मागील काही आठवडे सोने आणि चांदी यांच्या किमती सातत्याने वाढत होत्या. जागतिक सुवर्ण परिषदेसहित (वर्ल्ड गोल्ड कौन्सिल) सर्व नामांकित संस्था आणि विश्लेषक दोन्ही मौल्यवान धातूंमध्ये ‘करेक्शन’ येण्याचा इशारा देत होते. परंतु ‘टेक्निकल चार्ट’, डॉलर निर्देशांकातील उसळी आणि अमेरिकेत व्याजदर कपातीबाबत कमी होत चाललेल्या अपेक्षा यांसारख्या एरवी सोन्यातील तेजीला मारक असणाऱ्या गोष्टी आजूबाजूला घडत असताना सोने वाढतच राहिले. चांदीने तर गुंतवणूकदारांची अक्षरक्ष: ‘चांदी’च केली. सोने सर्व करांसहित प्रति दहा ग्रॅम ८०,००० रुपयांच्या विक्रमी पातळीवर गेले तर चांदीने १,००,००० रुपये किलोचा टप्पा सहज पार करत प्रतिकिलो १,०२,५०० रुपयांचा विक्रम नोंदवला. विशेष म्हणजे मागील तीन-चार महिन्यांत आलेली सोन्यातील तेजी ही आजवरच्या इतिहासात सर्वाधिक समजली जात आहे, असे असूनसुद्धा सराफा बाजाराशी संलग्न संस्था, अभ्यासक आणि विश्लेषक सोन्यातील मोठ्या तेजीची ही सुरुवात असल्याचे म्हणत आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा