फिक्स्ड डिपॉझिट(FD)चे व्याजदर गेल्या काही दिवसांपासून झपाट्याने वाढले आहेत. पण आता आरबीआयने रेपो दरातील वाढ थांबवल्याने दर आणखी वाढण्याची शक्यता कमी आहे. आरबीआयने सलग दुसऱ्यांदा व्याजदर जैसे थे ठेवल्याने बँका या ठेवींवर व्याजदर वाढवणार नाहीत हे आता निश्चित झाले आहे. काही बँकांनी त्यांच्या एफडी दरात कपात करण्यास सुरुवात केली आहे. १ जून २०२३ रोजी पंजाब नॅशनल बँकेने (PNB) एका वर्षाच्या FD चे दर कमी केले. गेल्या वर्षी एप्रिलपासून आरबीआयने रेपो दर २५० बेसिस पॉइंट्स (bps) ने वाढवून ६.५ टक्के केला. याउलट अधिकाधिक ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी बँकांनी त्यांचे दर वाढवले.
अशा काही FD योजना आहेत, ज्या ग्राहकांसाठी खूप उपयुक्त ठरल्या आहेत आणि ग्राहकांना मोठा नफा दिला आहे. आता त्या बंद होण्याच्या मार्गावर आहेत. ३० जून रोजी बंद होणार्या काही खास FD योजनांवर एक नजर टाकू या.
हेही वाचाः आता डिफॉल्टरलाही पुन्हा कर्ज मिळणार, RBI ने बदललेल्या निर्णयाचा सर्वसामान्यांना होणार फायदा
SBI अमृत कलश
देशातील सर्वात मोठी कर्जदार स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ची अमृत कलश एफडी रिटेल मुदत ठेव योजना जून अखेरपर्यंत वैध आहे. SBI अमृत कलश FD योजना ४०० दिवसांच्या विशेष कालावधीसह येते, ज्यावर सामान्य लोकांना ७.१०% आणि ज्येष्ठ नागरिकांना ७.६०% व्याजदर मिळतो. ४०० दिवसांची अमृत कलश योजना ३० जून २०२३ पर्यंत वैध असेल.
हेही वाचाः मोठा दिलासा! किरकोळ महागाई दर २५ महिन्यांच्या नीचांकावर, खाण्या-पिण्याच्या गोष्टी झाल्या स्वस्त
इंडियन बँक स्पेशल एफडी
इंडियन बँकेने “इंड सुपर ४०० दिवस” विशेष मुदत ठेव ३० जून २०२३ पर्यंत वाढवली आहे. याद्वारे इंडियन बँक सर्वसामान्यांना ७.२५% आणि ज्येष्ठ नागरिकांना ७.७५% व्याजदर देते.
एसबीआय व्ही केअर
SBI Wecare FD योजना केवळ ज्येष्ठ नागरिकांसाठी आहे आणि ही योजना ५ वर्षे ते १० वर्षांच्या कालावधीसह येते. SBI ३० जून २०२३ पर्यंत मर्यादित कालावधीसाठी Wecare FD योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना ७.५०% व्याजदर देत आहे. SBI WECARE हा ज्येष्ठ नागरिकांसाठी समर्पित कार्यक्रम होता. ही मुदत ठेव योजना मे २०२० मध्ये सुरू करण्यात आली. अनेक मुदतवाढीनंतर ही योजना ३१ मार्च २०२३ रोजी संपणार होती. SBI ने त्याची वैधता ३० जून २०२३ पर्यंत वाढवली होती.