• रोहित गुप्ता

घर घेणे हे प्रत्येकाचे स्वप्न असते, पण घर घेणे सोपे काम नाही. एक मध्यमवर्गीय माणूस घर खरेदीसाठी आपली सर्व बचत खर्ची घालतो. त्यानंतरही पैसे कमी पडत असल्याने गृहकर्ज घ्यावे लागते. अशा परिस्थितीत माणसाने घर घ्यायचे तरी कधी हा मोठा प्रश्न निर्माण होतो. भारतातील निवासी रिअल इस्टेट बाजार दिवसेंदिवस विस्तारत चालला असून, नव्या मालमत्तेच्या आकर्षक किमती आणि ग्राहकांची बाजारातील मजबूत मागणी यामुळे रिअल इस्टेट क्षेत्रही वेगाने वाढत आहे. २०२३ च्या दुसऱ्या तिमाहीतील JLL अहवालानुसार, ६४,५०० निवासी घरांची विक्री झाली, जी मागील तिमाहीच्या तुलनेत अंदाजे ४ टक्क्यांची वाढ दर्शवते. निवासी मालमत्ता विक्रीने गेल्या वर्षभरात प्रत्येक तिमाहीत सातत्याने नवीन उच्चांक गाठला आहे. २०२३ च्या दुसऱ्या तिमाहीमधील विक्रीने २०२३ च्या पहिल्या तिमाहीच्या मागील ऐतिहासिक उच्चांकाला पार केले आहे, ज्यामुळे ती २००८ नंतरची सर्वोच्च तिमाही विक्री बनली आहे. तसेच तुम्ही कोणत्या प्रकारचे घर किती किमतीत खरेदी करावे? तुम्ही घर विकत घेण्यास तयार आहात का? हेसुद्धा आपण समजून घेणार आहोत.

उच्च जीवनशैली अनुभवायची लोकांची इच्छा लक्षात घेता बांधकाम व्यावसायिक आता मोठी आणि सुसज्ज घरे बांधण्यावर लक्ष केंद्रित करीत आहेत. २०२३ च्या पहिल्या सहामाहीत नवीन प्रीमियम अपार्टमेंट प्रकल्प मागील वर्षाच्या तुलनेत ६१ टक्क्यांनी वाढले आणि मध्यम स्तरीय अपार्टमेंट ७ टक्क्यांनी वाढले. दिवसागणिक लक्झरी घरांची मागणी वाढत चालली आहे, कोणत्याही लक्झरी मालमत्तेत गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्हाला काही गोष्टी माहीत असणे आवश्यक आहे. फायनान्शिअल एक्सप्रेसने यासंदर्भात माहिती दिली आहे.

Jeevan pramaan online process
Money Mantra: हयातीचा दाखला ऑनलाईन मिळवण्यासाठी जीवन प्रमाण सुविधा काय आहे?
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
loksatta editorial no interest rate cut by rbi retail inflation surges in october
अग्रलेख : म्हाताऱ्या शब्दांचा आरसा…
readers comments on Loksatta editorial,
लोकमानस : अर्थव्यवस्थेत वाढ, मग रुपयाची घसरण का?
indian rupee falls to all time low against us dollar
अग्रलेख : काका… मला वाचवा!
Use UPI without Bank account NPCI launches new feature UPI Circle for family members and friends
आता बँक खाते नसलेला व्यक्ती करू शकतो UPIचा वापर; NPCIने कुटुंबातील सदस्यांसाठी सुरू केलं UPI Circle, जाणून घ्या नव्या फीचरबद्दल…
Gold prices at lows Big fall after Diwali
सुवर्णवार्ता… सोन्याचे दर निच्चांकीवर… दिवाळीनंतर मोठी घसरण…

मालमत्तेचे उद्दिष्ट : तुम्हाला मालमत्तेचे काय करायचे आहे, तुम्हाला तेथे कायमस्वरूपी राहायचे आहे की भाड्याने द्यायचे आहे याची स्पष्ट कल्पना असणे आवश्यक आहे, यामुळे तुम्हाला तुमच्यासाठी योग्य मालमत्ता निवडण्यात मदत मिळेल. हे सर्व मालमत्ता खरेदी करण्याच्या तुमच्या ध्येयावर अवलंबून असते.

अर्थ नियोजनाचे वास्तव : तुमचे बजेट वास्तववादी पद्धतीने ठरवा. नोंदणी, मुद्रांक शुल्क, देखभाल आणि मालमत्ता कर यासह केवळ खरेदी किंमतच नाही, तर संबंधित खर्चाची देखील गणना करून ठेवा. त्यामुळे आपला आर्थिक ताण कमी होण्यास मदत होईल

RERA नोंदणी : तुम्ही खरेदी करू इच्छित असलेली मालमत्ता रिअल इस्टेट रेग्युलेशन अथॉरिटी (RERA) कडे नोंदणीकृत आहे की नाही याची पडताळणी करणे हा एक मूलभूत टप्पा आहे. ही नोंदणी मालमत्ता सुरक्षित आहे आणि सर्व नियमांचे पालन करते याची खात्री करते.

बिल्डरची प्रतिष्ठा : बिल्डरची प्रतिष्ठा आणि ट्रॅक रेकॉर्ड तपासून घ्या. विकासकाची विश्वासार्हता ही प्रकल्पाच्या गुणवत्तेची आणि टाइमलाइनचे पालन करण्याचे सूचक असू शकते.

हेही वाचाः India Pakistan Match : गुजरातची अर्थव्यवस्था पाहून जगाला आश्चर्य वाटेल, पाकिस्तानलाही लाजवेल!

स्थान : विचार करण्यासारख्या महत्त्वपूर्ण घटकांपैकी एक म्हणजे मालमत्तेचे स्थान. तद्वतच ते मुख्य ठिकाणी असणे आवश्यक आहे. चांगली कनेक्टिव्हिटी अत्यावश्यक आहे, ज्यामुळे बाजारपेठ, कार्यालये, शाळा, महाविद्यालये आणि रुग्णालयांपर्यंत पोहोचणे सोपे जाते.

मालमत्तेची किंमत वाढण्याची शक्यता : मालमत्ता ही दीर्घकालीन गुंतवणुकीसाठीचेही एक साधन आहे. कालांतराने मालमत्तेचे मूल्य कसे वाढेल याचा विचार करणे महत्त्वाचे आहे. स्थान, ब्रँड प्रतिष्ठा, डिझाइन आणि सुविधा यांसारखे घटक त्याची भविष्यातील किंमत ठरवण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात.

हेही वाचाः आरबीआयने बजाज फायनान्ससह ‘या’ दोन बँकांवर ठोठावला कोट्यवधींचा दंड, खातेदारांवर काय परिमाण?

देखभाल दुरुस्ती अन् खर्च : बऱ्याच प्रकरणांमध्ये घर खरेदी केले जाते, परंतु नंतर त्याच्या देखभाल दुरुस्तीचा प्रश्न जागा मालकांना सतावत असतो. दीर्घकालीन प्रकल्पाची उच्च मानके राखण्यात मदत करण्यासाठी तुम्ही विकासकाला विश्वासात घेऊन देखभाल दुरुस्तीच्या खर्चाबद्दलही नियोजन करून ठेवले पाहिजे.

तपासणी आणि दस्तऐवजीकरण : करार अंतिम करण्यापूर्वी मालमत्तेची पूर्ण तपासणी करणे आवश्यक आहे. टायटल डीड, करार आणि मंजुरी यासह सर्व कागदपत्रे व्यवस्थित असल्याची खात्री करून घ्या.

शेवटी आलिशान मालमत्तेच्या वाढत्या मागणीसह भारतातील निवासी रिअल इस्टेट बाजार दिवसागणिक वाढत चालला आहे. या डायनॅमिक मार्केटमध्ये योग्य गुंतवणूक करण्यासाठी मालमत्तेसाठी स्पष्ट उद्दिष्ट ठेवणे आवश्यक आहे. वास्तववादी बजेट सेट करा, RERA नोंदणी सुनिश्चित करा आणि बिल्डरच्या प्रतिष्ठेचे बारकाईने तपासणी करा. स्थान, किंमत वाढण्याची क्षमता, देखभाल खर्च आणि योग्य दस्तऐवजीकरण या सर्व गंभीर बाबी आहेत. हे घटक लक्षात घेऊन तुम्ही विकसित होत असलेल्या रिअल इस्टेट प्रोजेक्टमध्ये घर घेऊ शकता. तुमच्या भविष्यासाठी परिपूर्ण आलिशान मालमत्तेत गुंतवणूक करून पैसे सुरक्षित करू शकता.

(हा लेख मंत्राचे सीईओ रोहित गुप्ता यांनी लिहिला आहे. वर व्यक्त केलेली मते त्यांची वैयक्तिक आहेत.)