rupee falls for fourth consecutive session
रुपयाचे ८-१० टक्क्यांपर्यंत अवमूल्यनाचा अंदाज; सलग चौथ्या सत्रात घसरण; रिझर्व्ह बँकेच्या हस्तक्षेपाने मोठे नुकसान टळले

हेही वाचा : Money Mantra: TDS साठीचा फॉर्म १५ जी आणि १५ एच कोणाला देता येतो?

पराग पारीख या फंड घराण्याचा हा सर्वात जुना फंड आहे. फंडाच्या गुंतवणूक प्रक्रियेत समष्टी अर्थशास्त्राला (मॅक्रो-इकॉनॉमिक) फारसे प्राधान्य न देता कंपन्यांच्या निवडीसाठी ‘बॉटम-अप’ पद्धतीचा अवलंब करणारी आहे. वाजवी किमतीत दर्जेदार कंपन्या (व्हॅल्यू अॅट रिझनेबल प्राईस) खरेदी करण्यास निधी व्यवस्थापक प्राधान्य देतात. निधी व्यवस्थापन गुंतवणुकीसाठी कंपन्यांची निवड करताना उद्योग क्षेत्राची गुणवत्ता, कंपनीचा व्यवसाय आणि कंपन्यांचे मूल्यांकन यासारख्या घटकांचा विचार करते. सवंग, लोकप्रिय आणि महाग कंपन्यांचा विचार निधी व्यवस्थापक करीत नाहीत. सट्टेबाजीसाठी प्रसिद्ध असलेल्या कंपन्यांपासून फंड व्यवस्थापक कायम दूर राहिले आहेत. फंडाचे पोर्टफोलिओ मंथन (पोर्टफोलिओ टर्न ओव्हर रेशो) (इक्विटी आर्बिट्राज वगळून) फंड गटात सर्वात कमी असलेला दिसतो. मल्टिकॅप गटात असणाऱ्या या फंडाचे वर्गीकरण १३ जानेवारी २०२१ पासून फ्लेक्झीकॅप गटात झाले. ‘सेबी’च्या पुनर्वर्गीकरणानंतर बाजारभांडवल निर्बंधांशिवाय गुंतवणुकीचे स्वातंत्र्य टिकवून ठेवण्यासाठी फंड घराण्याने हा बदल केल्याचे म्हटले आहे.

फंडाच्या स्थापनेपासून राजीव ठक्कर हे फंडाचे व्यवस्थापन करत असून त्यांच्या जोडीला रौनक ओंकार यांची परदेशी गुंतवणूक निधी व्यवस्थापक म्हणून नेमणूक झाली आहे. या फंडाच्या रोखे गुंतवणुकीचे व्यवस्थापक राज मेहता आणि मानसी कारिया हे आहेत. या फंडाचे वैशिष्ट्य असे आहे की, ‘सेबी’च्या ‘इनसाइडर्स’ व्याख्येत बसणाऱ्या गुंतवणूकदारांची एकत्रित गुंतवणूक ३० एप्रिल २०२४ रोजी ४२०.३६ कोटी होती. या फंडाच्या गुंतवणुकीचा एक सकारात्मक भाग म्हणजे आंतरराष्ट्रीय गुंतवणूक. पोर्टफोलिओत वैविध्य जपण्यासाठी वेगवेगळ्या मालमत्ता वर्गात गुंतवणूक करणे समाविष्ट आहे. या रणनीतीमुळे ‘रिटर्न ऑन पोर्टफोलिओ’ कोणत्याही एका विशिष्ट मालमता वर्गावर अवलंबून राहात नाही. म्हणूच अनेकदा वैविध्यपूर्ण पोर्टफोलिओची शिफारस केली जाते. वैविध्यपूर्ण पोर्टफोलिओची रचना करून उच्च दीर्घकालीन परतावा मिळवता येतो. या फंडाने परदेशातील गुंतवणुका मुख्यत्वे उत्तर अमेरिका, पश्चिम युरोप आणि विकसित आशियापुरती सीमित ठेवल्याचा फायदा फंडाला झाला आहे.

हेही वाचा : Money Mantra: होम सेव्हर लोन म्हणजे काय? त्याचा फायदा कसा घ्याल?

जागतिक गुंतवणुकीत निधी व्यवस्थापनाने बहुराष्ट्रीय कंपन्यांना प्राधान्य दिल्याचे दिसते. तथापि, ‘सेबी’ आणि परदेशी चलन नियंत्रक रिझर्व्ह बँकेने भारतीयांच्या परदेशी गुंतवणुकीवरील एकूण निर्बंध वर्षभरापूर्वी घातल्याने, ‘एसआयपी’मार्फत येणारी नवीन गुंतवणूक भारतीय कंपन्यांच्या समभागांमध्ये सुरूच आहे. याचा अर्थ असा आहे की, फंडाची परदेशातील गुंतवणूक सध्या फेब्रुवारी २०२२ मधील २९.८३ टक्क्यांवरून एप्रिल २०२४ मध्ये १४.१३ टक्क्यांवर घसरली आहे. फंडाच्या व्यवस्थापनाशी झालेल्या चर्चेदरम्यान व्यवस्थापनाने असा युक्तिवाद केला आहे की, परदेशात गुंतवणुकीमागच्या रणनीतीचा उद्देश हा गुंतवणुकीतील जोखीम कमी करणे हा आहे. फंडाच्या परदेशी गुंतवणुकीत अल्फाबेट (गूगल) मायक्रोसॉफ्ट, मेटा (फेसबुक) आणि अॅमेझोन या चार कंपन्यांचा समावेश आहे.

हेही वाचा : Money Mantra – प्रश्न तुमचे, उत्तरे तज्ज्ञांची- क्रिटिकल केअर इन्शुरन्स पॉलिसी म्हणजे काय?

फंडाची कामगिरी

पराग पारीख फ्लेक्झीकॅप फंडाने गेल्या ११ वर्षात चमकदार कामगिरी केली आहे. स्थापनेपासून, फंडाचा (रेग्युलर प्लान) मानदंड असणाऱ्या ‘निफ्टी ५०० टीआरआय’ निर्देशांकाच्या १३.९८ टक्क्यांच्या तुलनेत १९.५७ टक्के वार्षिक नफा कमविला आहे. याचा अर्थ फंडाने दर साडेतीन वर्षात मूळ गुंतवणूक दुप्पट केली आहे. फ्लेक्झीकॅप गटात १, ३, ५ आणि १० वर्षे कालावधीत एकाही फंडाची कामगिरी पराग पारीख फ्लेक्झीकॅपच्या कामगिरीच्या जवळपास नाही. पराग पारीख फ्लेक्झीकॅप फंडाचे जोखीम गुणोत्तर फंड गटातील अन्य स्पर्धकांच्या तुलनेत खूपच उजवे आहे. त्याचे तीन, पाच, सात आणि दहा वर्षांचे प्रमाणित विचलन सर्वात कमी आहे, याचा अर्थ दीर्घ मुदतीत सातत्यपूर्ण संपत्ती निर्मिती करणारा हा फंड आहे. त्याचप्रमाणे, फ्लेक्झीकॅप फंड गटात सर्वोच्च शार्प रेशो उच्च जोखीम-समायोजित परताव्याचे निदर्शन करते. तसेच, फंडाचा डाउन कॅप्चर रेशो ५२ टक्के, असून फंड गटात सर्वात कमी आहे. हे गुणोत्तर असे सूचित करते की, बाजार घसरत असताना मानदंड सापेक्ष सर्वात कमी घसरण या फंडाच्या ‘एनएव्ही’मध्ये झाली आहे. लोकसभा निवडणूक शेवटच्या टप्प्यात असून आज पाचव्या टप्प्याचे मतदान सुरू आहे. अंध भक्ती केवळ राजकीय विचारसरणीपुरती सीमित नसून गुंतवणुकीच्या बाबतीतसुद्धा अनेक अंधभक्त आढळतात. एसबीआय, एचडीएफसी, आयसीआयसीआय, बिर्लासारख्या परिचित नाममुद्रांना अंधभक्त पसंती देतात. फंड निवडताना जोखीम-समायोजित परतावा हा महत्त्वाचा निकष असायला हवा. निवडणूक निकाल जाहीर होण्यास पंधरा दिवसांचा अवधी असताना अस्थिरतेवर मात करून दीर्घकालीन संपत्ती निर्मितीसाठी फंड निवड अंध भक्तीने न करता डोळसपणे निवड केली तर हा फंड एक निश्चितच आदर्श फंड आहे.
shreeyachebaba@gmail.com