जोखीम आणि परतावा या दोन गुणांचा आपल्या पोर्टफोलिओच्या कामगिरीवर खूप प्रभाव असतो. गुंतवणूकदाराला चांगल्या परताव्याची अपेक्षा असेल, तर त्यानुसार जोखीमदेखील घ्यावी लागते. बाजारात तेजीत असताना आपला पोर्टफोलिओ त्याहून वर जायला हवा आणि बाजार पडल्यावर तो कमी पडावा ही सर्वांचीच अपेक्षा असते. मात्र जे सहज घडून येत नाही. त्यासाठी पोर्टफोलिओची बांधणी आणि त्यातील घटकांची वजा-बाकी योग्य पद्धतीने करावी लागते. तेव्हाच खरे कौशल्य असते, ते म्हणजे जोखीम रास्त ठेवून परतावा जास्त मिळविण्याचे! इथे आज आपण थीमॅटिक आणि सेक्टर फंडांचा आढावा घेणार आहोत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
आपण दोन प्रकारचे पोर्टफोलिओ बनवू शकतो – ॲक्टिव्ह म्हणजेच सक्रिय आणि पॅसिव्ह म्हणजेच निष्क्रिय. ॲक्टिव्ह पोर्टफोलिओमध्ये गुंतवणूकदार बाजाराचा कल पाहून त्यातील घटकांमध्ये वजा-बाकी करत असतो. आहेत त्या सेक्टरमध्ये नवीन शेअर घ्यायचा का? किंवा एखादा सेक्टर पोर्टफोलिओमध्ये खूप वाढल्यासारखा वाटल्यास तो कमी करायचा तर त्यातील कोणता शेअर विकायचा? कोणत्या नवीन सेक्टरला पोर्टफोलिओमध्ये जोडायचे? असे निर्णय तो गरजेनुसार घेत असतो. त्याविरुद्ध पॅसिव्ह गुंतवणूकदार असतो. त्याची मानसिकता थोडी वेगळी असते. तो शक्यतो गुंतवणूक साठवण्यामध्ये स्वारस्य दाखवतो. पोर्टफोलिओमध्ये फार ढवळाढवळ करणे हे त्याच्याकडून होत नाही. ‘बाय अँड होल्ड’ म्हणजेच खरेदी करा आणि पोर्टफोलिओमध्ये राखून ठेवा हे त्याचे ध्येय असल्याने ठरवलेल्या शेअरमध्येच गुंतवणूक करत राहतो. यामागे वेळेचा अभाव, एककल्ली असणे, सतत नवीन संशोधन आणि अभ्यास करायला न आवडणे ही सर्व कारणे असू शकतात. इंडेक्स फंडात गुंतवणूक करताना अभ्यास आणि संशोधनाची गरज नसते त्यामुळे बहुतांश गुंतवणूक त्याची निवड करतात. मात्र इंडेक्स फंडाचा समावेश केल्याने पोर्टफोलिओची जोखीम कमी होईल असे नाही. शिवाय सेक्टर किंवा थीम नसल्यास परतावा कमी राहण्याची शक्यता वाढते. अशा वेळी म्युच्युअल फंडांचे थीमॅटिक आणि सेक्टर फंड अशा निष्क्रिय गुंतवणूकदारांच्या कामी येतात.
हेही वाचा – Money Mantra : म्युच्युअल फंड युनिट ‘डिमॅट’ खात्यात ठेवणे फायद्याचेच!
इथे आपण एक उदाहरण घेऊया. देसाई नावाचे एक गृहस्थ आहेत, जे खूप जास्त जोखीम घेत नाहीत आणि म्हणून त्यांनी समतोल पोर्टफोलिओ बनवला आहे. समभाग आणि रोखेसंलग्न पोर्टफोलिओ असल्यामुळे त्यांना जर बाजारातील तेजीच्या काळात अधिक परतावा मिळवायचा असेल, तर त्यांना २-३ सेक्टर किंवा थीम ओळखून त्यानुसार तयार केलेले म्युच्युअल फंड पोर्टफोलिओमध्ये जोडावे लागतील. जर येत्या काळात बँकांची कामगिरी चांगली असणार असेल तर बँकिंग सेक्टरचे म्युच्युअल फंड घेता येतील. जर वाढत्या तरुण जनसंख्येमुळे राहणीमानाचे खर्च वाढणार असतील तर ग्राहकोपयोगी कंपन्यांच्या समभागात गुंतवणूक करणारे म्हणजेच तशी थीम असलेले म्युच्युअल फंड घेणे आवश्यक आहे. मात्र सेक्टरची कामगिरी किंवा थीमचा आकर्षकपणा संपण्याआधी इथे नफा मिळवून बाहेर पडावे लागते हे लक्षात घेणे आवश्यक आहे, नाहीतर जोखमीनुसार परतावा मिळत नाही. शिवाय नुकसानदेखील होण्याची भीती असते. म्हणून अर्थजगात काय घडामोडी सुरू आहेत आणि पुढे त्याचे काय पडसाद उमटतील याबाबत माहिती घेऊन आणि त्यानुसार निर्णय घेणे हे ओघाने आलेच.
एखादा सक्रिय गुंतवणूकदारदेखील यांचा वापर करू शकतो. जर मुख्य पोर्टफोलिओ थेट समभाग घेऊन तयार केलेला आहे, तर ‘सॅटेलाइट’ पोर्टफोलिओ हा अशा फंडांचा असू शकतो. मागील काही महिन्यांमध्ये फार्मा सेक्टरची कामगिरी फारशी उल्लेखनीय नव्हती. एखादी कंपनी सोडली तर गुंतवणूक करण्यासाठी वाव नव्हता. मग इथे एखादा फार्मा फंड घेऊन सुरुवात करायला हरकत नाही. पुढे जेव्हा त्या सेक्टरचे भविष्य चांगले होत असल्याचे संकेत मिळाले की, ठरावीक कंपन्यांचे समभाग घेतल्याने फायदा वाढू शकतो. इथे उदाहरण म्हणून आपण श्यामलाताईचा पोर्टफोलिओ बघूया. तिचा मुख्य पोर्टफोलिओ हा काही ठरावीक लार्ज कॅप कंपन्यांचा आहे. तिला जर येत्या काळात वाढणाऱ्या महागाईचा फायदा करून घ्यायचा असेल तर कमॉडिटी थीमने तिला ते शक्य करता येईल. इथे तिला प्रत्येक कंपनीचा अभ्यास न करता, या थीमच्या म्युच्युअल फंडांच्या ठरावीक मापदंडांचा अभ्यास करावा लागेल. शिवाय पैसे एकरकमी भरायचे वा नियमित एसआयपीच्या माध्यमातून हेदेखील ठरवणे महत्त्वाचे आहे. शिवाय आधी म्हटल्याप्रमाणे भांडवली बाजाराचे चक्र समजत असेल तर अशा पद्धतीने गुंतवणूक करणे योग्य आहे. आता थोडक्यात, सध्या मिळत असलेल्या अशा प्रकारच्या म्युच्युअल फंडांची थोडी माहिती जाणून घेऊया.
सेक्टर फंडामध्ये आपल्याला – बँकिंग अँड फायनान्शिअल सर्व्हिसेस फंड, फार्मा, इन्फ्रास्ट्रक्चर आणि टेक्नॉलॉजी फंड आहेत. थीमॅटिक फंड अनेक प्रकारचे आहेत – कन्झम्प्शन, डिव्हिडंड यील्ड, एनर्जी, ईएसजी, मल्टिनॅशनल कंपनी, पब्लिक सेक्टर, इंटरनॅशनल, ट्रान्सपोर्टेशन अँड लॉजिस्टिक्स, स्पेशल सिच्युएशन, बिझनेस सायकल, डिफेन्स, कमॉडिटीज, मॅन्युफॅक्चरिंग, एक्स्पोर्ट अँड अदर सर्व्हिसेस, ऑटो आणि असे अनेक. या फंडांमध्ये गुंतवणूक करण्याआधी यांच्या पोर्टफोलिओचा व्यवस्थित अभ्यास होणे आवश्यक आहे. यांची जोखीम त्यांच्या थीम किंवा सेक्टरच्या कामगिरीनुसार कमी-जास्त होत असते.
हेही वाचा – Money Mantra: आयुर्विमा पॉलिसी कराराचं महत्त्व
आपण या फंडांची जोखीम समजून घेऊया. हाऊसिंग थीमच्या फंडच्या ‘एनएफओ’मध्ये एका गुंतवणूकदाराने २०१७ मध्ये पैसे घातले होते. पुढे तीन वर्षे त्याला काहीच परतावा मिळाला नाही. आता साडेचार वर्षांनी त्याचा परतावा ९.३२ टक्क्यांवर पोहोचला आहे. मात्र याच फंडाने मागील ६ महिन्यांत १९.२७ टक्के परतावा दिला. कारण गृहनिर्माण क्षेत्रातील कंपन्यांच्या समभागांनी अनेक वर्षांच्या निद्रावस्थेतून उठून धावायला सुरुवात केली. कमॉडिटी फंडांच्या बाबतीत वेळ चुकली, तर अनेक वर्षे परतावे मिळत नाहीत.
एखाद्या चाणाक्ष गुंतवणूकदाराला एव्हाना ही गोष्ट लक्षात आली असेल की, बाजारातील चक्र हल्लीच्या काळात फार वेगाने फिरत आहेत. नवीन तंत्रज्ञान, नवीन प्रकारचे उद्योग, वेगाने पसरणारी माहिती आणि बाजारात फिरणारे भरपूर पैसे या सर्व कारणांमुळे कुठल्याही थीम जास्त काळ टिकत नाहीत. यामुळे पोर्टफोलिओ व्यवस्थापन दिवसेंदिवस अधिक आव्हानात्मक होत चालले आहे. तेव्हा प्रत्येक गुंतवणूकदाराने या गोष्टीची दखल घेऊन आपला पोर्टफोलिओ सांभाळावा आणि वाढवावा. अंथरूण पाहून पाय आखडून घेण्यापेक्षा हळू हळू अंथरूण मोठे कसे करता येईल यावर लक्ष केंद्रित करावे.
trupti_vrane@yahoo.com
प्रकटीकरण: हा लेख फक्त मार्गदर्शनपर आहे. इथे लेखिका कोणतीही जाहिरात करत नाही.